Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध
माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi
ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्व निर्जीव-सजीव वस्तू आणि प्राणिमात्रांना होरपळून काढणारा ऋतू... उन्हाळा म्हणजेच ग्रीष्म मानवाला नकोनकोसे करून सोडतो. सारी जीवनसृष्टी हवालदिल होऊन जाते. 'पुरे-पुरे आता तो उन्हाळा !' असा आक्रोश करू लागतात. आणि तेवढ्यात कोठे तरी एखादा काळा ढग दिसू लागतो.
चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...
सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.
खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.
शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.
ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption |
कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...
याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.
शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.
तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .
Maza avadata rutu marathi nibandh
निबंध 2
घरामध्ये महिलामंडळच भरलं होतं. सर्वांजवळ पोळपाट लाटणी होती, म्हटलं , “ मोर्चा आहे की काय ? " म्हणून आईला विचारलं तर, " अरे, पावसाळा आला ना तोंडावर ! वर्षाचे पापड, लोणची करून ठेवते - " उत्तर आलं...पावसाळा येणार त्याची अशी आगमनाची वार्ता घरोघरी होणाऱ्या पापड लोणच्यांनी येते. तशीच लगबग सर्वत्र दिसते.
छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...! पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...
छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...! पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...
मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.
कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.
मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
शहरातून वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाऊन अंधारात जग बुडून जाते. “ ये रे ये रे पावसा..." म्हणत मुलं नाचतात. कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मार खातात...कुणी रसिक गरम गरम चहाचे घुटके घेत उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो...
सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
...पण हीच वर्षाराणी रुसली तर तोंडचं पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. देवाला गाभाऱ्यात कोंडलं जातं, एवढेच काय गाढवागाढवीचं लग्नही लावलं जातं. कृषिराजा भिकारी होतो. गायवासरे कसायांची धन होते.
पाणी...वेळच्या वेळी, हवा तेवढाच पाऊस पडला तर सर्व धरित्री सुजलां सुफलां होते. तीन महिन्यांत वर्षाची बेगमी होते म्हणूनच का तिला वर्षा 'राणी म्हणत असतील."