essay on camel in marathi | उंट मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण उंट मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात उंटाबद्दल सवीस्तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
essay-on-camel-in-marathi |
उंट हा एक विचित्र प्राणी आहे. हा मूळत: भारतात सापडणारा प्राणी नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आक्रमकांबरोबर खैबर खिंडीमार्गे तो भारतात आला. भारताच्या वाळवंटी प्रदेशात तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आज वाळवंटातील जीवन त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.
उंटाला चार पाय, दोन, डोळे, शेपटी पाठीवर कुबड व लटकत असलेले ओठ असतात. वाळवंटात जेव्हा जोराचा वादळी वारा सुटतो तेव्हा नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो. उंटाचे गुडघे आणि मान कडक असते त्यामुळे त्याचा घर्षणापासून बचाव होतो. जाड ओठांमुळे तो वाळवंटातील काटेरी झाडा-झुडुपांची पाने खाऊ शकतो. त्याला ३४ दांत असतात.
उंट एका दिवसात ३६ लिटर पाणी पितो. जर त्याला खाण्यासाठी ताजी पाने मिळाली तर चार लिटर पाणी तो कमी पितो. उंटाच्या पोटात एक मोठी पिशवी असते तिला मदारी म्हणतात. त्यात तो अन्न व पाण्याची साठवण करतो. म्हणून खूप दिवस तो बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. ताजी पाने खाल्ली तर त्याची पाण्याची गरज आणखी कमी होते. वाळवंटात उंट हे सर्वात उपयुक्त वाहन आहे.
उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोरी, कोट, पिशव्या इ० तयार केले जाते. ओझे वाहण्यास, स्वारी करण्यास, शेती कामात उंटाचा उपयोग होतो. युद्धातही उंटांचा उपयोग होतो. २६ जानेवारीस सैनिक उंटावर बसून येतात ते आपण T.V. व इंटरनेट वर पाहतो. समुद्रकिनारी किंवा प्राणीसंग्रहालयात उंटावरुन फेरी मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद