cow essay in marathi | गाय मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गाय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये भारतात गायीला विषेश महत्व का आहे व प्राचीन भारतापासुन आजपर्यत गाय मानवाला कश्याप्रकारे मदत करत आलेली आहे ते या निबंधात स्पष्ट केले आहे . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
cow-essay-in-marathi |
भारतात गाय पूजनीय आहे. प्राचीन काळात साधू संत, ऋषिमुनी आपल्या आश्रमात गाई पाळत असत. महर्षी जाबालीने आपला शिष्य सत्यकामवर गोसेवेची जबाबदारी सोपविली होती. आणि त्यांना तोपर्यंत चारीत राहण्याचा आदेश दिला होता जो पर्यंत त्यांची संख्या दुप्पट होणार नाही.
गाईला चार पाय, एक लांब शेपूट असते जिने ती तिच्या पाठीवर बसणारे, पक्षी, माशा, डांस उडविते. तिला दोन मोठे-मोठे सुंदर डोळे असतात. तिचा रंग पांढरा, काळा, लाल, मातकट असतो. खेळाच्या मैदानावर, रस्त्यावर, मोकळ्या जागी ती चरतांना दिसते.
गाय पाळीव प्राणी आहे. तिचे दूध पौष्टिक व पचायला हलके असते. प्राचीन काळात घरे मातीची असत ती गाईच्या शेणाने सारवीत असत. इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळीत असत. आता गोबर गॅस वापरतात यातून धूर निघत नसल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होत नाहीत. गोबर गॅस हे अतिशय स्वस्त इंधन आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. खेड्यातील स्त्रिया अजूनही शेणानेच चूल सारवितात . शेणाचा उपयोग खतासाठी केला जातो. गोमूत्राचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो.
गाईची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने गोशाळा स्थापन करून बेवारस गायींची सोय केली पाहिजे. गाईंची कत्तल थांबविली पाहिजे. ईश्वराकडून मिळालेले श्रेष्ठ बक्षीस 'गाय' आहे. भारतीय परंपरेतील पूज्य पशृंमध्ये गाईचे स्थान आहे. गाय बहुउपयोगी असल्यामुळे तिला कामधेनू म्हणतात. अशा प्रकारे हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद