Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्ये आज आपल्या देशात बोळकावलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराविषयी असणारी समाजमनाची मानसिकता याविषयी वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.आजच्या एकविसाव्या शतकातही एक भस्मासुर फार मातला आहे. या भस्मासुराचे नाव आहे, भ्रष्टाचार ! हल्ली वर्तमानपत्रांतून तर नित्य नवा 'आर्थिक घोटाळा' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत.
पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो. नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली की, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी लाच स्वीकारली जाते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून 'काळा पैसा' निर्माण झाला आहे.
Bhrashtachar Essay in Marathi |
विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चैनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. चंगळवादाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा सर्वस्व' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.
अन्नात व औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे बळी घेतले जातात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयापर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात.
चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला नष्ट करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.
भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी समाजातील भ्रष्टाचागची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला भ्रष्टाचार निबंध मराठी हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद
मित्रांनो तुम्हाला भ्रष्टाचार निबंध मराठी हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
- सध्याचा महासुर
- सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार
- कृत्रिम टंचाई
- महागाई
- पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
- काळा पैसा
- चंगळवाद
- त्यासाठी सहज मिळणारा पैसा
- भ्रष्टाचारी नीतिमत्ता घालवून बसतो
- भेसळ
- भयंकर परिणाम
- शाळामहाविदयालयीन प्रवेश पैसा
- नोकरीसाठी लाच
- दुष्टचक्र
- प्रश्नपत्रिका फोडणे
- गुण बदलणे
- अमली पदार्थांची आयात
- नवीन पिढी बरबाद
- सचोटी हरवली आहे...
निबंध 2
Bhrashtachar Ek Samasya, corruption essay in marathi
काही वर्षांपूर्वी आपल्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव नव्हता. भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. पण आज साऱ्याच नैतिक मूल्यांचा हास झाला आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.
केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या कागदांवर 'वजन' ठेवले नाही तर कामे होत नाहीत. सरकारी कार्यालयातुन या रोगाची लागण प्रथम झाली. कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल, तर आधी त्यांचे हात 'ओले' करावे लागतात. आजकाल विमा कंपनी, बँका, आयकर कार्यालय या ठिकाणी हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, यात आपण काही गैर करत आहोत, असे कुणालाही वाटत नाही.
भ्रष्टाचाराची वाळवी समाजमनाला पोखरू लागली आहे.
आज भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे; कारण भ्रष्टाचाराने आपले हातपाय शिक्षण, वैदयक अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पसरवले आहेत. शाळा-महाविदयालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पैसे चारावे लागतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून भागत नाही, म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते. केवळ काही रुपयांसाठी हुशार विदयार्थी आपल्या गुणवत्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात.
वैदयकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र ! दुसऱ्याला जीवनदान देणारा डॉक्टर, वैदय हा एके काळी परमेश्वराचे दुुुुुसरे रूप वाटत असे. पण आज अनेक ठिकाणी हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो. कशासाठी? तर काही मूठभर पैशांसाठी! कुणा गरिबाची किडनी त्याला फसवून काढून विकणारा डॉक्टर हा देव कसला? त्याला दानवच म्हटले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातही भ्रष्टाचाराने आपले पाय दूरवर पसरले आहेत.
माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा, निष्ठा का हरवतात? मंदिराचा सुवर्णकळस घडवणाराच कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्या आचरणाला काय म्हणावे? या साऱ्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती!" 'भ्रष्टाचार' हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुशिक्षित माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. येथे स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. प्रत्येकाला फक्त चैन हवी, सत्ता हवी. त्यासाठी फार मौल्यवान अशी आपली नीतिमूल्ये आपण हरवून बसलो आहोत.
प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला 'मनाचा महारोग' म्हणतो. क्रिकेट खेळातील 'मॅच फिक्सिग' प्रकरणाने सारे जग हादरले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.
प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला 'मनाचा महारोग' म्हणतो. क्रिकेट खेळातील 'मॅच फिक्सिग' प्रकरणाने सारे जग हादरले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.
भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. खळाळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा पोहणाराही या भोवऱ्यात गुरफटला जातो; आणि एकदा का भोवऱ्यात गुरफटला गेला की त्याची सुटका नसते. आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. त्यातून आपली सुटका होणार तरी कधी?
निबंध 3
Essay on Corruption in Marathi Wikipedia Language
आजकाल 'बुंध्यावर घाव घाला, फांद्या आपोआप पडतील ' या न्यायाने माणूस गुण मिळवण्याऐवजी पैशाच्याच मागे लागलाय. पैसा... मग तो कशाही मार्गाने असो तो मिळवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करू लागला आहे. यातूनच जन्माला आला-भ्रष्टाचार !
वाढलेल्या गरजा हीच या अधोगतीची जननी आहे. वैज्ञानिक प्रगतीन वैयक्तिक सुखांची रेलचेल झाली. माणुस काय सुखाच्याच शोधात असतो. कुठलंही भौतिक सुख सामान्य माणसाला पटकन भावतं, मग ते मिळविण्यासाटी लागणारा पैसा मिळविण्यासाठी प्रथम नकळत, नंतर समजून उमजून तो वाकड्या मार्गाने जातो, मानवी रक्ताला चटावलेल्या नरमांसभक्षक वाघासारखा पैशावर झडप घालु लागतो. हडप करू लागतो.
वैयक्तिक स्वरूपाच्या लोभीपणाच एकवेळ समजु शकतं पण याची लागण आज सगळीकडे झालेली दिसते ही दुदैवाची गोष्ट आहे. आज एकही क्षेत्र असं नाही जिथे भ्रष्टाचार पोचला नाही. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात आहे.
माणसाची श्रीमंती, उच्चपद, अधिकार, सत्ता हे तो किती भ्रष्ट आहे यावरच अवलंबून आहे असं वाटु लागतं, हवं ते मिळवण्यासाठी आजकाल माणुस वाटेल ते करू लागलाय, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, वजनामध्ये तराजू मारणे, गॅस सिलेंडरसाठी बक्षिसी देणें, स्वतःचीच जमीन स्वतःच्या नावावर करण्यामठी कचेरीत साहेबांना खुश करणे,
प्रमोशनसाठी वरिष्ठांना ओली पार्टी देणे, यापासून ते अक्षम्य अशा, राष्ट्राची गुपित परराष्ट्रांना विकणे, राष्ट्रसंरक्षक हत्यारं खरेदीत प्रचंट पैसा खाणे यापर्यत माणसाची मजल गेली आहे. हे सारं का घडतं? माणसाच्या मनावरचा नीतीचा अंकुशच हरवला आहे. 'कष्टाविण नाही फळ' असं पूर्वज म्हणायचे, त्यांना 'या' मार्गाची कल्पना नसावी. अन्यथा 'कष्टावीणही मिळे फळ,' असे म्हटले असते.
सार्वजनिकरीत्या, गोंडस नावाखाली राजरोस भ्रष्टाचार चालतो तेव्हा राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. बोगस प्रतिष्टानं काढून राजरोस अलोट पैसा जमवतात तेव्हा कुंपणानं खाल्लेलं शेत पाहुन कीव येते. शाळेच्या प्रवेशासाठी, इमारतीसाठी हजारोंची देणगी उकळली जाते.
प्रत्येकानं आता भेसळीचं प्रशिक्षण घेतल्यासारखंच वाटतं. उद्घाटनाच्या दिवशीच पूल कोसळताहेत. भेसळीच्या अन्नानं, मद्यानं, औषधानं अनेकांचे प्राण घेतले आहेत. मंत्र्यांचा आशीर्वाद असतो हे तर लाजिरवाण आहे. पाश्चात्त्य देशांतही 'वॉटरगेट' प्रकरणं होतात तेव्हा अवघ्या मानवजातीलाच ही कीड लागली आहे की काय असे वाटते. मोठेपणाचा मार्ग भ्रष्टाचाराच्या मैदानातूनच जातो की काय असे वाटते.
याला उपाय ? वरिष्ठांनी स्वतः नीतिमान राहणं, धन्याच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव यांचा आदर्श ठेवणं, स्वत:च्या काकांना राघोबा पेशव्यांना दिलेली शिक्षा योग्य म्हणणारे माधवराव पेशव्यांसारखे स्वच्छ, निःस्पृह राज्यकर्ते असणं, रंगे हाथ पकडलेल्यांना शासन करणं, नवीन पिढीवर सुसंस्कार करणं हेच होत. अन्यथा या नरकातून सुटका नाही.