एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्मकथनात्मक
एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्मकथनात्मक : "माझे कथन सुरू करण्यापूर्वी प्रथम मीया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. दूरचित्रवाणीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. कारण त्यांनीच मला तुम्हा सर्वांसमोर उभं राहण्याची ही संधी दिली आहे. मी आता 'उभं राहण्याची' असा उल्लेख केला, पण तो वास्तव नाही; कारण मी आता तुमच्याशी बोलत आहे ते बसूनच. कारण मी कधीच उभा राहू शकलो नाही. त्याचं कारण म्हणजे मी जन्मतः अपंग आहे. तुम्हा सर्वांसारखा मी स्वतःच्या पायांवर कधीच उभा राहिलो नाही.
“मी वर्षाचा झालो. तेव्हाच माझ्या आईच्या हे लक्षात आलं. ती माऊली निश्चित हबकली असणार, पण माझी आई मोठी धीराची होती आणि आईमुळेच मी आज तुमच्यासमोर निराळ्या अर्थाने उभा आहे. अपंग असूनही स्वावलंबी आहे. मला उभं राहता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांनी सर्व उपाय योजिले. डॉक्टरी इलाजांबरोबर इतरही सर्व उपाय योजिले गेले. पण मी उभा राहू शकणार नाही असं निश्चित झाल्यावर माझ्या आईने मला वेगळ्या अर्थाने उभे केले.
"माझे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माझ्यासाठी चाके लावलेला एक पाट तयार करण्यात आला. या पाटावर बसून मी सर्वत्र हिंडत असे. इतर मुले धावाधावी, छपाछपी खेळत ते पाहून माझ्या या अवस्थेबद्दल मला वाईट वाटे. पण ही उणीव माझी आई भरून काढीत असे. ती माझ्याशी त-हेतहेचे खेळ खेळत असे.
कथा, कविता व इतर माहिती सांगत असे. आज माझ्या लक्षात येते की, त्यावेळी आईने मला ज्या कथा सांगितल्या त्या सर्व कथा संकटांवर मात करणाऱ्या शूरांच्या असत. त्यांतील सूर्यसारथी अरुणाची कथा मला अधिक जवळची वाटे. त्या कथांनी माझे मन उभारले गेले. आपल्यातील उणिवेची मला कधी खंत वाटली नाही. आपण आपल्या व्यंगावर मात केली पाहिजे असे वाटू लागले.
eka apangache atamkathan essay marathi
“घरी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांनी माझ्यासाठी तीन चाकांची खुर्ची तयार केली. तीत बसून मी शाळेत जाऊ लागलो आणि खरं सांगतो, तेथे मला एक विलक्षण आनंद गवसला. खुर्चीवर बसून प्रवास करताना अनेक अडचणी येत. पण माझे दोस्त मला मदत करीत. शाळेत ते जेव्हा कोणताही खेळ खेळत तेव्हा मी पंचाचे काम करीत असे; आणि त्यांच्याइतकाच खेळाचा आनंद लुटत असे.
माझ्या अपंगत्वाचा त्यांनी कधीच उपहास केला नाही. मला आठवतं, एकदा शाळेत एका मुलानं माझा उल्लेख 'पांगळा' असा केला, तर माझ्या एका मित्राने त्याच्या खाडकन मुस्कटात दिली. एकंदरीत दोस्तांच्या बाबतीत तर मी अतिशय भाग्यवान ठरलो आहे. आपण केलेल्या चुकीची भरपाई करण्यासाठी परमेश्वराने मला बुद्धिमत्ता बरी दिली असावी म्हणूनच की काय शालेय व महाविदयालयीन शिक्षण मी विशेष गुणवत्ता मिळवून पार पाडू शकलो.
“एम्. एस्सी. झाल्यावर मी स्वतःचा छोटासा रासायनिक कारखाना काढला. त्यावेळी अनेकांचे मदतीचे हात मला मिळाले. आज माझा हा कारखाना नावारूपाला आला आहे; त्याचे कारण हे सारे सहकाऱ्यांचे हात! माझ्या कारखान्यात मी नेहमी अपंगांचीच नेमणुक करतो. माझ्या आईने जे रोपटं माझ्या मनात फुलविलं तेच इतरांच्या मनांत फुलविण्याचा मी यत्न करतो. त्यासाठीच हा मुलाखतीचा प्रपंच. माझ्या दोस्तांनो, तुमच्यातील उणीव विसरून जा. तिचे भांडवल करू नका. प्रयत्नाच्या मार्गावर तुम्ही धावू लागा आणि मग तुम्हांला आढळेल की, असे कितीतरी जण तुमच्याबरोबर धावत आहेत."
टीप : वरील निबंध एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्मकथनात्मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
apang vyakti chi atmakatha in essay in marathi
निबंध
एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध
शाळेतून एका कारखान्याला भेट दयायला आम्ही गेलो होतो. तेथे काम करणारे सर्वजण अपंग होते. पण आपण अपंग असल्याची त्यांना जाणीवच नव्हती. एकमेकांना मदत करून ते आपली कामे करीत होते. त्यांची ती कामसू वृत्ती पाहून मला त्यांचा अभिमान वाटला.
दुपारी जेवायची सुट्टी झाली तेव्हा त्या कारखान्यातील सर्व मंडळी एकत्र जमली आणि गप्पागोष्टी सुरू झाल्या. त्यांतील एका मुलीने आपली कहाणी आम्हांला ऐकवली. तिचे नाव होते सुनेत्रा. खरोखरच तिचे डोळे फार सुरेख होते. पण तिचा उजवा हात आणि उजवा पाय यांत काहीच बळ नव्हते.
सुनेत्रा म्हणाली, " मी दोन वर्षांची असताना मला ताप आला आणि त्या तापातच मी हातापायांचे बळ हरवून बसले. माझ्या आईवडिलांसाठी हा मोठा धक्काच होता. खूप उपाय केले त्यांनी. पण पोलिओने माझ्या अर्ध्या अंगाचा ताबा घेतला होता. त्या धक्क्यातून प्रथम सावरली ती माझी आई. स्वतःच्या कष्टांची पर्वा न करता तिने मला घडवले.
"एका सामाजिक संस्थेने मला चाकांची खुर्ची दिली आणि मग मी आईच्या मदतीने रोज शाळेत जाऊ लागले. शालान्त परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. माझ्या आईला या तंत्रशिक्षण शाळेची माहिती कळली होती. प्रसिद्ध समाजसेविका नसीमा हुरजुक यांनीच ही संस्था काढली आहे. तेथे आवश्यक ते शिक्षण घेऊन आता मी या कारखान्यात काम करते. आता मी पूर्ण स्वतंत्र आहे.
"आम्ही अपंग असलो तरी आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही. आम्हांला कुणाचीही दया नको. आम्हीच एकमेकांना मदत करतो. हा कारखाना अपंग चालवत असले, तरी याचे उत्पादन इतर कोणत्याही कारखान्यातील उत्पादनापेक्षा सरसच आहे, याचा मला अभिमान आहे." मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .
[शब्दार्थ : अपंग-a disabled person. अपं. विकलांग। सावरलीrecovered (from shock). माघातमाथी बा२ ॥वी. उबर सकी, धैर्य धारण किया। तंत्रशिक्षण शाळा- technical school. तउनीही स्टूस.. तकनीकी स्कूल। सरस- superior. याउयातु. अधिक, अच्छा, बेहतर।]