Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोपट मराठी निबंध बघणार आहोत. मानव प्राणी हा नेहमी आंनदाच्या शोधात असतो. त्यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासतो. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जातो. त्याला मनपसंत असलेले खाद्य पदार्थ खातो. पण मानवाचा सर्वात मोठा आनंद हा स्वतंत्र होण्यात आहे. त्यासाठी तो प्रंसगी युध्दही करतो. पंरतु इतर प्राण्यांच्या स्वतंत्रतेविषयी विचारही करत नाही. जसे उदाहरण द्यायचे झाल्यास पोपटाचे देता येईल. निबंधातील पोपटाने स्वता त्यांचे मनोगत स्पष्ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.
Essay on parrot in marathi |
मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?
मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.
मित्रांनो तुम्हाला पोपट मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.
व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्यवाद .
निबंध 2
एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. पोपट सांगत होता, "हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही.
तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. 'कसे उडायचे' हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे.
याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात असे! अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिउ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे. आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.
मित्रांनो तुम्हाला पोपट मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .