petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्‍या खनिज तेलावर  मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्‍यावर त्‍याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्‍यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

petrol-sample-tar-marathi-nibandh
petrol-sample-tar-marathi-nibandh

भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर  तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच ! 

निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही !  पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.

 खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.

 आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.

पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन  बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे ! 

सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद