मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh Marathi

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध | Mala Lottery Lagli Tar Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला लॉटरी लागली तर  मराठी निबंध बघणार आहोत.  हा कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे.  या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.   



मनू बाबांबरोबर बाजारात गेली होती. सर्व बाजार झाल्यावर बाबा तिला लॉटरीच्या स्टॉलवर घेऊन गेले. त्यांनी मनूला सांगितले, “मनू, तुझ्या हाताने, तुला वाटेल ते तिकीट घे बरं, बघूया तुझा हातगुण!" मनूनं एक तिकिट घेतलं व ती घरी आली. 'आईला सांगू नकोस हं!' बाबांनी बजावलं होतंच!



बाबा सारखी लॉटरीची तिकीटं घेतात म्हणून त्यांची व आईची होणारी वादावादी मनूनं अनेक वेळा ऐकली होती. म्हणून ती विचार करू लागली, मला लॉटरी लागली तर किती बरं होईल.... खरंच मला चांगली ५० हजारांची... छे! ५० लाखांची लॉटरी लागली तर कित्ती छान होईल. 


दादाला मेडिकलला जायचं आहे. पण मार्क थोडे कमी पडले. त्यामुळे तो नाराज होऊन बसला आहे. जर गव्हर्मेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर खाजगी कॉलेजमध्ये डोनेशन देऊन मी प्रवेश मिळवून देईन. पण छे! दादाला व आई-बाबांना ते पटणार नाही.  बरं, जाऊ दे! हे चाळीतलं घर बदलून 'टू रूम किचन' असा ब्लॉक घ्यायचा आई-बाबांच्या मनात आहे. त्यांना मी ब्लॉकसाठी पैसे देईन.



प्रत्येक पत्रात  'घर दुरुस्त करायला मदत पाहिजे.' असं आजोबा लिहीत असतात. त्यांना कोकणातील घराच्या दुरुस्तीसाठी चांगले पन्नास हजार रुपये पाठवीन. मग त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर केवढे समाधान फुलेल



आमच्या वर्गातल्या कितीतरी मुलामुलींचे कपडे जुने असतात. गणवेश फाटलेला असतो. मी शाळेतील किमान शंभर तरी मुलींना गणवेश, वह्या, पुस्तके मोफत देईन. त्यासाठी एक लाख रुपये लागले तरी चालतील. तसेच काही विद्यार्थी पैशाअभावी शिकू शकत नाहीत. अशा गरीब व हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चांगले पाच लाख रुपये देईन.



तसेच मातृ-मंदिरात किती अनाथ मुले व मुली राहतात. त्या सर्वांना नवीन कपडे करीन, छान जिलबीचं जेवण देईन. आपल्याला भाऊ  मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागेल. एवढं करण्यास पन्नास लाख पुरतील की नाही कोण जाणे? पैसे पुरले नाहीत किंवा शिल्लक उरले तर काय करायचे? काही सुचत नाही. छे! उगीच कशाला लॉटरीच्या वेड्या आशेवर जगायचे ? संस्कृतच्या बाई सांगतात तसंच होईल

उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा

 असा विचार करून मनू अभ्यासास बसलो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • लॉटरीचे तिकीट घेणे
  • भावाला शिक्षणासाठी
  • वडिलांना नवीन घर बांधण्यासाठी
  • आजी-आजोबांसाठी खर्च करणे
  • स्वत. ट्रॅक्सची खरेदी
  • गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत
  • सेवाभावी संस्थांना आर्थिक साहाय्य


निबंध 2


मला दहा लाखांची लॉटरी लागली तर मराठी निबंध.


महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात टी. व्ही.वर बऱ्याच वेळा पाहून माझ्या मनात आकर्षण निर्माण झाले. म्हटले पाहूया, आपले नशीब आजमावूया ! म्हणून मी एक लॉटरीचे तिकीट घेतले. मनाला एक वेडच लागले  मला लॉटरी लागली तर, याबद्दलचेच विचार माझ्या मनात घोळू लागले.


मला लॉटरी लागली ती साधी सुधी नाही तर बम्पर ड्रॉची लागावी! चांगले १५-२० लाख रुपये मिळाले पाहिजेत. कल्पना करण्यात दरिद्रीपणा का करू? प्रथमत: जेव्हा मला कळेल की मला लॉटरी लागली आहे, तेव्हा मी अवाकच होऊन जाईन. पण मग माझ्या मनात विचारचक्रे फिरू लागतील.


आम्हाला नवा मोठा ब्लॉक घ्यायचा आहे, त्यासाठी जी आगाऊ रक्कम भरायची असते. त्यासाठी मी यातले पैसे बाबांना वापरायला सांगेन. मग नंतरचे  हप्ते बाबा भरतील. मला व दादाला इंजिनिअरिंगची आवड आहे. दादाला एक वर्कशॉप काढायचे आहे. त्यासाठी मी माझ्या लॉटरीतील काही पैसे दादाला देईन.


 सध्या संगणकाचे युग चालू आहे. प्रत्येकाला संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. त्यासाठी मी माझ्या घरीसुद्धा एक संगणक विकत आणीन. हल्ली अगदी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली असली तरी संगणकाचे प्रशिक्षण आवश्यकच असते. तर मला व दादाला घरच्या घरी या संगणकावर काम करता येईल, सराव करता येईल.


माझ्या बाबांना त्यांच्या व्यवसायानिमित्त ठिकठिकाणी फिरावे लागते. दरवेळी प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो. मी त्यांना एक साधीसुधी का  होईना पण गाडी विकत घ्यायला सांगेन. यामुळे त्यांची दगदग जरा कमी होईल आणि वयानुरूप येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी जरा कमी होतील.



माझ्या आईला प्रवासाला जाण्याची फार आवड आहे. पण आजकाल पैसे आधीच पुरत नाहीत, तर सहलीला जाण्याचा विचारच करता येत नाही. तिला आणि मलाही हिमालयाचे फार आकर्षण आहे. तेथील हिमवर्षाव. दऱ्याखोऱ्या, अरुंद वाटा, अवघड चढणी, खळाळत वाहणाऱ्या नद्या, धबधबे, कडे कोसळणे असे निसर्गाचे रौद्र पण मनोहर रूप डोळ्यांत साठवून घ्यायची आमची फार इच्छा आहे. तर मी माझ्या लॉटरीतील काही पैसे यासाठी वापरीन.


आमच्या शाळेतील प्रयोगशाळा आधुनिक उपकरणांनी सज्ज करायची आहे, ग्रंथालयामध्ये काही नवीन चांगली पुस्तके घ्यायची आहेत. यासाठी मी काही धन शाळेला देईन. मी माझ्या घरीही पुस्तकांचा छोटा संग्रह करू इच्छितो. मी माझ्या दर वाढदिवसाला काका, मामा, आत्या साऱ्यांकडून एकएक पुस्तकच भेट म्हणून घेतो. तर आता लॉटरी लागल्यावर मला पुस्तकांचा एक मोठा गठ्ठाच घेता येईल आणि माझे मन आनंदाने नाचू - लागेल.


याशिवाय आमच्या गावात एक अनाथ बालकाश्रम आहे. एक  व्यसनमुक्ती केंद्र आहे, निराधार स्त्रियांसाठी काम करणारी 'स्वाधार' म्हणून एक संस्था आहे. या साऱ्या संस्था समाजाला उपयुक्त असे काम करीत असतात. त्यांना थोडातरी हातभार म्हणून मी प्रत्येक संस्थेला काही रक्कम देणगी देईन, अशा त-हेने काही अंशी समाजऋण फेडण्याचा मी प्रयत्न करीन.

आणि मित्रहो, शेवटी पुन: एकदा एक लॉटरीचे तिकीट घेऊन ठेवीन !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद