रम्य सायंंकाळ मराठी निंबध | Ramya Saynkal Essay Marathi
मला अचानक आठवली ती महाबळेश्वरची सायंकाळ. महाबळेश्वरला जायचे म्हटले म्हणजे सूर्यास्त, सूर्योदय पाहिलाच पाहिजे आम्ही आणि आमच्यासारखे आलेले शेकडो प्रवासी त्या बॉम्बे पॉइंटवर जमलो होतो; आणि अगदी नजर न हालविता ती रम्य सायंकाळ आपल्या नजरेत भरून घेत होतो, पण मला एक गंमत जाणवली-
दिवसभर प्रकाशदानाचे काम करून अस्ताला जाणाऱ्या त्या सहस्ररश्मीलाही कशाची तरी ओढ लागली असावी! किती वेगाने उतरत होता तो. ते लाल वर्तुळ अस्ताला गेले, पण तरीही मागे आकाशात उरला 'लाल रक्तिमाच!' अशाच एका रम्य सायंकाळच्या दर्शनाने कूणा कवीची प्रतिभा पल्लवित झाली आणि तो म्हणाला, "उदय आणि अस्त दोन्ही स्थिती महात्म्यांना समानच असतात."
सायंकाळ म्हणजे संधिकाल. दिवस आणि रात्र यांना जोडणारा दुवा. त्यामुळे या दोघांच्यातील साऱ्या चांगल्या गोष्टी त्यात एकवटतात. खेडेगावात तर ही सायंकाळ घरी परतणाऱ्या गुरांच्या 'गोरजाने' अधिक धूसर होते. त्यांच्या गळ्यांतील घंटांचा नाद सारे वातावरण भरून टाकतो. वेगाने घरटयांकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रांगा दृष्टीस पडतात. तीच ओढ त्यांच्या पंखांत उतरलेली असते.

पाहता पाहता संधिप्रकाश संपतो आणि तमिस्रा आपले आधिपत्य गाजवू लागते. गावागावांत दूरवर दिवे लुकलुक लागतात. त्याचवेळी आकाशात एकामागून एक चांदण्या चमक लागतात.
अशाप्रकारे रम्य सायंंकाळ मराठी निंबध हा निबंध वरील प्रमाणे लिहीता येईल.
वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- एक निसर्गरम्य संध्याकाळ निबंध
- संध्याकाळ मराठी लेख
- मी पाहिलेली संध्याकाळ
- संध्याकाळचे वर्णन