मी रायगड बोलतोय | Mi Raigad Boltoy Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी रायगड बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

किल्ले रायगडाच्या सहवासात आज कित्येक वर्षांनी माझी मनीषा पूर्ण होत आहे. शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या सहवासात आज मी हिंडत आहे-अगदी स्वच्छंदपणे. बालपणापासून शिवरायांविषयी मला विलक्षण ओढ. महाराष्ट्रापासून दूर अशा विदर्भभूमीत मी मोठा झालो; पण मला बाळकडू मिळाले ते शिवरायांच्या कथांतून. वाचण्याची कला अवगत झाली आणि साऱ्या कथांतील शिवाजी वाचून टाकला. 

शालेय जीवनात शिवाजीमहाराजांशी माझी घनिष्ठ ओळख झाली ती अभ्यासक्रमातील पुस्तकांमुळे आणि त्याहीपेक्षा शिवचरित्रावर निर्माण झालेल्या ललित साहित्यातून. 'श्रीमान योगी'ने मला एक आगळा स्वामी दाखविला; तर 'रायगडाला जेव्हा जाग येते'मध्ये मला एक मुत्सद्दी राज्यकर्ता पण दुःखी पिता भेटला. या साऱ्या पुस्तकांनी एकच कामगिरी केली आणि ती म्हणजे शिवरायांविषयीची विलक्षण ओढ माझ्या मनात निर्माण झाली. 

पुण्याला जावे, लाल महाल पाहावा, सिंहगड चढावा, पन्हाळ्यावर चढाई करावी, रायगडाला कवटाळावे अशी मला तीव्र इच्छा होती. त्यामुळे अनुकूल संधी मिळताच मी रायगडावर धाव घेतली. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्यालाही रायगडाच्या प्रेमाने पछाडले होते.

raigad killa marathi nibandh
raigad killa marathi nibandh

रेल्वे  व एस. टी. चा प्रवास संपवून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि काय गंमत! तेथील प्रत्येक दगड, ती पायवाट सारे मला ओळखीचे वाटू लागले. उलट शासनाने बांधून काढलेल्या पायऱ्याच मला अनोळखी वाटू लागल्या. रात्री आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडगावी मुक्काम केला. आपल्या वार्धक्यात जिजामाता येथेच मुक्काम करीत असल्याचे स्मरले. रायगडावरील राज्याभिषेकप्रसंगी राजांनी येथूनच मासाहेबांना गडावर नेले होते, याची आठवण होऊन मन भरून आले.

भल्या पहाटे आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. मुद्दाम जुनी पायवाट निवडली. या पायवाटेने राजे कितीतरी वेळा गड चढले असावेत, या विचाराने मन भारावले. इतर वेळी राजे घोड्यावरून चढले असतील; पण आग्याहून सुटून गोसाव्याच्या वेषात ते जेव्हा गडावर आले तेव्हा ते हीच पायवाट चढून गेले असावेत. महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीत या पायवाटेचेही स्थान महत्त्वाचे आहे. स्वराज्याचे अनेक मनसुबे तिच्या कानांवर पडले असतील.

रायगडाचे स्थान खरोखरीच इतके रमणीय आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडावे. गडाची चढण संपली आणि आम्हांला तहान लागल्याची जाणीव झाली. थोडीशी चौकशी केल्यावर आम्ही गडावरील 'गंगासागर' तलावावर येऊन पोहोचलो आणि ते स्वच्छ निर्मळ पाणी पाहून आम्ही सुखावलो. पोटभर पाणी पिऊन आम्ही काही काळ तेथेच विसावलो. भुकेल्या नजरेने आम्ही त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेण्यास निघालो. प्रत्येक जागा इतिहासाचे एकएक पान उलटवीत होती. 

याच ठिकाणी जिजाऊमातेने शिवरायाला आशीर्वाद दिला असेल या भावनेने भारावून जाऊन तेथील थोडी माती उचलून आम्ही अंगारा म्हणून कपाळाला लावली. नंतर आम्ही राजांच्या दरबारात प्रवेशलो. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. पण महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ दिलेली 'खडी ताजीम' माझ्या कानांत घुमली. अभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्टाने म्हटलेले संस्कृत मंत्र कानांत घुमू लागले आणि त्या दरबाराच्या अवशेषांनी सारा इतिहास मला ऐकविला. निसर्गाने या पवित्र वास्तूवर जेवढे प्रहार केले त्याहूनही अधिक फोडतोड माणसांनी केलेली पाहून मन कष्टी झाले.

महाराजांचा मोडकळीस आलेला महाल पाहताना त्या थोर राजाचे शेवटचे दिवस मला आठवले. तोफखान्याची जागा पाहून आम्ही पुढे सरकलो. टकमक टोक, हिरकणी बुरूज हयाएकएक जागा त्यागाच्या, धाडसाच्या कथा सांगत होत्या. आणि मग मला दिसली ती जागा, ज्या ठिकाणी ते थोर जीवन सपले; पण ते स्थानही एका इमानी, स्वामिनिष्ठ कुत्र्याचे स्तोत्र गात होते. आम्ही त्या श्रीमान योग्याच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि गड उतरू लागलो, पण आता पावले जड झाली होती.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 

mi raigad boltoy marathi nibandh no 2
मी रायगड बोलतोय मराठीनिबंध क्रमांक २

मित्राला लिहिलेले पत्र मी पुरे केले आणि पाकिटावर पत्ता लिहून पत्र बंदही केले. जवळच बसलेल्या बाबांनी सहजच पाकीट उचलले आणि म्हणाले, "अहो राजे, कोणत्या युगात आहात तुम्ही? आता कुलाबा जिल्हा राहिला नाही. आता त्याचे 'रायगड' असे नामकरण झाले आहे.” मी पटकन पाकिटावर दुरुस्ती केली. पण मनात आले की माझ्या आवडत्या 'रायगडाला' कसा विसरलो बरे?

