मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चहा बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चहाच्या उगमापासून ते आजपर्यंत चहा मानवी जीवनात कोणते चांगले वाईट बदल घडवून आणतो हे सांगितले आहे.  यात चहा स्वतः त्याची मनोगत सांगत असल्याने निबंध खूपच  मनोरंजक होतो.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

प्रवास अगदी कंटाळवाणा झाला होता. केव्हा एखादे स्टेशन येते आणि आपण कपभर चहा घेतो असं मला झाले होते. वेळ होती मध्यरात्रीची. बाकीचे प्रवासी शांतपणे झोपले होते. गाडीचा वेग मंदावला, स्टेशन आले. पण माझी मनीषा काही पूर्ण झाली नाही, कारण चहावालाही शांत झोपला होता. अस्सा राग आला तेव्हा त्याचा.

गाडी पुढे निघाली आणि काय चमत्कार! एक वाफाळलेला चहाचा कप माझ्यापुढे आला, मी कप उचलणार तेवढ्यात आवाज आला, “मी चहा आहे. तू माझी आठवण काढलीस ना, म्हणून मुद्दाम आलो. अरे, मी तुझ्या देशातीलच आहे आणि आता सर्वांच्या इतक्या परिचयाचा झालो आहे की काही वेळेला ‘अतिपरिचयात् अवज्ञा' असाही अनुभव येतो.

माझे पूर्वज मूळचे चीनमधील. चीन या देशानेच साऱ्या जगाला माझी देणगी दिली आहे. खरं पाहता आपल्या भारतात आसाममध्येही माझे पूर्वज फार पूर्वीपासून अस्तित्वात होते. पण कोणाचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात माझा खरा विकास साधला. आज भारताला मी आणि माझे बांधव बरेच परकीय चलन मिळवून देतो."

Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi
Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

"खरं सांगू का, मला माझा विशेष अभिमान वाटतो तो वेगळ्या गोष्टीसाठी. आज या भारतात एवढी विषमता आहे. गरीब-श्रीमंत हा केवढा भेदभाव आहे; पण माझ्याजवळ असा कोणताच फरक नाही. आलिशान बंगल्यात माझे जेवढे अगत्याने स्वागत होते तेवढीच एखादया झोपडपट्टीत केले जाते. एखादया विद्वान साहित्यिकाला, संशोधकाला माझी जेवढी गरज असते तेवढीच यंत्रावर काम करणाऱ्या कामगारालाही माझी आवश्यकता असते. सर्वांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे असे उत्तेजक पेय माझ्यापासून तयार करता येते.

“मळ्यातल्या छोट्या छोट्या झुडपांवर माझा जन्म होतो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हिमालयाच्या पायथ्यावर दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरे, कांगा खोरे अशा भारतातील विविध भागांत मी व माझे भाईबंद जन्माला येतो. आमची खुडणी भारतात हातांनीच केली जाते. खुडणी करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीवर पिशवी असते, त्यांत त्या आमची पाने टाकतात. तेथन आमची पाठवणी कारखान्यात होते, तेथे यंत्राच्या साहाय्याने वळविणे, वाळविणे वगैरे क्रिया होतात आणि मग खास प्लायवूडच्या पेट्यांतून आमची देशोदेशी रवानगी होते."

“मित्रा, साखर, दूध व पाणी यांच्या संयोगाने तुम्ही आमचा आस्वाद घेता. काही. देशात दुधाचा वापर न करता लिंबू, लोणी यांचा उपयोग करतात. काही लोक आमच्यावर टीका करताना 'टॅनिनचा' गाजावाजा करतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. फार उकळविल्याने टॅनिन पेयात उतरते त्यात आमची काय चूक ? उलट चहा हे शरीराला हितकारक व उत्साहवर्धक पेय आहे
.

आवाज थांबला, पण माझा कंटाळा आणि आलेली मरगळ केव्हाच संपली होती. गाडी कुठल्यातरी स्टेशनात थांबली आणि एक चहावाला न बोलावताच माझ्यासमोर चहा घेऊन उभा ठाकला होता!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

chaha che atmavrutta in essay in  marathi

तुमची नि माझी खूप गट्टी आहे. कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या, म्हणजे चहाच्या सेवनाने होते. चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही. कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की, तुम्ही माझी आठवण काढता.

एक कप गरमागरम चहा मिळाला की, पुन्हा कामाला, पुन्हा अभ्यासाला सुरुवात ! संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच.  तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो. तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी. आता भारतात माझी खूप लागवड होते. 

ज्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, तेव्हा येथे आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझी खूप लागवड केली. आसाममधील ब्रह्मपुत्रेचं खोरं, हिमालयाच्या पायथ्यावरील दुआर व तराईचा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरं येथे आमची खूप लागवड केली जाते. आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की, परदेशात आमची निर्यात होते. भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो.

आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला. स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात. दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्या टोपलीत टाकतात. तेथून आमची पाठवणी कारखान्यात होते. पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात. यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं, वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं. तेव्हा तेथे आम्हांला विविध नावे मिळतात.

आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे. श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते. माझ्यापासून उत्तेजक पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात. बहुसंख्य लोक पाणी, दूध, साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात. काही देशांत चहात लिंबू, लोणी टाकतात, तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात, कुणाला चहा फार कडक लागतो, तर कोणाला अतिशय सौम्य लागतो.

कोणी टीकाकार चहाला अपेय ' मानतात. त्यांतील टॅनिनचा ते बागुलबुवा करतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्याच न्यायाने 'चहाबाजपणा' तापदायक होतो. त्याचे  व्यसन जडते. तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हांला माझी मोलाची मदत होते. अशी आहे ही तुमच्या-माझ्यातील दोस्ती!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • चहाचा जुना परिचय 
  • दिवसाची सुरुवात 
  • चहा चीनमधून आला 
  • लागवडीची पद्धत
  • अनुकूल वातावरण व जागा
  • कारखान्यात होणारे संस्कार 
  • सर्वत्र मागणी
  • श्रीमंत, गरीब
  • बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
  • सर्वांना उत्तेजन देतो
  • तरी टीका
  • जीवनात चहाला आगळे त्त्व.

टीप : वरील निबंध मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते.
  • mi chaha boltoy nibandh in  marathi