ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi
ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi नमस्कार मित्रांनो होळी येते तीच मुळी रंगांची उधळण करीत. रंगपंचमीच्या दिवशी तर लहानमोठे सारेजण रंग उडविण्यात रंगून जातात. रंगाची पिचकारी सगळ्याच्या कानात ती गोड बातमी सांगते आणि सर्वांना मोहरवून टाकते. 'वसंत आला, जादूगार वसंत आला' शिशिराच्या जीवघेण्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी पुन्हा एकदा अंग झटकून रंगांचा झिम्मा खेळावयास तयार होते. कारण दारी आलेला असतो तिचा आवडता अतिथी 'ऋतुराज वसंत!'
आपल्या अंगावरची राजेपणाची वस्त्रे उतरवुन हा खेळकर वसंतही चैतन्यमय खेळात निसर्गदेवतेला सामील करून घेतो. हे कौतुक पाहावयास सहस्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळू लागतात. नेहमीच्या परिचित पक्ष्यांबरोबर पीलक, गोविद, तांबट, बुलबुल या साऱ्यांची गर्दी ऋतुराजाच्या स्वागतासाठी होते.
आपल्या अंगावरची राजेपणाची वस्त्रे उतरवुन हा खेळकर वसंतही चैतन्यमय खेळात निसर्गदेवतेला सामील करून घेतो. हे कौतुक पाहावयास सहस्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळू लागतात. नेहमीच्या परिचित पक्ष्यांबरोबर पीलक, गोविद, तांबट, बुलबुल या साऱ्यांची गर्दी ऋतुराजाच्या स्वागतासाठी होते.
ऋतूचे चक्र फिरते आणि त्या गतीबरोबर पायाखालची भूमी आणि डोक्यावरचे आकाशही नवे रंगरूप धारण करते. निसर्ग जणू माणसाला चकवून कातच टाकीत असतो. आंब्यांच्या झाडांवर फुललेल्या मोहराचा सुगंध बातमी देतो. शिशिर संपला, उठा आणि वसंताचे स्वागत करा. काजू, शेवगा यांच्यावर फुललेली नाजूक फुले फळांच्या आगमनाची सुवार्ता देतात. शिरीषाची झाडे जांभळट गुलाबी नाजूक फुलांच्या शृंगाराने नटतात. जाई, जुई, सायली, मोगरा, चंपक ही सारी सुगंधी मंडळी ऋतुराज वसंताची संध्याकाळ जणू सुगंधमय करतात.
पाहता पाहता आसमंत बदलतो. कुणा जादूगाराने आपली जादूची काठी फिरविली की काय असे भासते. या किमयेने कविमनांवरही आपली सत्ता संपादित केलेली असते. 'आला हा वसंत फेरीवाला' म्हणून कुणी कवी त्याला साद घालतो. कुणाला हा पाहुणा प्रत्यक्ष देवाचा प्रेषित भासतो. वसंताच्या आगमनाने बेहोष झालेला निसर्ग रंग, रूप, गंध यांची पूजा मांडतो. एक आगळे चैतन्य त्याला लाभते. आनंद, उत्कटता, काव्य, संगीत आणि सौंदर्याचा सौदागर असा हा सर्वगुणसंपन्न ऋतुराज आहे म्हणूनच कवी त्याला आळवितो, 'हा प्रसाद काव्यामधला कविसम्मत.' मित्रांनो तुम्हाला वसंत सर्व ऋतुंचा राजा मराठी निबंध vasant essay in marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्यवाद