शालेय जीवनातील गमतीजमती मराठी निबंधShaletil Aathvani In Essay Marathi
शालेय जीवनातील विनोद शाळेतील स्नेहसंमेलन चालू होते. राम-रावणाच्या जीवनातील पौराणिक नाटक विदयार्थी सादर करीत होते. नाटक फार रंगात आले होते. तीन हजार विदयार्थी श्वास रोखून रावण व मारुती यांच्यातील प्रवेश पाहत होते आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक! रावण झालेल्या पात्राला लावलेल्या नऊ खोट्या तोंडांपैकी एकएक तोंड गळून पडू लागले.
प्रथम प्रेक्षकांना काही समजेना. हा काहीतरी 'ट्रिक सीन' असावा असे त्यांना वाटले; पण सिंहासनावर आरूढ झालेला देशमुख मात्र त्यामुळे गोंधळन गेला. त्याला आपली वाक्ये आठवेनात. तेव्हा विदयार्थ्यांच्या लक्षात आले की, रावणाला लावलेल्या या कृत्रिम मुखवट्यांना सांधणारी दोरी तुटली आहे. मग काय हशाचा नुसता कल्लोळ उडाला!
राम-रावण युद्ध होण्यापूर्वीच दशानन रावणाचा पराभव झाला होता आणि सगळ्या नाटकाचा बट्ट्याबोळ झाला होता. असे हे स्नेहसंमेलन होऊन कितीतरी दिवस लोटले, तरी ही विनोदी घटना आम्ही विदयार्थी विसरू शकलो नाहीत. जय शाळेच्या जीवनातील असे हे विनोदी प्रसंग म्हणजे वाळवंटातील 'ओयासिसच' जणु! आम्ही विदयार्थी विनोदासाठी नेहमीच आसुसलेले असतो. त्यासाठी आमचे काही ना काही उपद्व्याप चालूच असतात.
राम-रावण युद्ध होण्यापूर्वीच दशानन रावणाचा पराभव झाला होता आणि सगळ्या नाटकाचा बट्ट्याबोळ झाला होता. असे हे स्नेहसंमेलन होऊन कितीतरी दिवस लोटले, तरी ही विनोदी घटना आम्ही विदयार्थी विसरू शकलो नाहीत. जय शाळेच्या जीवनातील असे हे विनोदी प्रसंग म्हणजे वाळवंटातील 'ओयासिसच' जणु! आम्ही विदयार्थी विनोदासाठी नेहमीच आसुसलेले असतो. त्यासाठी आमचे काही ना काही उपद्व्याप चालूच असतात.
शिक्षकांचे लक्ष नाही हे पाहून एखादया दोस्ताच्या शर्टाला 'हे विकाऊ गाढव आहे'-अशी चिठ्ठी लावली जाते. मग ओठ दाबून हसण्याची खसखस पिकते. तरीपणचाणाक्ष गुरुजी ओळखतात की, वर्गात काहीतरी गडबड आहे. मग आमच्या या विनोद बुद्धीची गणना 'वाहयातपणा'त होते.
'टवाळा आवडे विनोद' हे समर्थांचे मत गुरुजी आम्हांला नेहमीच सुनावीत असतात. पण 'जीवनातील तारुण्याचे खरे रहस्य विनोदात दडले आहे,' हा विनोदाच्या भाष्यकाराचा-आचार्य अत्रे यांचा संदेश हे आमचे 'आचार्य' मात्र सोयिस्करपणे विसरलेले असतात. वर्गातील विनोदाला खरा बहर येतो तो मोकळ्या तासाच्या वेळी. मग वर्गातील अनेक विदुषकांच्या कल्पनाशक्तीला बहर येतो.
उत्तम विनोद निर्माण करण्यासाठी तल्लख बुद्धीची आणि बहुश्रुततेची नितांत आवश्यकता असते, याची प्रचीती तेव्हा येते. अशा मोकळ्या तासाच्या वेळी एखादा 'पुस्तकी किडा'रूपी स्कॉलर वर्गाच्या एखादया कोपऱ्यात हमखास अभ्यास करीत बसलेला आढळतो. असा हा वर्गमित्र वर्गाला विनोदासाठी उत्तम विषय ठरतो. मग सारा वर्ग त्याच्यामागे हात धुऊन लागतो. कित्येकदा हा स्कॉलरही आपली गंभीरपणाची कात टाकून खेळकरपणा स्वीकारतो व मग तोही शालेय जीवनातील विनोदाचा आस्वाद घेऊ लागतो.
शालेय जीवनात असे अनेक प्रकारचे विनोद घडत असतात. कधी कधी पाठ्यपुस्तकातील लेखकांच्या वा प्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रांना दाढीमिश्या लावून त्यांना विविध रूपे दिली जातात आणि मग एखादा सात्त्विक वृत्तीचा लेखक पक्का दरोडेखोर झालेला दिसतो. स्नेहसंमेलन, सहली अशा प्रसंगी तर विनोदाला बहर येतो. एकदा आमच्या वर्गात एक खुप लठ्ठ मूलगी होती आणि तिचे नाव होते 'शशी',
सहलीत 'फिश पाँड'च्या कार्यक्रमात तिला 'फिश पाँड' मिळाला शशी वाढतो कलेकलेने। शशी वाढते किलोकिलोने॥
शालेय जीवन संपले, तरी शालेय जीवनातील या गमतीजमती, हे विनोद विसरले जात नाहीत. ते सदैव आपल्या स्मरणात राहून आपले जीवन फुलवीत असतात.
वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- माझ्या आठवणीतील शाळा निबंध
- शाळेत घडलेला विनोदी प्रसंग निबंध
- शालेय जीवनातील आठवणी निबंध