vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी 

निबंध क्रं.1  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या 2 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे विज्ञानाचा वापर करून  स्‍वताचे  कश्‍याप्रकारे फायदा  नुकसान केेले आहे. हे तुम्‍हाला निबंधात सवीस्‍तर  वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

'विज्ञान-शाप की वरदान? (science boon or curse?) हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडो सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुनःपुन्हा प्रश्न पडतो की, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान?

'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व प्रकारचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपलीकडे पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली, संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आज अशक्‍य वाटलेल्‍या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दुरवर  असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.

vidnyan-shap-ki-vardan-essay-in-marathi
vidnyan shap ki vardan essay in marathi

विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वत:चे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैदयकीय क्षेत्रात अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. 

वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्ती आहे, पण त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते. या महायुद्धांत झालेला मानवसंहार पाहिला की विज्ञानाची अवास्तव शक्ती याला कारण आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

 गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे. माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते.

विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतून आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले की प्रश्न पडतो, खरोखरच 'विज्ञान शाप आहे की वरदान?'

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व विज्ञान शाप आहे की वरदान याविषयी तुमचे मत काय आहे.  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • विज्ञान, माणसाची निर्मिती
  • अनेक फायदे 
  • मानवी जीवन संपन्न करण्यासाठी उपयोगी
  • आरोग्य 
  • वाहतूक 
  • दळणवळणात क्रांती
  • परग्रह निरीक्षणसृष्टीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न 
  • शोधातून अंधश्रद्धा निर्मूलन 
  • प्रयोगाला महत्त्वअणुशक्तीनिर्मिती 
  • मात्र, अणुबॉम्ब आणि इतर शोधांमुळे मानवी जीवन संकटातविज्ञानाचा दुरुपयोग टाळणे मानवाच्या हाती 
  • विज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग करणे आवश्यक

                                                                 निबंध क्रं.2

Vigyan shap ki vardan marathi nibandh | विज्ञान-सुखदायक की दुःखदायक मराठी निबंध 

इतीहासात राजे महाराजे यांना पण टी.बी. सारख्‍या आजारापुढे काहीही न करता आल्‍यामुळे मृत्‍युशिवाय पर्यांय नव्‍हता परंतु आजच्या युगातील गरीब व्‍यक्‍ती त्यावर मात करून जगतो ही आहे विज्ञानकृपा, हे विज्ञान वरदान  नाही काय ? | आजच्या दैनंदिन जीवनातील एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाचा परिसस्पर्श झालेला नाही. अंघोळीला गिझर, स्वयंपाकाला कुकर, हिंडायला स्कूटर, टोस्टर, रूम हिटर, टी. व्ही. अन् संगणक सारेच! 

ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान आले आणि मानवाने आपल्यासाठी त्याला यथेच्छ राबवले. अनेक सुविधांनी माणसाचे शारीरिक कष्ट कमी केले. सुखासीनता वाढवली. निरोपांसाठी स्वतः जाण्याचे श्रम वाचवून फोनवर काम भागवू लागले. हजारो मैलांचा प्रवास, पोटातील पाणी न हालता, विमानाने काही तासांत होऊ लागला. किचकट बौद्धिक समस्या संगणक (Computer) सोडवू लागला. अवकाशाचा शोध घेतला, सागरतळांचा ठाव घेतला. 

चंद्रावर उतरून आता तर मंगळ काबीज करू लागला आहे. काही दशकांपूर्वी देवी, टॉयफॉइड, टी. बी. या रोगांपुढे हात टेकणारा माणूस आता रोग मोडीत काढू लागला आहे...पृथ्वीवरच्या प्रत्येक निसर्गदत्त गोष्टीचा मानवाने, विज्ञानाच्या साह्याने, कौशल्याने वापर करून घेतला...जग अधिकच सुंदर केले ! आकर्षक केले ! ! मोहमयी केले ! ! ! 

स्वतःलाही दीर्घायू करवून घेतले. नैसर्गिक प्रकोपांचे इशारे अगोदरच मिळवून स्वतःचे रक्षण केले.  चार हजार वर्षांपूर्वीच्या पशूच्या पिढीत व आजच्या त्याच पशूच्या पिढीच्या जीवनमानात काहीच फरक पडला नाही...पण माणसाचे तसे नाही. सर्व प्राणि मात्रांमध्ये सर्वात अवलंबी, अशक्त माणसाने, मेंदूच्या चमत्कारातून विज्ञान निर्माण करून करामत केली. 'विज्ञान' या तीन अक्षरांच्या तीन पावलांनी वामनासारखे तिन्ही लोक पादाक्रान्त केले.

पण गुणांच्या छायेतच दुर्गुणही वाढतात. दीर्घायू झाल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला. त्याने सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनातही अनंत प्रश्न निर्माण केले. जीवन यांत्रिक झाले. यंत्रांच्या अती वापराने बेकारी वाढली, शारीरिक दुखणीही वाढली. निसर्ग आणि माणूस यांत अंतर पडले. आयुष्याला एक प्रचंड गती आली आणि माणूस गरगरू लागला. सर्वांत जास्त हानी झाली-मानवी मनाची! विज्ञानाने जरी

                               " दहा दिशांचे तट कोसळले । ध्रुव दोन्ही जवळी आले ॥" 

अशी स्थिती केलेली असली तरी मनामनांमध्ये अंतर पडून “ दोन ध्रुवांवर दोघे आपण"  अशीही परिस्थिती झाली आहे. घरांचे घरपण हरवले आहे. विज्ञानाने समृद्धी दिली पण बदल्यात चैन हिरावून घेऊन बेचैनी दिली... डोळे दिपवणारी प्रगती विज्ञानाने केली पण मानवाला लाक्षणिक अर्थाने आंधळे केले. चेर्नोबिलचा अणुस्फोटाचे भिषण परीणाम बघितल्‍यावरीही मानव अणुभट्ट्या तयार करणे चालूच ठेवत आहे.

एक प्रकारचा उन्माद त्याला आला आहे.  E = MC2 चा वापर माणसांच्याच विध्वंसासाठी करणे म्हणजे तर कु-हाडीचा दांडा गोतास काळच ! अण्वस्त्रांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य ढवळून निघाले आहे. म्हणजेच, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते सर्वस्व नाही. त्याला लक्ष्मणरेषा हवी. ते साध्य नसून साधन आहे. वैज्ञानिक साधनांचा वापर चुकीचा केला गेला तर त्यात चूक साधकाची ! साधनांची नव्हे ....

पण हे ऐकण्याच्याच मन:स्थितीत आज माणूस नाहीये. त्यामुळेच आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आणि कदाचित त्यातच जगाचा अंत आहे.

निबंध क्रं.3  

विज्ञान : शाप की वरदान!

विज्ञान म्हणजे ज्ञान. वस्तुमात्राच्या स्थितीचे गुणधर्मांचे, व्यवहाराचे ज्ञान. आपल्या विश्वातील अणूरेणूंपासून आकाशातील ग्रहगोलांपर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा माणसाला होती व आहे. ही ज्ञानलालसा पुरी करण्यासाठी मानव अखंड धडपडत आहे आणि विज्ञानाची वाटचाल अखंड चालू आहे.

विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली आणि म्हणूनच त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत प्रगती झाली. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र नाही जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही व जे समृद्ध केले नाही. विज्ञानाच्या बळावर माणसाने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. 

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपल्याला टी.व्ही., रेडिओ, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्रे अशा अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. टेलिफोन, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट या साऱ्यांद्वारे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधू शकतो.

औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. अत्याधुनिक छपाई यंत्रावर वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी पाठवल्या जातात. माणूस विविध प्रकारची वाहने वापरतो. समुद्राच्या तळाशी जातो, आकाशातही भरारी घेतो. कृत्रिम उपग्रह सोडून माणूस अवकाशावर सत्ता गाजविण्याच्या प्रयत्नात आहे. वेधशाळेत यंत्रांद्वारे वादळ, मुसळधार पाऊस आदी अनिश्चित गोष्टींचा अंदाज करता येऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा विज्ञानामुळे मानवाने फार मोठी झेप घेतली आहे.

रोगनिवारणासाठी अनेक प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. मानवाचे निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रियेद्वारा बदलून त्याला जीवदान देता येते, अपंग माणसाचे अपंगत्व घालवून त्याला निरोगी सुखी जीवन जगण्याची संधी देता येते.

विज्ञानाने शेतीमध्येसुद्धा अनेक प्रयोग केले आहेत. संकरित बी-बियाणे, जपानी भातशेती असे प्रयोग करून आपण धान्य उत्पादन वाढवू लागलो आहोत. अशा त-हेने विज्ञानामुळे आजच्या मानवाचे जीवन अधिक आनंदमय व स्वास्थ्यपूर्ण झाले आहे. विज्ञान ही आपल्याला लाभलेली कामधेनू आहे. __परंतु या विज्ञानरूपी गुलाबाला काटे आहेतच.

विज्ञानामुळे अनेक उद्योगधंदे वाढले आहेत. त्यामुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण वाढत आहे. मानव यंत्रांचा गुलाम बनू लागला आहे. शाश्वत नीतिमूल्ये नष्ट होऊ लागली आहेत. विज्ञानाच्या शोधांमुळेच अॅटमबाँब निर्माण होऊ शकला, भयानक शस्त्रास्त्रे तयार केली गेली आणि जीवघेणी महायुद्धे मानवाच्या नाशाला कारणीभूत ठरली. विज्ञानाने माणसांच्या विघातक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. त्यामुळे विज्ञान हा अखिल मानवजातीला मिळालेला शापच आहे असे वाटू लागते.

परंतु हा दोष विज्ञानाचा नाही, तर माणसाच्या वृत्तीचा आहे. विज्ञान ही एक शक्ती आहे. अग्नी जसा उष्णता निर्माण करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी वापरता येतो, तसाच आग लावण्यासाठीही वापरता येतो. तो कशासाठी वापरावयाचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून असते. विज्ञानाचे तसेच आहे. विज्ञानाने मानवी जीवनाला विलक्षण गती दिली आहे,

मानवाची सर्वांगीण प्रगती घडविली आहे. विज्ञानामुळेच त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. म्हणून विज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच केला तर हे वरदान मानवाला निश्चितच उपकारक ठरू शकेल. आपले जीवनमान उंचावणारे विज्ञान हे मानवाला लाभलेले वरदानच होय!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 