टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध तर आत्मकथनात्मक
टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध तर आत्मकथनात्मक :आज आपण टिळकांचा पुतळा बोलू लागला शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत
टिळक स्मारक मंदिरातून 'टिळक-आगरकर' हे नाटक पाहून मी बाहेर पडत होतो. नाटकातील मित्रप्रेमाची ती उदात्त दृश्ये मनःपटलावरून हलत नव्हती; त्यामुळे नाटकाला आलेल्या मंडळींची गर्दी ओसरली तरी मी तेथेच रेंगाळत राहिलो. तेथील कट्ट्यावर थोडा वेळ टेकलो. अचानक एक धीरगंभीर आवाज कानांवर आला. मी चमकून पाहिले. तर काय...... प्रत्यक्ष लोकमान्यांचा पुतळाच माझ्याशी बोलत होता. मी कान देऊन ऐक लागलो. त्या आवाजात खंत होती.
“अरे बाळा, तू येथे का रेंगाळत आहेस ते मला माहीत आहे. रंगमंचावरील नाटकाने तुझ्या मनाची पकड घेतली आहे याची मला कल्पना आहे. खरोखरच नाटककाराने आमच्या दोघांच्या जीवनातील वास्तवतेशी बरीच जवळीक साधली आहे. परंतु खरे तर आमच्या जीवनातील एकदशांश भाग देखील नाटकात दाखविला गेलेला नाही पण त्यात नाटककाराचा दोष नाही.
तो तरी काय करणार? त्याला स्थलकालाच्या मर्यादा आहेतच. पण मुला, मी आज तुझ्याशी बोलू इच्छित आहे ते नाटकाविषयी नाही, तर देशाच्या सदयःस्थितीविषयी मला तुझ्याशी बोलायचंय.
“अरे, मी येथे या चबुतऱ्यावर उभा आहे. भोवताली घडत आहे ते सर्व पाहत आहे. या टिळक रस्त्यावरून सकाळ-संध्याकाळ शाळा-कॉलेजला जाणारे अनेक विदयार्थी मला दिसतात ना, तेव्हा मन आनंदाने बहरून जाते बघ. या विदयार्थ्यांना पाहून, आम्ही शाळा सुरू केली तेव्हाचे दिवस आठवतात. शाळा सारवण्यापासून सर्व कामे आम्ही केली होती. केवढी स्वप्ने आम्ही तेव्हा पाहिली होती. पण आज मी जेव्हा या मुलांच्या गप्पा ऐकतो, तेव्हा मन खंतावते.
अरे, आपण भारत देशात राहतो याची त्यांना आठवणही. नसते! या देशाला स्वराज्य मिळावे म्हणून त्यांच्या पूर्वजांनी जिवाचे रान केले; त्यावेळी कित्येकांनी आपल्या सुखांचा होम केला. त्यावेळी अनेकांनी अखंड छळ, कारावास सोसला तो कशासाठी?
तर हे स्वराज्य मिळविण्यासाठी. आज त्यांची नातवंडे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वराज्याचा लिलावही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे भीषण चित्र दिसत आहे. या स्वराज्याचे आपण काही देणे लागतो याची त्यांना जाणीवही नाही. स्वदेशी, स्वभाषा यांचा त्यांना विसर पडला आहे. परदेशी वस्तूंचा हव्यास, इंग्रजी भाषेची गुलामगिरी पाहिली की वाटते- 'याचसाठी का आम्ही अट्टाहास केला होता?'
“या तरुणांची कृश शरीरयष्टी पाहून वाटते की, वर्षभर शाळा-कॉलेजांना कुलुपे घालावी आणि यांना व्यायामशाळेत न्यावे. मंडईच्या आसपास रेंगाळलो तरी हेच आढळते. जोर-बैठका काढणारे पहिलवान आता दिसत नाहीत. चित्रपटांच्या गप्पांत रंगलेले 'हीरो'च सर्वत्र आढळतात. रस्त्यावरून हिंडताना विविध जातिजमातींच्या संस्था आढळतात. म्हणजे विषमता एवढी फोफावली आहे तर!
दलित हा शब्दही आमच्या काळात अस्तित्वात नव्हता. जात-धर्मभेद विसरून सगळे एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणवून घेण्यात कधी शरम वाटत नव्हती. तेव्हा एकच ध्येय होते आणि ते म्हणजे परक्या सरकारला हाकलणे. पण आजचे जीवन ध्येयहीन झाले.
"केवढ्या उमेदीने आम्ही 'केसरी' सुरू केला आणि वाढविला. पण आजच्या वर्तमानपत्रांमध्ये तो स्वाभिमानी बाणाच आढळत नाही. आजची वर्तमानपत्रे चाळली तर निम्म्याहून अधिक भाग जाहिरातींनी भरलेला दिसतो. अरेरे, हे सारे पाहिले की गपकन् डोळे मिटावेसे वाटतात." आवाज थांबला, मी पुतळयाकडे पाहिले, तर पुतळ्याचे डोळे खरंच मिटलेले होते.
वरील निबंध टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
वरील निबंध टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध
आकाशात ढगांचा गडगडाट होत होता. मुसळधार पाऊस कोसळत होता. तरीही हजारो विद्यार्थी अत्यंत शिस्तीने ऑपेरा हाऊसवरून टिळकांच्या पुतळ्याकडे चालले होते. आर्यन, हिंद विद्यालय यासारख्या शाळांचे विद्यार्थी आणि शिवाय हिंद महिला समाजसारख्या संस्थांतर्फे येणारा भगिनी समाज चौपाटीवर जमत होता. लो. टिळक पुण्यतिथीच्या दिवशी टिळकांच्या पुतळ्याच्या अंगावर हारावर हार पडत होते. 'लो. टिळक की जय,' असा जयजयकार होत होता...
"कशाला जयजयकार करता मुलांनो ! मोठ्या माणसांना काही चाड आहे का?" एकदम आवाज आला...कोण बोलले हे ?...टिळकांचा पुतळा बोलत होता... "होय ! मीच तो...बाळ गंगाधर टिळक, या पुतळ्याच्या मुखातून बोलतोय...दरवर्षी तुम्ही १ ऑगस्टला इथे जमता. मला पुष्पहार घालता...माझी आठवण ठेवता याबद्दल मला फार आनंद होतो.
तुम्ही शाळकरी मुले. या महिला...हे महापौर...सारे आठवण ठेवता माझी. निदान या दिवसाची...
पण ही मोठी माणसे ?...राज्यकारभार करणारी ! कार्यालयात हवाबंद खोलीत बसून काम करणारी मंडळी...यांना काही जाण आहे का ?
हे स्वराज्य मिळविण्यासाठी किती जणांनी आपल्या पंचप्राणांचे बलिदान केले, कित्येकांनी कारावास भोगला. कित्येकांनी आजन्म दारिद्र्य व दुःख भोगले...त्याचे हेच का फळ ? डोंगरीच्या तुरुंगातले आगरकरांबरोबरचे दिवस मला अजून आठवत आहेत. चहा प्रकरण, डोळ्यासमोर येतेय...
केसरीत लिहिलेल्या लेखांवरून पुनः पुन्हा खटले भरले जायचे,...अरे बाबा महाराज...ताईमहाराज प्रकरणांत मी आयुष्यभर झुंज दिली. त्या तात्या सावरकराने परदेशी कापडाची होळी पेटवली म्हणून रँग्लर परांजप्यांनी त्याला कॉलेजमधून काढून टाकले तेव्हा 'प्रिन्सिपाल की पशुपाल ?' हा लेख मी लिहिला...दुसरेही लेख आठवतात
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' 'पुनश्व हरिः ॐ !' तसेच मंडालेच्या तुरुंगातले 'गीतारहस्य' आणि 'चिरोल' वरचा खटला ! बाळांनो, जुन्या आठवणींनी मन भरून आले म्हणून सांगितले...माझ्याबरोबर आणि माझ्यानंतरसुद्धा फार मोठी देशभक्तांची परंपरा होती.
माझे सहकारी नरसोपंत केळकर, शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर...सगळी एकापेक्षा एक कर्तबगार व ध्येयनिष्ठ माणसे...देशासाठी व समाजासाठी सर्वस्व देण्याची तयारी असणारी ! सावरकर, सेनापती बापट, धोंडो केशव कर्वे ही पुढची पिढी...राजकारणात महात्मा गांधी माझ्याही पुढे गेले म्हटले तरी चालेल. अरे यांच्या कर्तबगारीवर या देशात स्वराज्य आले...आणि भारतात 'राष्ट्राभिमान' जिवंत राहिला. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद
"सध्या मात्र सर्वत्र भ्रष्टाचार दिसतोय ! अनाचार, अत्याचार, लुटालूट, द्वेष, चोरटा व्यापार, काळाबाजार, काळा पैसा हेच शब्द माझ्या कानावर सारखे आदळत असतात. इथे चौपाटीवर भाषणे होतात ना !...सारखे तेच आरोप...तीच उत्तरे, सगळेच लबाड आणि ढोंगी...कुणाला निंदायचे कुणाला वंदायचे ! सगळेच नेते वाईट नाहीत. काही सज्जन व कर्तबगार आहेत,
पण त्यांचे यांच्या कोंडाळ्यापुढे काही चालत नाही. __“मुलांनो ! आता जास्त बोलवत नाही आणि हे अमंगळ अधिक पाहवत नाही. तुम्ही आलांत...आठवण ठेवलीत...बरे वाटले ! जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले...
राष्ट्राचा, राष्ट्रीय नेत्याचा आणि राष्ट्रीय चारित्र्याचा असाच अभिमान ठेवा...म्हणा जय भारत ! जयहिंद" यात उल्लेख नसलेले त्यांचे बालपण, शिक्षण, कॉलेज जीवन व काही सभांतील प्रसंग यांचे चित्रण करून पहा.