खरं म्हणजे गडकिल्ले मला अत्यंत प्रिय आहेत. त्यांत रायगड म्हणजे मानाचा तुराच. या रायगडामुळेच या जिल्हयाला. 'रायगड' हे नाव मिळाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रायगडाच्या पुनर्भेटीसाठी माझे मन अगदी आतूर झाले होते; आणि काय योगायोग पाहा! आमच्या वर्गाची सहल रायगडावर नेण्याचे निश्चित झाले.

आम्ही रायगडावर पोहोचलो मात्र; आणि माझ्या कानांवर ते धीरगंभीर शब्द आदळले. "अरे थांब, थांब. एवढया आतुरतेने मला भेटण्यासाठी आलास, तेव्हा मला तुझे स्वागत केलेच पाहिजे." रायगड प्रत्यक्ष माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. “अरे दोस्ता, तुझ्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी फारच थोडी बरं. ही माणसे येतात ती सुद्धा अगदी सहलीच्या मूडमध्ये. येताना बरोबर ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर, पुस्तके, खेळांची साधने आणतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत येऊनही त्यांचे माझ्याकडे लक्षच नसते. ते आपल्याच दंगामस्तीत गुंग असतात. मग सांग, कोणाजवळ मी आपले मनोगत व्यक्त करायचे बरे!

“अरे मित्रा, मी माझ्या या जीर्ण थकलेल्या मनात केवढ्या आठवणी साठवून ठेवल्या म्हणून सांगू! कधी कधी मला माझ्या अस्तित्वाची भीती वाटते. हा सह्याद्री जर का रागावला ना, तर माझे उरलेसुरले अवशेषही गळून जातील आणि मग माझ्या या स्मृतिकोषातील ही सोनेरी पानेही नष्ट होतील. तीनशे वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की आजही माझे शरीर रोमांचित होते.

“ज्या पर्वतावर माझे अस्तित्व आहे, तो हा पर्वत म्हणजे 'स्वातंत्र्याचा रखवालदार' आहे. अनेक गड, किल्ले आजही तो सांभाळून आहे. या महाराष्ट्राचे रक्षण करायचे हेच हयाचे जीवनध्येय. अनेक आक्रमणांना त्याने आपल्या निधड्या छातीने थोपवून धरले. स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचे क्षणन् क्षण मी अनुभवले, त्याने बेहोष झालो. वेड्यासारखे स्वराज्याकरिता दौडणाऱ्या त्या वीरांना माझ्या दगडधोंड्यांचा त्रास होऊ नये म्हणून मी धडपडत असे.

“स्वराज्य स्थापन झाल्यावर राजधानी म्हणून राजांनी जेव्हा माझी निवड केली तेव्हा मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आता त्या शूरवीर राजाचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मी खूष होतो. पण त्या महात्म्याला उसंतच मिळाली नाही. नाना कामांत तो गुंतलेला असायचा. घरची आणि दारची नाना खटली त्याच्यामागे सतत असत. कधी एखादया रात्री तो येथे आला तरी नाना चिंतांनी ग्रासलेला असायचा.

"महाराज गेले आणि सारी रयाच गेली माझी! लढाईच्या वेळच्या तोफांचे भय नव्हते मला; पण घरभेदी माणसांचे कट माझे मन विदीर्ण करीत. इंग्रजांनी केले नाही इतके नुकसान स्वकीयांनी माझे केले. असे हे स्वकीय, महाराज निवर्तल्यावर येथे येत आणि जागोजागी मला खणत. त्यांना वाटे येथे महाराजांच्या वेळचे धन मिळेल. त्या वेड्यांना हे कळले नाही की माझ्याजवळ त्याहून फार मोठे धन होते आणि ते म्हणजे स्वदेशभक्तीचे'.

"ते धन फार थोड्यांनाच उमगले. शिवरामपंत परांजपे यांनी ते शब्दांत पकडले. गो. नी. दांडेकर यांना ते भावले, ब. मो. पुरंदरे त्या धनसंपत्तीने तृप्त झाले. आपल्या बंगल्यांना वा राज्यांना माझे नाव देऊन काय होणार? त्यासाठी हवी त्या थोर राजासारखी राजनिष्ठा, त्याच्यासारखे उज्ज्वल चारित्र्य ! पण आजकाल त्याचाच अभाव आहे. हेच माझे दुःख." रायगडाचा धीरगंभीर आवाज बंद झाला; पण मी मात्र रायगडाची ही कथा ऐकत ऐकत गडाच्या वरच्या भागात महाराजांच्या समाधीसमोर कधी येऊन पोहोचलो ते समजले देखील नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते

  • mi raigad boltoy marathi nibandh
  • raigad killa marathi nibandh
  • raigad killa essay marathi