माझे पहिले भाषण मराठी  निबंध | My First Speech Essay In Marathi

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे पहिले भाषण मराठी निबंध बघणार आहोत. आज एवढ्या मोठ्या समारंभात हजारो प्रेक्षकांसमोर एका नामांकित साहित्यिकाकडून माझा गौरव करण्यात आला. मला पारितोषिकासोबत मिळालेले ते संदर प्रशस्तिपत्रक आताही माझ्या समोर आहे. त्या समारंभात मिळालेल्या पुष्पगुच्छातील फुलांच्या परिमलाने माझी अभ्यासिका अजूनही दरवळते आहे. साऱ्या महाराष्ट्रात विख्यात असलेल्या 'रानडे वक्तृत्वस्पर्धे'त मी पहिला क्रमांक मिळवून पाचशे रुपयांचे बक्षीस मिळविले होते.

त्यासाठी हा सत्कारसमारंभ झाला होता. त्यामुळे आता माझ्या डोळ्यांसमोर प्रसंग उभा होता तो 'माझ्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा'. या पहिल्या भाषणाच्या वेळी मी मनात जो संकल्प सोडला होता, तोच आज पूर्ण झाला होता. आजवर विविध वक्तृत्वस्पर्धांत मी अनेक बक्षिसे मिळविली होती. पण हे बक्षीस पटकावून मी एका त-हेने उच्चांक गाठला आहे. याचसाठी मी अट्टाहास केला होता. माझे पहिले भाषणही मी केले होते, ते असेच आव्हान पत्करूनच. 

मला आठवते की, त्यावेळी मी नुकताच हायस्कूलात जाऊ लागलो होतो. घरातील शेंडेफळ म्हणून मी जरा अधिकच लाडात वाढलो होतो. त्यामुळे पाचवीत पोहोचलो तरी बोबडे बोल माझ्या तोंडून काही सुटले नव्हते. इतकेच नव्हे तर कित्येकदा बोलताना मी अडखळतही असे. माझ्यातील या वैगुण्यामुळे माझे वर्गमित्र माझी नेहमीच चेष्टा करीत असत. त्यामुळे वक्तृत्वस्पर्धेत भाग, घेण्याबाबत गुरुजींनी विचारले असता मी जेव्हा माझे नाव देण्यासाठी उभा राहिलो, तेव्हा संपूर्ण वर्गात हशा पिकला. 

maze pahile bhashan nibandh in marathi
maze pahile bhashan nibandh in marathi

गुरुजींनीही माझी चेष्टा करून मला स्पर्धेत भाग घेण्यापासून वंचित केले. त्या दिवशी मी रडत रडतच घरी आलो. मी फार दुखावलो होतो; पण माझे मन जाणले ते माझ्या आईने! ती गुरुजींना भेटली आणि आपण तयारी करून घेत असल्याचे त्यांना आश्वासन दिले. बस्स! त्या दिवसापासून माझ्या पहिल्या भाषणाच्या तयारीला निश्चयाने सुरुवात झाली. मला आठवते, माझे ते भाषण महाकवी रवींद्रनाथ टागोरांविषयी होते. 

त्या स्पर्धेच्या वेळी तिघे नामांकित वक्ते परीक्षक म्हणून समोर बसले होते. संपूर्ण हॉल विदयार्थ्यांनी गच्च भरला होता. एकापाठोपाठ एक विदयार्थी व्यासपीठावर येऊन भाषण करून जात होते. आणि माझ्या डोळ्यांसमोर गेल्या महिन्यातील सारी धडपड उभी राहिली होती.

या भाषणासाठी माझी सारी तयारी आईने करवून घेतली होती. भाषणही तिनेच लिहिले होते. रोज सकाळी ती मला लवकर उठवत असे. भाषणातील प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारला जावा यावर तिचा कटाक्ष होता. भाषणाची अखेर टागोरांच्या 'गीतांजली'तील पंक्तीनेच केली होती. मी या विचारात गुरफटलो असतानाच माझे नाव पुकारले गेले आणि मी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर जाऊन उभा राहिलो. 

श्रोत्यांनी भरलेला हॉल प्रथमच पाहिला आणि क्षणभर माझे डोळे दिपले. भाषणातील काही आठवेना. इतक्यात आईचे शब्द आठवले, “हे बघ, आपल्याला हसणाऱ्यांचे हसे करावयाचे आहे बरं का!" आणि मी आवेशाने भाषणाला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा मला कळले की, आपले भाषण संपले. व्यासपीठावरून उतरताना अनेकांनी जवळ बोलावून माझी पाठ थोपटली तेव्हाच स्पर्धेचा निकाल जणू जाहीर झाला होता. हसणाऱ्यांचे हसे झाले होते. त्यांची तोंडे बंद झाली होती आणि तेव्हापासून वक्तृत्वस्पर्धा म्हटली म्हणजे सर्वांच्या डोळ्यांसमोर मीच उभा राहतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
निबंध 2

माझे पहिले भाषण

झोपाळ्यावर बसून मोठ्या मजेत माझे कवितावाचन चालू होते. विराट राजाचा पुत्र उत्तर, राणीवशात आपल्या शूरपणाच्या भाकडकथा ऐकवीत होता. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र त्याची कशी गाळण उडाली याचे मोठे मार्मिक वर्णन मोरोपंतांनी केले आहे. उत्तराच्या फजितीचे वर्णन वाचून हसायला आले. पण क्षणभरच ! दुसऱ्याच क्षणी उत्तराच्या जागी मला माझी मूर्ती दिसायला लागली. फरक एवढाच होता की उत्तर रणभूमीवर घाबरला होता आणि मी व्यासपीठावर ! 

मला अजूनही तो दिवस चांगला आठवतो. आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होते. उद्घाटनासाठी सुप्रसिद्ध लेखक श्री. रवींद्र पिंगे यांना पाचारण केले होते. मी स्नेहसंमेलनाची सचिव असल्यामुळे पाहण्यांचा परिचय करून देण्याचे काम साहजिकच माझ्याकडे आले.

एरवी अष्टौप्रहर बडबड करणारी मी ! मला ते काम फारसे अवघड वाटले नाही. त्यामुळे मी ते सहजपणे स्वीकारले. बाईंनाही माझ्या धीटपणाविषयी खात्री होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक छोटेसे पण सुंदर भाषण लिहून काढले. सुदैवाने स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे, एका दिवसात ते खाडखाड पाठ झाले. एकंदरीत माझ्या भाषणाच्या तयारीवर मी जाम खूष होते. आपल्या वक्तृत्वावर खूष होऊन श्रोतेजन टाळ्यांचा कडकडाट करीत आहेत, 

आपल्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे, बाई कौतुकाने आपली पाठ थोपटीत आहेत अशी स्वप्नं मला पडू लागली. बड्या पाहुण्यांसमोर मला मिळणार असलेल्या संधीचा माझ्या काही मैत्रिणींना हेवा वाटत होता तर काहींना माझे कौतुक वाटत होते.

भाषणाचा दिवस उजाडला. कार्यक्रमाची वेळ जवळ येऊन ठेपली. शाळेचा परिसर श्रोत्यांनी फुलून गेला होता. मा. पाहुण्यांचे स्वागत झाले. सुरेल आवाजात स्वागतगीत गायिले गेले आणि काय झाले कोणास ठाऊक. माझ्या मनात भीतीने हळूच शिरकाव केला. छाती धडधडू लागली. घशाला कोरड पडली. माझं नाव पुकारलं जाताच स्टेजवर चढण्याची कशीबशी हिंमत केली. पण माईकसमोर उभं राहिल्यावर तर माझा अक्षरशः अर्जुन झाला. नव्हे, उत्तर झाला.

म - म - मला, भा - भा - भाषण देण्याची भी - भी - भीती, असं म्हणून मी मटकन खाली बसले. झालेल्या फजितीमुळे मला स्वतःची इतकी काही लाज वाटत होती की पुढील कार्यक्रमातील एकही शब्द मला ऐकू आला नाही. तर असं झालं माझं पहिलं (आणि शेवटचं) भाषण.

तेव्हापासून मी भाषणाचा इतका काही धसका घेतला आहे की भाषण देणं सोडाच मी कोणाचं भाषण ऐकायलाही जायचं धाडस करत नाही. भाषणाला मी कायमचा रामरामच ठोकला आहे म्हणा ना ।

निबंध 3
 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे पहिले भाषण मराठी निबंध बघणार आहोत.  

तो दिवस मला अजून आठवतो. त्या वेळी मी पहिलीत होते. नगर-वाचनालयात वक्तृत्वस्पर्धा होत्या. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्या स्पर्धा असाव्यात. शाळेतील बाईंच्या व आईच्या सक्तीमुळे मी स्पर्धेत भाग घेतला होता. भाषण केलं की, बक्षीस मिळतं, प्रशस्तिपत्रक मिळतं, अशी लालूच त्यांनी दाखवली होती.

सकाळी नऊ वाजता पूर्ण तयारीनिशी, मोठ्या आत्मविश्वासाने व चेहऱ्यावर खोटे धैर्य धारण करून मी सभागृहात पाऊल टाकले. भाषणाची तयारी शाळेत बाईंनी व घरी आईनं छान करून घेतली होती. मीही त्यांना न अडखळता, सावकाशपणे भाषण म्हणून दाखवले होते. त्यामुळे मी नक्कीच बक्षीस पटकावणार या कल्पनेत त्या होत्या. मी सभागृहात गेले तेव्हा श्रोते फारच कमी होते. त्यामुळे मी निःश्वास सोडला. पण हळूहळू श्रोत्यांच्या संख्येत भर पडू लागली, तसतशी माझी भीती वाढू लागली व आत्मविश्वास कमी होऊ लागला.

सर्व श्रोते, स्पर्धक व परीक्षक जमले तरी अध्यक्षमहाराजांचा पत्ता नव्हता. अर्धा तास वाट पाहिल्यावर अध्यक्षमहाशय, आपण कोणी तरी 'खास' आहोत असे समजून प्रवेश करते झाले. भाषणांना सुरुवात झाली. इतर वक्त्यांची भाषणे ऐकून मी तयार केलेलं भाषण विसरल्यासारखे वाटू लागले. त्यांच्या भाषणातील वाक्ये तोंडात येऊ लागली, कानात घुमू लागली. 

तेवढ्यात माझं नाव पुकारलं गेलं. सर्वांचं लक्ष माझ्यावर केंद्रित झालं. जागेवरून उठून मी व्यासपीठापर्यंत गेले. मी व व्यासपीठ यांच्यात फक्त दहा-पंधरा पावलांचं अंतर होतं. पण मी इतक्या संथपणे व्यासपीठाकडे गेले की, माझ्या त्या अभूतपूर्व संथ चालीला सर्वजण हसायला लागले. भाषणाच्या दडपणाच्या मणा-मणाच्या बेड्या माझ्या पायात पडल्यासारखं वाटत होतं. संथ गतीला 'गज-गती' म्हणतात पण माझी चाल उससे भी जादा संथ होती. जसजसे श्रोते हसू लागले तसतशी मी अधिक बावरले.

या सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन मी कशीबशी व्यासपीठावर चढले आणि उसनं अवसान आणून मी सर्व भाषण न चुकता न अडखळता म्हणत होते. तरी श्रोत्यांमध्ये चुळबुळ का सुरू व्हावी मला काहीच कळेना. नंतर मी भाषण संपवून माझ्या जागेवर परतले तेव्हा समजलं की, मी इतक्या हळू आवाजात भाषण केले की ते माझ्याशिवाय कोणालाच ऐकू आलं नाही. 

टी. व्ही. चा आवाज बंद करून नुसता टी. व्ही. चालू ठेवला की, कशी नुसती तोंडं हालताना दिसतात, तशीच मी भाषण करताना दिसत होते. माझ्यानंतरची भाषणं जांभया देतच ऐकली. केव्हा एकदा सभागृहातून बाहेर पडीन असं झालं होतं. पण लगेच दहा मिनिटात स्पर्धेचा निकाल जाहीर होईल तेव्हा कोणी बाहेर पडू नये,' असं जाहीर करण्यात आलं, त्यामुळे थांबणंच भाग पडलं. आजच्या सभेत सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रकं मिळणार होती.

पुन्हा एकदा माझं नाव पुकारलं गेले. मी प्रशस्तिपत्रक घेऊन आले. या वेळी मात्र मी झटकन जाऊन पट्कन परत आले. पण काही का होईना, त्या पहिल्या प्रशस्तिपत्रकानं मला जेवढा आनंद झाला, तेवढा कदाचित् जिल्ह्यातील वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यावरही झाला नसेल!

निबंध 4 

माझे पहिले भाषण

१२ वर्षांपूर्वीचा तो काळ. ७ जून उजाडला. शाळा सुरू झाली. मीही माझा नवा गणवेश घालून नवे दप्तर, नवी
पुस्तके घेऊन शाळेला जाण्यास सज्ज झाले.
'आई, उशीर होतोय गं ! डबा आणतेस ना !'

'या नीलेची सतत गडबड आणि धांदल, चांगली सातवीत गेली पण गडबड काही संपत नाही.' असे पुटपुटत आई बाहेर आली नि डबा नीलेच्या ताब्यात दिला.

लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांना माझा फार अभिमान. आपली नीला मोठी हुशार आहे. ती मोठी झाल्यावर विदुषी होणार असे, तर तिने गृहीतच धरले होते. 'नीले, चांगली शीक ग बाई ! आम्हांला शिकायला नाही मिळाले. म्हणनच ही जन्माची ताबेदारी अन् चूल खंडाची गुलामगिरी चालू आहे बघ.' आपली मुलगी विविध कलांनी संपन्न असावी अशी तर तिची सुप्त इच्छा. एकदा तिच्या वाचनात 'वक्तृत्व कला ही अनेक ज्ञानाची जननी आहे, असे आले. धीटपणा, अभ्यास त्याच्यासाठी वाचन, विषयासाठी समर्पक मुद्दे काढणे आणि ते सर्वांसमोर उत्तम रीतीने सादर करणे. झाले, आईसाहेबांची ट्युशन सुरू झालीच.

भाषण कसे करावे, भाषण करताना कसे उभे राहावे, कितपत हातवारे करावेत, आवाज चढवावा कुठे, उतरवावा कोठे, याचे धडे रोज मिळू लागले. त्यातच गणेशोत्सव आला आणि शाळेत स्पर्धा सुरू झाल्या. माझ्यापेक्षा आईलाच जास्त आनंद झाला. मला मात्र खरेच वक्तत्व कलेत अजिबात गोडी नव्हती. परंत केवळ मातोश्रींच्या धाकाने आणि तिच्या हव्यासापोटी माझी भाषणाची तयारी सरू झाली होती. त्या काळात माझा गुरू आणि माझा श्रोता एकच होता, माझा आई.

तिच्या इशाऱ्यानुसार माझा आवाज वर-खाली होई. योग्य ठिकाणी थांबे घेई. आईसाहेबांची येणाऱ्या-जाणाऱ्यांपुढे तारीफ चाललेली असायची. 'आमची नीलू किनई दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाणार आहे, भाषण द्यायला.'
त्यावर्षी म. गांधींची जन्मशताब्दी सुरू होतो. त्यामुळे अखिल भारतात शाळाशाळातून-महाविद्यालयातून 'गांधी शताब्दी वर्ष' साजरे केले जात होते. त्यानिमित्त आमच्याही विद्यालयात मुलामुलींच्या वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. आणि आईच्या आग्रहाखातर मीही स्पर्धेसाठी नाव नोंदवले होते. 

आईसाहेबांचे मार्गदर्शन सुरू होतच. एकदाचा तो दिवस उजाडला. सात मिनिटांपर्यंत बोलायचे होते. माझा नंबर पुकारला. मी सुरुवात जोरात झाली, उत्सुकता वाढवली. माझी भीती ही कमी झाली होती. पाठीमागे बसलेल्या आई-बाबांकडे पाहायचेच नाही असे ठरवूनही चोरटी नजर जात होतीच. परीक्षक आणि भरगच्च भरलेला वर्ग अधूनमधून नजरेखाली येत होते. पायाला-हाताला कप सुटला होता परंतु मातोश्रींचे शब्द आठवले, 'आपल्यासमोर कोणीही बसले नाहीत असे समजून बोलायला सुरुवात कर...' अध्यक्ष महोदय... म्हटले अन् स्वतःला सावरत-सावरत सुरुवातीला उसने अवसान आणून केली.

 अफाट जमलेल्या विद्यार्थी आणि श्रोतृवर्गाकडे पाहून सर्वांगाला घाम फुटतो की काय असे झाले होते. टेबलाचा आधार घेत, क्षणभर डोळे मिटून घेतले आणि भाषण चालू ठेवले. श्रोतृवृंदातूनही खोकणे, खाकरणे चालूच होते, पण नंतर मी माझे भाषण घडाघडा बोलत राहिले. योग्य तयारीनुसार सर्व सुरू ठेवले होते. हावभाव करीत होतेच पण ते समजतही नव्हते... समोरचा समाजही अंधूक-अंधूक दिसत होता. विषयही संपत आला होता. वॉर्निंग बेल झाली अन् मी बोलणे आटोपते घेतले. 

महात्मा गांधीजींना वंदन करून व्यासपीठावरून खाली उतरले. टाळ्यांचा कडकडाट सातत्याने चालू राहिला. अंगाला भरलेले कापरे आता एकदम थंड पडायला लागले. खाली उतरून भराभरा निघाले ते आईच्या कुशीतच शिरले. आई-बाबा दोघेही शाबासकी देत होते. 'छान झालं. छान बोललीस' म्हणत होते. वाटत होते की ते कौतुकापोटी बोलताहेत,

 माझ्यानंतर तीन स्पर्धकांची भाषणे झाली. तिकडे माझे लक्षच नव्हते. मध्यंतराची अर्धा तास सुट्टी दिली. पुन्हा सभागह भरले. अध्यक्ष उभे राहिले त्यांनी पहिल्या क्रमांकासाठी माझे नाव जाहीर केले, मला तर आनंदयक्त धक्काच बसला पन्हा टाळ्याचा कडकडाट झाला आणि 'नीला देसाई' पहिल्याच भाषणात 'वक्ता' बनली. पण डोळ्यासमोर सारखी दिसत होती ती माझ्या आईची जबरदस्त इच्छा, तिचे प्रयत्न. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद