भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक
Autobiography of An Old temple in Marathi essay
भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक : सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.
Autobiography of An Old temple in Marathi essay |
“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.
वरील निबंध भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद