essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात हत्तीबद्दल सवीस्तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
essay-on-elephant-in-marathi |
जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. सोंडेच्या सहाय्याने तो खातो व पाणी पितो. लाकडाचे ओंडके उचलण्याचे अवजड काम पुर्ण करतो. हत्ती मुख्यत: आफ्रिका व आशियात सापडतात. तो शाकाहारी व अतिशय बुद्धीमान प्राणी आहे.
जंगलात हत्ती कळप करून राहतात. हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळुत चालतो. हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते.
अवजड कामे करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जातो. हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर हत्तीच्या उंचीइतका एक खड़ा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग दोर-काठयांच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.
प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो.
हत्तीचे दांत फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जात असे. परंतु हस्तीदंतासाठी त्यांची अंदाधुंद शिकार होत आहे. हे थांबायला हवे. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद