सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of Lion in Marathi Essay
सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंधआत्मकथनात्मक :या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.परवा मोठी गंमतच झाली. आम्ही सर्कस पाहावयास गेलो होतो. सर्कशीतील प्राण्यांचे कार्यक्रम मला विशेष आवडतात.
वरील निबंध सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंधआत्मकथनात्मक निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of Lion in Marathi Essay
वनराज आणि तोही पिंजऱ्यात? आश्र्चयाची गोष्ट नाही. सर्कशीतल्या सिंहाबाबत तर ही ठरलेली गोष्ट आहे. जंगलावर हुकूमत गाजविणारा हा राजा येथे मात्र असहायतेने पिंजऱ्यात इकडून तिकडे फिरत होता.
मी पिंजऱ्याजवळ गेलो. मला पाहून जणू तो बोलू लागला."मित्रा! आज सर्कस पाहायला आलास. माझेही खेळ बघितलेस.छान मनोरंजन झाले असेल तुझे नाही? तू हसलास! अगदी मनसोक्त अन् खळखळून! पण त्याच वेळी माझ्या डोळ्यांतून घरंगळलेले दोन अश्रू कोणाच्याही नजरेने टिपले नाहीत.
तुमची करमणूक करण्यासाठी मी येथे आहे. माझं खरं खूप वेगळं असं अस्तित्व जंगलातच मागे सोडून मी आलोय. पिंजऱ्यातला हा 'मी' जणू 'मी' नाहीच मुळी! कोणी तरी दुसरा बहुरूपी आहे. खरं तर जंगलाचा मी राजा... जंगलातले ते दिवस... सारं काही रम्य... त्या आठवणी ताज्या आहेत.
प्रत्येक क्षणी त्या माझ्याबरोबर आहेत. स्वच्छंद प्राणी व पक्षी, मोकळं आकाश, किर्र झाडी, जंगली सारी श्वापदं, कधी वाट चुकलेले वाटसरू, कधी येणारे शिकारी, जंगलात बेसावध हरिणांची शिकार , शिकार मिळविण्याची ती धडपड अन या साऱ्यांवर मात करणारा माझा रूबाब , माझा देखणा पराक्रम , माझी गर्जना.... हे सारं सारं या पिंजऱ्यात नाही रे!....''
"मित्रा ! आज तू माझ्यासमोर उभा आहेस. समजा येथूनच तुला कोणी पकडून नेले व कैद केले तर काय होईल? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटे उभे राहिलेत ना? मग माझी तर ही वास्तव कहाणी तुझ्यासमोर आहे. सांग मला , माझं खर अस्तित्व कोठे शोधू? परत ‘जंगलाचा राजा' कसा बरे बनू? मुक्या प्राण्यांनाही भावना असतात.
हे तुम्हा ‘भावनाशून्य' माणसांना का बरे कळू नये? दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणताना तुमचे मन का शहारत नाही? चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर मनोहर छावा म्हणून माझी छबी होती. माझ्या मातेसह मी वनात विहार करीत होतो.
अन् अचानक बेसावधपणे एका खड्डयात पडलो. तेथूनच मला पिंजऱ्यात अडकविले गेले अन् या सर्कशीत आणले. आज एक 'शो पीस' सारखी माझी अवस्था आहे. माझे मित्र, आप्तेष्ट , माझे घर या साऱ्यांना मी मुकलो आहे, मन थिजले आहे, हृदय रक्तबंबाळ झाले आहे. माझी करुण याचना कुणाच्या लक्षातही येत नाही.
माझ्याजवळ येणाऱ्यांना अजूनही माझी देखणी नजर , सुंदर आयाळ , मदहोश चाल यांचा मोह पडतो. सर्वजण खुश होतात . पण माझं स्वातंत्र्य माझ्याकडे नाही या गोष्टीची कोणालाही पुसटशी जाणीवसुद्धा होत नाही.'
"खायला-प्यायला भरपूर मिळत असले तरी चाबकाच्या फटकाऱ्यांनी ही मेजवानी मला पचवावी लागते. पुढे माझ्या भवितव्याचं काय? पिंजरा अन् त्यात आयुष्य कैद, हीच कां माझी जीवनाची प्रतिमा? मित्रा,
पारतंत्र्याच्या या पिंजऱ्यात वनराज मी बंदिस्त मुक्यांच्या व्यथा बोलक्या.... मिळेल का मज वरदहस्त? 'अस्तित्व' गहाण पडले माझे सर्कशीच्या रिंगणात पा. समजेल कां कुणी काय दुःख दाटले मम मनात कधी फिरूनि येतील ते स्वातंत्र्याचे दिवस? अजूनही आशा आहे
मला माझी ही गुलामी मला खरंच रे आवडत नाही निसर्गानं बहाल केललं माझं जंगलच मला प्रिय आहे. या लोखंडी गजाच्या दुनियेत माझ्या मनाला गंज चढत आहे. माझं आयुष्य विनाशाच्या खाईत ढकलले जात आहे. जंगलात माझी गरज जास्त आहे.
मित्रा, सांग रे माझी ही व्यथा साऱ्या जगाला ओरडून सांग दुसऱ्यांच्या अश्रुत आपली करमणूक शोधू नका म्हणून आणि कोणत्याही मुक्या प्राण्याला वा पक्ष्याला कैद करू नका" आवाज बंद झाला. मनाची कवाडे खाड़कन उघडी झाली. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद