एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक | shetkari manogat in marathi essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध shetkari manogat in marathi essay आत्मकथनात्मक या विषयावर निबंध बघणार आहोत . शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे तो स्वता अहोरात्र मेहनत करून पिक घेत्याचा प्रयत्न करतो पण सरतेशेवटी त्याचे हे प्रयत्न अस्मानी किंवा सुलतानी संकटांनी प्रयत्न वाया जातात ,सरकार शेतकऱ्याची करू इच्छीते पण ती मदत खरच शेतकरऱ्यापर्यंत पोहचते का ? या सर्वांचा परीणाम म्हणुन शेतकरी कश्याप्रकारे आपले मत व्यक्त करतो याचे वर्णन याचे वर्णन एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध या निबंधात केले आहे. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
निबंध लिहीताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे
- बिकट अवस्था
- अवर्षणाची किंवा अतिवृष्टीची टांगती तलवार
- कृषिप्रधान देश
- शासनाची तुटपुंजी मदत
- संरक्षण नाही
- पुरेशा साधनसामग्रीचा अभाव
- बाजारात अनेक अडचणी
- उत्पादनास योग्य भाव मिळत नाही
- परिणामी शेतकरी गरीब, कर्जबाजारी
- आत्महत्येसारख्या घटना
- शेतकरी सुखी, तर देश सुखी
"लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा.
शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..
shetkari manogat in marathi essay |
"हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे.
गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग तो त्या च्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतो व कर्जबाजारी होतो. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. जेव्हा शेतकरी दुष्काळग्रस्त (dushkal grast ) होतों तेव्हा् त्याच्यावरील संकट अधिकच मोठे होते. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.
"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.
"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्यवाद .
Essay no 2
निबंध क्रमांक २
एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक | shetkari manogat in marathi essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध क्रमांक २ Shetkari Manogat in Marathi Nibandh no 2 ३५० शब्दात या विषयावर निबंध बघणार आहोत . वरील निबंधापेक्षा या निबंधात वेगळी माहीती दिलेली आहे . चला तर मग सुरू करूया निबंधाला.
आज येथे देशातील कानाकोपऱ्यातून वृत्तपत्रांची मंडळी उपस्थित राहिली आहेत. त्या सर्वांपुढे आपले मनोगत व्यक्त केले की, ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे, आणि म्हणूनच माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे.
“आपला देश हा कृषिप्रधान देश आहे, असा तूम्ही थोरमंडळी वारंवार उल्लेख करीत असता. स्वातंत्र्योत्तर काळात औदयोगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले. त्याचवेळी शेतकऱ्यालाही काही सवलती देण्यात आल्या. कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतु हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा मालक व्हावा. कर्जमाफी देण्यात आली, सावकारी बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला. पण खरोखरीच सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना पोहोचल्या आहेत का? याची शासनाने वा कुणी नेत्याने कधी खात्री करून घेतली आहे का?
"काही वर्षांपासून आमचे महाराष्ट्र सरकार हरितक्रांती झाल्याचे आनंदाने जाहीर करीत आहे. पण ही हरितक्रांती आणि तिच्यातून आलेले वैभव कोणाकडे गेले? हल्ली खेडेगावांतून एक नवा वर्ग निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे 'धनिक शेतकरीवर्ग.' सारे फायदे हा वर्ग स्वतःसाठी उचलत आहे. वेगवेगळया नावांखाली ते सरकारी मदती मिळवितात, मानसन्मान पटकवितात, आमदार-खासदार बनतात आणि गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनिक होत आहेत तर गरीब शेतकरी या धनिक शेतकऱ्यांचे गुलाम होत आहेत, नष्ट होत आहेत.
“या सामान्य शेतकऱ्याकडे सरकारने, शहरी नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच हे आत्मवृत्त जाणुन घेऊन सरकारणे त्यावर उपाय शोधने आवश्यक आहे. आमचे हे मनोगत मी आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगु दया, एवढीच आमची मागणी आहे."
Essay no 3
निबंध क्रमांक 3
eka shetkaryache atmavrutta
वर्तमानपत्र उघडले की शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी हल्ली रोजच आढळते. मन सुन्न होते . भारत हा कृषीप्रधान देश . शेत आणि शेतकरी यातून 'सुजलाम् सुफलाम्' ची वाटचाल सुरू असतांना धडाधड शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? प्रश्नांची आवर्तनं हृदयाला घरे करू लागली . एक शेतकरी आपली व्यथा सांगतोय असं वाटलं अन् आवाज आला
“मी एक सामान्य शेतकरी. एक भूमिपुत्र. भूमी ही माझी माता. तिच्यावर माझे अगाध प्रेम आहे. तिच्याच कुशीत जन्मलो, खेळलो, बागडलो, मोठा झालो. तिनेच अन्न दिले , पाणी दिले. पण दिवसेंदिवस स्थिती बिकट होत चालली आहे. वरुणराजा लहरी झाला आहे. लहरी पावसाने दगा दिला आहे. अवर्षणाचे सावट पसरले आहे.
आभाळाबरोबर डोळ्यातले ही पाणी आता आटले आहे. दुष्काळाची भीषणता गिळून टाकत आहे. कर्जाचा डोंगर मुद्दलापेक्षा दुप्पट व्याजाने जीवघेणा झाला आहे. उपाशी बायका-पोरांना बघवत नाही. हाडं हाडं झालेली जनावरं मुक्यानंही खूप काही सांगत असतात. सणासुदीला नवा कपडा तर सोडाच पण अंगभर कपडाही नशिबी नाही. घराच्या भिंतीला ठिगळं, कपड्यांना ठिगळं असं भिकार जीवन...खर सांगू? सारं सारं असहय झालं.... अगदी जीव पार गुदमरून गेलाय.... आता सांगा, आत्महत्या करावीशी वाटणार नाही तर काय करायचे?
वर्षानुवर्षे दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत कष्ट करूनही अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत नाहीत. गरीबी पाचवीला पुजलेली तशीच आजन्म बरोबर ..... यासारखं दुर्दैव ते कोणतं?''
"स्वातंत्र्याची पहाट झाली पण आमच्या जीवनातला काळोख दूर झाला का? शेतकऱ्यांना सवलती दिल्या गेल्या. कर्जमाफी देण्यात आली . बँकामार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला.
कर्ज ' वाढत चाललंय.... खूप सहनशक्तीनं सगळं रेटलं चतकोर कोरडी भाकरही पाण्याबरोबर गिळली. ओठांवर विठूचं नाव अन् शेतात अहोरात्र काम . पण.... सारं सारं करूनही माझी झोळी रितीच... निसर्गाचा कोप, तुटपुंजा पैसा, कर्जबाजारीपणा, कुटुंबाचे हाल या साऱ्यांना आता कोणतंच उत्तर राहीलं नाही म्हणून मीच संपलो....."
"एक भयाण सत्य... चिरंजीव शेतीत मरणारा मी शेतकरी...शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हणताना माझ्यासारख्या शेतकऱ्यांचे हाल तुमच्या मनाला का दिसत नाहीत? माझ्यासारखे असंख्य बांधव आहेत. त्यांना तरी वाचवा! शेतकरी अर्थव्यवस्थचा कणा आहे. मग त्याच शेतकऱ्याच जीवन जर समाधानी नसेल तर अर्थव्यवस्थेचे कोणते नगारे तुम्ही बडवणार आहात?
जुने तंत्रज्ञान व पारंपारिक शेतीपध्दती बरोबर आज नवतंत्रज्ञान आहे, हरितक्रांतीकडून जैव क्रांतीकडे वाटचाल होत आहे. कृषि-विस्तार, उत्पादन क्षमतावाढीचे प्रयत्न होत आहेत . मूठभर शेतकऱ्यांचा फायदा होतो तो ही सधन असणाऱ्यांचा माझ्यासारखे उपेक्षित राहतात.'
मृत्यूच्या दारातही दारिद्र्य माझ्यासोबत होते.... माझी व्यथा माझ्याबरोबर संपलेली नाही....माझ्या बांधवांच्या अश्रूतून ती झिरपते आहे. भारतमातेच्या पुत्रांनो , अजूनही जागे व्हा . विचार करा- डोळसपणे! शासनाची मदत व तुमची धडपड खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचू द्या . त्यांचे अज्ञान दूर करा. शिक्षण द्या. शेतीबरोबर पशुपालन , मत्स्यशेती , कुटिरोद्योग , जलसिंचन सुविधा यांची माहिती द्या .
दारिद्रय , उपासमार व कर्ज यांनी थकलेला शेतकरी दारूच्या व्यसनात जीवन बरबाद करतो. वाया जातो , यापासून त्याला परावृत्त करा . त्याला जगू द्या . मरणाच्या खाईत ढकलू नका . 'जय जवान जय किसान'चा खरा मान त्याला द्या. तरच देश समृध्द होईल . समृध्दता मातीतून उगवते . त्या मातीच्या लाडक्या पुत्रास समाधानी जीवनही प्राप्त होऊ नये ही एक शोकांतिका आहे .''
टीप : वरील निबंध एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.
- marathi composition on shetkaryachi atmakatha