मी रांग लावतो किंवा रांगेतील काही अनुभव निबंध मराठी | Rang lavto Marathi Nibandh
आपले सारे बालपण रांग लावण्यात हरवले असल्याचे आमची आई नेहमी सांगत असते. दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते ते! त्या दिवसांत साऱ्या गोष्टींचे दुर्भिक्ष्य होते. दूध, पाणी, रॉकेल, धान्य साऱ्या दैनंदिन आवश्यक गोष्टींसाठी रांग अनिवार्य झाली होती. 'रांग' हाच मुळी जीवनाचा अविभाज्य घटक झाला होता. त्यावेळी रांगेत लग्ने जमत. रांगेवर कथा, कविता लिहिल्या जात आणि रांगेचे वर्णन करणारे ‘आम्ही रांगवाले, रांगवाले' हे भावगीत तर म्हणे विशेष लोकप्रिय झाले होते.
आज स्वातंत्र्योत्तर काळातही रांग आमचा पिच्छा पुरवीत आहेच. कुठे बसने जायचे असेल तर थांबा रांगेत. चांगला सिनेमा, नाटक पाहावयाचे असेल तर पकडा रांग. इतकेच काय, पण नावाजलेल्या शाळेत प्रवेश हवा असेल तर धरा पहाटेपासून रांग. अशी ही रांग अक्षरशः आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अशाच एका रांगेत उभे राहण्याची वेळ माझ्यावर आली. त्याची ही कथा.
सुटीत मामाच्या गावी जायचे म्हणजे मला ती आनंदाची पर्वणीच असते; पण बाबांनी यंदा जाहीर केले, "तुला जायचे असेल तर खशाल जा; पण तझे गाडीचे तिकीट तच काढन आणले पाहिजेस." हे ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. कारण सुटीच्या मोसमात तिकीट काढायचे म्हणजे भल्यामोठ्या रांगेला तोंड देणे भाग आहे. पण ते आता अटळ हाते.
rang lavto essay marathi |
खिशातील पैसे सांभाळत मी रांगेत उभा होतो. लोक गप्पा मारू लागले होते. गप्पांचा विषय होता-'तिकिटांचा काळा बाजार.' उभे राहून राहून दमल्यामुळे काही लोक चक्क खाली बसले होते. तेथे भेदभाव नव्हता. सर्वजण एकाच ध्येयाने आलेले. सर्वांची तपस्या एकच. गप्पा ऐकता ऐकता वेळ कसा गेला ते कळलेच नाही. पावणेनऊच्या सुमारास रांगांचे रक्षण करण्यासाठी रेल्वे पोलिस अवतरले आणि नऊ वाजता खिडकी उघडली गेली.
त्या क्षणी ढकलाढकल सुरू झाली. काही लोकांनी मध्ये घुसण्याचा यत्न केला; तेव्हा भांडणेही सुरू झाली. जेवढे बाहेरचे वातावरण तप्त, तेवढेच आतले तिकीटबाबू शांत होते. मुंगीच्या गतीने रांग सरकत होती. कुणी मध्ये घुसण्याचा यत्न केला की लोक चिडत. तेवढ्यात कुणाचा तरी खिसा कापला गेल्यामुळे लोकांचा गलबलाट वाढला.
घड्याळाचे काटे फिरत होते, पोटात भकेचा डोंब उसळला होता; पण अदयापि माझा क्रमांक येत नव्हता. मध्ये मध्ये तिकीटबाबू येऊन कुठल्या गाडीची तिकिटे संपली ते फळ्यावर लिहीत होता. क्षणाक्षणाला माझी अधीरता वाढत होती. शेवटी ११ वाजता मला तिकीट मिळाले. आता शरीरातले त्राण संपले होते. मी तिकीट घेऊन मागे वळलो, तर तेथे बाबा उभे होतेच. माझी दयनीय अवस्था पाहून त्यांनी मला उपाहारगृहात नेले हे सांगायला नकोच!
घड्याळाचे काटे फिरत होते, पोटात भकेचा डोंब उसळला होता; पण अदयापि माझा क्रमांक येत नव्हता. मध्ये मध्ये तिकीटबाबू येऊन कुठल्या गाडीची तिकिटे संपली ते फळ्यावर लिहीत होता. क्षणाक्षणाला माझी अधीरता वाढत होती. शेवटी ११ वाजता मला तिकीट मिळाले. आता शरीरातले त्राण संपले होते. मी तिकीट घेऊन मागे वळलो, तर तेथे बाबा उभे होतेच. माझी दयनीय अवस्था पाहून त्यांनी मला उपाहारगृहात नेले हे सांगायला नकोच!