एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi 

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi :"मला बोलू दया. माझा आवाज बंद करू नका. कारण मी आता शेवटचे क्षण मोजत आहे. आज सकाळचे ते भीषण क्षण मी विसरू शकत नाही. असा कोणता गुन्हा मी केला होता की मला हे एवढे शासन झाले! खरंच सांगते. अहो, मला अजन जगायचे होते. माझ्या सुपूत्रांची मला अजन सेवा करायची होती. पण या आडदांड जगाने मला ‘राम म्हणण्याची वेळ आणली हो! पुढे एस. टी. बस म्‍हणाली.

“तसे माझे वय काही फार झाले नव्हते. माझा जन्म होऊन पुरती पाच वर्षेही झाली नाहीत. हा जन्म, हे रूप घेण्यासाठीही मला अतोनात कष्ट साहावे लागले. लोखंडी घणाचे प्रहार व धगधगत्या अग्नीचे चटके; सारे मी सहन केले. कशासाठी? केवळ तुमच्यासाठी. माझ्या लालचुटूक रंगावर मी खूष होते. 'रस्ता तेथे एस्. टी.' हेच मुळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य. त्यामुळे या लहानशा आयुष्यातही मी महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळला. गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून धावले. खडबडीत दगडी रस्ते पार केले, उंच सरळ चढण चढले आणि तेवढीच उतरलेही. अनेक घाटांतून अवघड वळणे घेत घेत आयुष्य काढले.

st-bus-essay-in-marathi
st-bus-essay-in-marathi
"हे सारे मी कोणासाठी करीत होते? तर माझ्या गरीब देशबांधवांसाठी. श्रीमंतांजवळ स्वतःची वाहने असतात. मनात आले की ते केव्हाही कोठेही जाऊ शकतात. पण खेडोपाडी राहणारे अनेक गरीब लोक असतात, त्यांच्या प्रवासाची चिंता कोणी करावी? या लक्षावधी माणसांची सेवा करावी हेच माझे जीवनध्येय होते. एकदा एक गरीब खेडूत दुसऱ्या एका प्रवाशाला म्हणत होता, '

अरे आपण कुठे गरीब आहोता ही दोन-अडीच लाखांची लाल एस्. टी. आपलीच नव्हे का!' तेव्हा मला अगदी धन्य धन्य वाटलं. मी आणि माझ्या इतर शेकडो भगिनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन पोहोचलो. त्यामुळे खेड्यांचा विकास होऊ लागला. ज्या खेड्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच येत नव्हता ती मागासलेली होती. तेथील मालाला बाजारपेठ दिसत नव्हती. हे सारे प्रश्न आमच्यामुळे सुटले. आपल्यामुळे माणसाचे जीवन सुसहय होत आहे हे पाहून कष्टाचे काही वाटत नव्हते.

"त्यावेळीही एक गोष्ट मनाला डाचत होती. हे प्रवासी इकडे तोंडाने 'आमची गाडी' म्हणायचे, पण गाडीची स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करायचे नाहीत. एस्. टी. आपलीच म्हणून जेथे बसायचे तेथेच घाण करायचे. सकाळी छानपैकी न्हाऊन माखून आलेल्या माझे रात्रीपर्यंत रूप पाहण्यासारखे व्हायचे. शेंगांची टरफले, केळ्यांच्या साली अशी गलिच्छ आभूषणे मला नित्य बहाल केली जायची.

 माझा उपयोग करणारे लोक माझी खुशाल मोडतोड करायचे. कुठलाही संघर्ष, संप उभा राहिला की आमच्यावर दगडांचा मारा. कधी कधी जाळपोळही सहन करावी लागे. मला चालविणारे चालकही अनेक. काही काही इतक्या निर्दयपणे माझ्याशी वागणूक करीत की, त्यामुळे माझी गात्रेच खिळखिळी होत. देखभाल, तेलपाणी यांबाबत तर निराशाच होती. तरी 'सेवा हाच माझा धर्म' असल्याने वर्षातील तीनशे दिवस तरी मी रस्त्यावर धावत असे."

“आज हाच रस्ता माझी मृत्युभूमी ठरला. मी रोजच्याप्रमाणे धावत होते. चालकही चांगला होता. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला बक्षीस मिळाले होते. पण एका बेजबाबदार ट्रकचालकाने आपला रस्ता सोडला आणि तो सरळ माझ्या अंगावरच चालून आला. माझे तुकडे तुकडे झाले दोन्ही गाड्यांचे चालक आणि कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले. कोणत्याही दुरुस्तीपलीकडे मी आता आहे. या क्षणी मला एकच प्रश्न ग्रासतो आहे, यात माझी चूक कोणती? माझ्या सेवाव्रताला हेच फळ का? कोण देईल माझ्या या प्रश्नांची उत्तरे?

टीप : वरील निबंध एस. टी. बसचे आत्मवृत्त या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • Bus Essay in marathi