diwali essay in marathi | दिवाळी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येकजण सण व उत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्‍यांचे महत्‍व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

diwali-nibandh-in-marathi
diwali-nibandh-in-marathi

निबंध 1 (350 शब्‍दात)

भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या  निमित्‍ताने एकत्र येऊन  आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्‍द संस्‍कृत भाषेतुन घेतला गेला आहे.  ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्‍साहाने  साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्‍साहाने साजरी करतात.

 लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्‍वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्‍येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्‍येच्‍या काळ्या रात्री लोक मातीच्‍या दिव्‍यांनी व आजकाल इलेक्‍ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात.  रावणाला युध्‍दात हरवल्‍यावर जेव्‍हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्‍यात परतले तेव्हा अयोध्‍देतील लोंकानी भगवान राम यांच्‍या स्‍वागतासाठी घरे व रस्‍ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्‍णांनी नरकासुर नावाच्‍या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्‍वामी  यांचा  निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात. 

 हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. देवी देवता व राक्षसांव्‍दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्‍मी यांचा जन्‍म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्‍येला देवीची पुजा केली जाते व बत्‍तास्‍याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले  फटाके फोडण्‍यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्‍यांचा आनंद व्‍यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्‍छा व फराळ देऊन त्‍यांचे स्‍वागत करीत असतात. 

दिवाळीला लोक आपल्‍या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्‍छा व्‍यक्‍त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात.  दिवाळीच्या दिवसात  बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्‍यासाठी गर्दी करतात. आणि आपल्‍या घराला दिव्‍यांनी सजवतात. लोक सुयास्‍तानंतर  सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात  आणि आरोग्‍य, धन,संपत्‍ती व सोनेरी भविष्‍यासाठी देवीला प्राथना करतात. 

दिवाळी हा सण प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यामध्‍ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्‍याला नविन जिवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळ‍गिली पाहीजे . आपल्‍या वागण्‍यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण  ठरू शकेल .  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्‍यवाद

निबंध 2 (430 शब्‍दात) 

diwali essay in marathi

दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.

 हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.

 आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच  मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते.

 या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.

त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .

नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.

फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्‍यांचा  अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.

सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.