internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण internet essay in marathi निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये मानवाने आपल्या फायद्यासाठी तयार केलेली इंटरनेट नावाची जादु कोणती कामे करू शकते व चुकीच्या रीतीने वापरल्यास कीती नुकसान करू शकते याचे वर्णन केेले आहे. व त्यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्हाला वाचण्यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
सकाळची वेळ १०.३० ची अमेरिकेतल्या एका उत्तुंग इमारतीत महत्त्वाची मिटींग बोलावली होती. विषय खूप गंभीर होता. या मिटींगसाठी त्याविषयातील जाणकार तज्ञ आली होती. एक गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही मिटींग बोलावली होती. नुकतेच एका हॅकरनी इंटरनेटवरील एका प्रोग्रामद्वारे 'आय लव्ह यु' नावाचा व्हायरस सोडला होता. या व्हायरसद्वारे इंटरनेटवरील अतिमहत्त्वाची माहिती पुसली जाणार होती किंवा त्या माहितीत बदल होण्याचा संभव होता. यावर उपाय योजण्यासाठी ही बैठक बोलावली होती.
internet essay in marathi |
या बैठकीत तज्ज्ञांनी विचार मांडून त्यावर तोडगा शोधला. एका अँटीव्हायरस विकसित केला. या अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे तात्पुरता या परिस्थितीवर उपाय योजला गेला. जोपर्यंत पुढे गंभीर परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत हे शास्त्रज्ञ निर्धास्त झाले.
तर या इंटरनेटची सुरुवात ७० व्या दशकात झाली. इंटरनेट असे जे जाळे जे एकमेकांना जोडले आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण दलातील माहिती आदान-प्रदान करण्याकरिता हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यालाच व्यापक असे जागतिक रूप देऊन इंटरनेटची सुरुवात केली गेली या इंटरनेट 'वर्ल्ड वाईड बेब' असेही म्हणाले जाते. असे जे जाळे जे जागतिक पातळीवर पसरले आहे.
इंटरनेट असण्यासाठी पहिली गरज संगणक असावे लागते नंतर दुसरे महत्त्वाचे उपकरण मोडेम लागते. भारतात या इंटरनेटची सुरुवात १९९४ साली पासून सुरू झाली. आज आपण मोबाईलवर सहजरीत्या इंटरनेट वापरू शकतो.
वर उल्लेख केल्यामुळे या इंटरनेटचे काही धोकेही आहेत. सध्या 'आय लव्ह यू', 'बग' या नावाने अनेक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहेत. हे एका प्रकारच्या प्रणाली (प्रोग्राम)मध्ये बनविलेले असतात, जे चुकून इंटरनेटवरती काम करतेवेळी आपल्या हातून उघडले गेले तर आपल्या संगणकातील नव्हेच तर आपल्या संगणकाला 'लॅन'मार्फत (लोकल एरिया नेटवर्क) जोडल्या गेलेल्या सर्व संगणकातील महत्त्वाची नोंद यामुळे पुसली जाते. किंवा त्यामध्ये फेरफार होतात तर हे इंटरनेट हॅकर हे खरेतर याबाबतीत तज्ज्ञ असतात ते इंटरनेटमार्फत देशाची जी गुप्त माहिती आहे, ती पळवून इतर देशांना विकतात.
इंटरनेटच्या आहारी गेलेली इतकी माणसे आहेत की दिवस-दिवस ते इंटरनेट पुढे बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पण खूप वेळ बसल्याने त्यांना पाठीचा त्रास होत राहतो. हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे.
या तोट्याबरोबरच इंटरनेटद्वारे आपल्याला खूप मोठे वरदान लाभले आहे. या इंटरनेटमार्फत आपल्यापुढे खूप मोठा माहितीचा विस्फोट उभा आहे.
याद्वारे आपल्याला जगातील कोणतीही, कसलीही, कशाहीप्रकारची माहिती मिळवु शकतो. जर आपल्याला ती माहिती कोणत्या संकेतस्थळावर आहे हे शोधण्यासाठी याहू, गुगलसारखे संकेतस्थळे शोधुन देणारे माध्यमेही आहेत. या इंटरनेटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 'ई-मेल' ज्याला 'इलेक्ट्रॉनिक मेल' ही म्हणतात. याद्वारे आपण आपल्या मित्राला नातेवाइकाच्या सेकंदाच्या काही भागामध्ये पत्र पाठवू शकतो. यामार्फत आपल्याला बाहेर कोठेही न जाता घरातल्या घरात संगणकाद्वारे कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो. यालाच इ. कॉमर्स म्हणतात
.
भविष्यात इंटरनेटची खूप मोठी भरारी होणार आहे. सध्या जे रोबोट आहेत त्याला जर इंटरनेटचे तंत्रज्ञान विकसित केले तर त्याला प्रश्न विचारण्याचा अवकाश, तात्काळ तो तुमच्यासमोर त्याचे उत्तर सादर करेल.
या इंटरनेटमार्फत जे धोके संभवतात त्यासाठी चांगले असे सायबर लॉ योजले पाहिजेत.त्याचबरोबर आपण त्या इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्याला आपणच गुलाम ठेवले पाहिजे. इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित कले आहे . त्याला तेथेच मर्यादित ठेवले पाहिजे.
या इंटरनेटच्या महापुराला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे. तो तुमचा दक्ष सेवक आहे. जे तुम्ही त्याच्याकडून मागाल ते तुम्हांला चांगल्या प्रकारे देऊ शकेल. इंटरनेटचा योग्य वापर करावा.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व इंटरनेट वापरताना तुम्ही काय उपाय योजना करता व इंटरनेटव्दारे तुम्ही कोणती कामे सहजरीत्या करीत असता हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
इंटरनेट मराठी निबंध
माहिती तंत्रज्ञानाचा एक सुंदर आविष्कार म्हणजे इंटरनेट. आज जिकडे पाहावे तिकडे सगळीकडेच इंटरनेटच हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. इंटरनेटची उपयुक्तता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत आपल्याला जाणवत आहे. पण काय आहे हो हे इंटरनेट? ते कसे तयार होते ? त्याचा विस्तार नक्की कुठून कसा झाला? यांसारखे अनेक प्रश्न नेहमीच सर्वसामान्य मनात घोळत असतात. तर हे इंटरनेट म्हणजे असंख्य कॉम्प्युटर किंवा संगणकांचे जगभर पसरलेले जाळे होय किंवा अनेक नेटवर्क यांचे हे एक नेटवर्क आहे.
या इंटरनेटशी आज संपूर्ण जगातील असंख्य लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. अमेरिकेतल्या पेंटॉगॉन या त्यांच्या सुरक्षाव्यवस्था असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम अशाप्रकारच्या नेटवर्कची गरज भासू लागली. कारण युद्धपरिस्थिती दरम्यान या अधिकाऱ्यांमधील अपुऱ्या सुसंवादाचे परिणाम तेथील सुरक्षाव्यवस्थेला जाणवत होता. म्हणून सर्वप्रथम पेंटॉगॉनमधील संगणक हे जोडण्याची कल्पना यातून निघाली. त्यातूनच सर्वप्रथम 'अपनिट' तयार झाले व पुढे 'अर्पानेट'चाच विस्तार होत होत त्यातून इंटरनेटचा जन्म झाला आणि हळूहळू जगभरातील संगणक एकमेकांना जोडले जाऊन इंटरनेटचे हे महाकाय जाळे विणले गेले.
पुढे इ.स. १९९१ मध्ये टिम बर्नर ली या गणितज्ञाने स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सर्वप्रथम 'वर्ल्ड वाइब वेब' (www) सुरू केले. कदाचित तेव्हा त्या बिचाऱ्याच्या हे ध्यानीही नसेल की पुढे यामध्ये एवढे क्रांतिकारक बदल होतील म्हणून. भारतामध्ये इंटरनेटचा व पर्यायाने 'वर्ल्ड वाइब वेब'चा प्रसार होण्यास १९९५ सालापासून सुरुवात झाली आणि हा प्रसार अजूनही असाच चालू आहे.
आज जवळजवळ असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही की जेथे इंटरनेटचे अस्तित्व किंवा उपयुक्तता नाही. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा क्रीडा, आरोग्य, बँक. राजकारण असे कोणतेही क्षेत्र असो, त्यांना इंटरनेट नवीन नाही सर्वांनाच इंटरनेट हे आपल्याला माहिती-तंत्रज्ञानामुळे लाभलेले वरदान वाटू लागले आहे.
आज इंटरनेटमुळे घरबसल्या आपण जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती किंवा ज्ञान मिळवू शकतो. अगदी घरबसल्या आपण बँकेचे व्यवहारही करू शकतो. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टीची माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळते आणि शिक्षणक्षेत्रात तर इंटरनेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हव्या त्या विषयाची अद्ययावत माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाइटवरून मिळते. अगदी एखादा आजारी माणूसही त्याच्या आजाराविषयीची माहिती, इलाज अगदी चांगला तज्ज्ञ डॉक्टर यांची निवड इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो.
एवढेच नाही तर दररोजच्या बातम्या, वर्तमानपत्रे, हे सर्वच्या सर्व इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी अमेरिका किंवा इंग्लंडमधील एखादा भारतीय माणूस किंवा कोणीही व्यक्ती आज भारतात काय चालू आहे याची माहिती तेथे बसून इंटरनेट वरून मिळवू शकतो. खरेच किती मोठी विज्ञानाने केलेली क्रांती आहे ही !
तसेच आपण चक्क इंटरनेटवर खरेदीही करू शकतो.
इंटरनेटवर वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रॉडक्ट व त्याची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स बनवीत असतात. आपण चक्क या वेगवेगळ्या जाहिराती पाहून इंटरनेट वरून ऑनलाइन शॉपिंगही करू शकतो. अशाचप्रकारचा व्यवहार हा अनेक कंपन्यांमध्येही चालतो. त्यालाच 'बिझीनेट ट्रेडिंग' असे म्हटले जाते असे इंटरनेटचे एक नाही तर असंख्य फायदे आहेत. आपण इंटरनेटवरून हवाई तिकीट बुक करू शकतो.
रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण करू शकतो. इंटरनेट टेलिफोनद्वारा जगात कुणाशीही चक्क लोकल फोनच्या दरात संभाषण करू शकतो. खरोखरच इंटरनेटमुळे जग हे जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच इंटरनेट हे मानवाला लाभलेले एक वरदानच आहे. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात.
तसेच या बाबतीतही आहे. या इंटरनेटचा वाईट मार्गाने उपयोग करणारी माणसे असतात. ते इंटरनेटवर असलेली महत्त्वाची माहिती काढून टाकणे व तिथे नको ते लिहिणे, दुसऱ्याचा पासवर्ड मिळवून त्याच्या व्यक्तिगत माहितीत डोकावणे किंवा इंटरनेटवरून व्हायरस (विषाणू) सोडून जगभराचे व्यवहार ठप्प करणे यांसारखे गुन्हे करतात. त्यांना इंटरनेटच्या भाषेत 'सायबर गुन्हे' असे म्हणतात व त्यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते आणि असे अनेक गुन्हे सायबर विश्वात घडले आहेत.
काहीजण इंटरनेटच्या ई-मेल (E-mail) या माध्यमातून एखाद्याला धमकावतात तर काही जण चक्क इंटरनेटवरून मुलींची छेड काढतात. त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवतात. अश्लील ई-मेल (E-mail) करतात. खरंच या तर माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या घटना आहेत की एवढ्या उपयोगी माध्यमाचा काहीजण अशा अनैतिक मार्गाने वापर करतात व स्वतःहून
या गोष्टीला शापाचे स्वरूप देतात. काहीजण इंटरनेटमधून मुलींना फसवण्याच्याही घटना अलीकडच्या काळात उप येत आहेत. पण खरोखरच मी तर म्हणेन अशी काही विघ्नसंतोषी माणसे सोडली तर इंटरनेट हे मानवाला मिळालेले बहु वरदानच आहे. कारण कोणतीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते. आपणच तिला चांगल्या किंवा वाईटचा दजा दत असतो. हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण इंटरनेटचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायचा का अधोगतीसाठी करायचा म्हणूनच मी एकदा नाही तर त्रिवार म्हणेन की इंटरनेट हे मानवाला लाभलेले वरदानच आहे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद