बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेकार तरुणाचे आत्मकथन मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. मित्रांनो बेकारी आज जगासमोर एक मोठी समस्या बनलेली आहे. याच संकटात सापडलेल्या एका तरुणाचे आत्मकथन (मनोगत) आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. हृदयानं श्रीमंत आई-वडिल मला लाभले. त्यांचे संस्कार व माझे प्रयत्न यातून मी घडत गेलो.शाळा, महाविद्यालय यातून 'एक आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी प्रतिमा साकारली गेली.खरं तर डॉक्टर होऊन रुग्णसेवा करण्याचे माझे स्वप्न होते.परंतु पैशाची तरतूद होऊ शकली नाही.
विज्ञान शाखेची पदवी हाती आल्यानंतर मला नोकरी शोधणे भागच पडले.कारण प्रसंगी उपाशी राहून माझ्या मातापित्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले होते. म्हणून माझे कर्तव्य माझ्यासमोर दत्त म्हणून उभे टाकले. या आव्हानासाठी मी सज्जही झालो. अन् मग सुरू झाली माझी वाटचाल .
नोकरीच्या शोधात शाळा, महाविद्यालयातली प्रशस्तिपत्रके , गुणपत्रके, बक्षिसे सारी फेर धरून माझ्याभोवती नाचू लागली.या साऱ्यांसह अर्जावर अर्ज खरडूनही , मुलाखती देऊनही नोकरी मात्र अजूनही मिळत नाही. मन अगदी बधिर झाले आहे.'
“थकत चाललेल्या माता-पित्यांचा मीच एक आधार आहे.पण या बेकारीच्या भस्मासुराने माझी वाटच गिळली आहे. मी शून्य झालो आहे. मन विचार करून थकले आहे.फिरून फिरून पाय थकले आहेत. आशा मात्र जिवंत आहे.
“संपलं सारं तरी सुरू करायचं असतं भरकटलं तारू तरी पोहायचं असतं
डोळ्यांत प्राण घेऊनहीनवं क्षितिज शोधायचं असतं"
ही माझ्या माऊलीची शिकवण! स्वप्नांचा चुराडा हातात लपवून मी आशेने ध्येयाचं क्षितिज शोधित आहे. भ्रष्टाचार मात्र आ ऽ ऽ वासून माझ्यासारख्यांना गिळू पाहत आहे. 'टेबलाखालून' बंडल पुढे सरकावले जात आहेत. आदर्श गहाण पडला आहे. खिसे भरले जात आहेत. आपल्या शिक्षण पध्दतीत गुणवत्तेला काय किंमत आहे?
पैसा, वशिला , सत्ता यापुढे गुणवान माणसांना काय स्थान? या देशात सर्वांना समान संधी आहे का? कोठवर सोसू हा तोंड बांधून बुक्क्यांचा मार? पोटावर लाथा बसत आहेत.वशिल्याचे राज्य आले आहे.सोन्याला कस लागत आहे.लोखंडावर सोन्याचा चढवलेला मुलामा सोन्याचा आभास निर्माण करीत आहे.गुणवत्तेची हेळसांड होत आहे. संधी न मिळाल्याने हुशार युवक हताश झाला आहे. जीवघेणी स्पर्धा , फुगलेले भांडवल , भ्रष्टाचार, लुटालूट यांच्या जीवघेण्या विळख्यात आजचा युवक गुरफटला गेला आहे.
अंगी हुशारी, सचोटी बाळगून हाती मात्र धुपाटणे उरले आहे. माझी ही अवस्था माझ्या मनाला घरे पाडीत आहे. मी ‘मोठा' होईल म्हणून दुःख गिळून आशेने जगणारे माझे माता-पिता , त्यांच्या आशा-आकांक्षा याविषयी माझे कर्तव्य मला करायचे आहे पण नोकरीची दारे बंद फक्त आश्वासने मिळतात .
निराश मनाची वाटचाल उषःकालाची प्रतिक्षा करीत आहे. सळसळणारे माझे तरुण रक्त उफाळत आहे. बर्फासारखे थंड जग त्याला वाकुल्या दाखवीत आहे. निराशेच्या खाईत माझ्यासारखे अनेक बेकार तरुण आत्महत्या करीत आहेत. काय ही आजच्या युवकाची कथा अन् व्यथा? काही अपात्र तरूणांना पैसा भरल्यामुळे नोकरीची संधी मिळते म्हणजे पर्यायाने देशाच्या प्रगतीचा मार्ग खिळखिळा झालाच समजा.
ओरडणाऱ्यांचा आवाज बेमालूमपणे दफन केला जात आहे.वीतभर खळगीसाठी वणवण हिंडणे बेकारांच्या नशिबी आले आहे.'' गुन्हेगारीकडे नकळत काही जण वळत आहेत.
"मी खूप जिद्दी आहे. 'चोच तिथे दाणा' ही निसर्गाची तरतूद आहे असे समजून मी शोध चालू ठेवला आहे.नोकरी नाही मिळाली तर कर्ज काढून छोटा उद्योग मी सुरू करीन.मी आशावादी आहे.
"होऊनि शिल्पकार, घडवीन आयुष्याचे अपूर्व लेणे अथक परिश्रमाने करील, लोखंडाचेही सोने!"
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
निबंध 2
बेकार तरुणाचे आत्मकथन निबंध मराठी | bekar tarunache atmakathan nibandh marathi
"अरे, पकडा त्याला. त्यानं पाकीट मारलं!" ऐन दुपारी एस्. टी. स्टँडवर एकच गलका उठला, आणि कोणीतरी त्या चोराला पकडलंच. चोर नवशिका व सजन वाटत होता. त्याच्याबद्दल नकळत आपुलकी निर्माण झाली म्हणून त्याला
विचारलं, "अरे, तू चांगला मुलगा दिसतोस. मग कुठे तरी नोकरी करायची सोडून असे का धंदे करतोस?"'नोकरी' हा शब्द ऐकल्यावर त्वेषानं उसळून तो म्हणाला, "तुम्ही देता का नोकरी? आत्ता करतो. आजकाल 'नोकरी' मिळणं इतकं सोपं आहे का? मिळाली असती तर केली नसती का? अहो, मी पाकीट मारण्याचा धंदा करत नाही.
आज प्रथमच पाकीट मारलं आणि तुम्ही पकडलं. उद्या रत्नागिरीला 'इंटरव्ह्यू'साठी जायचे आहे. पन्नास रुपयांसाठी भीक मागायची लाज वाटली म्हणून ही चोरी करून बघितली.
“मी चांगला बी. ए. झालेलो आहे. बी. ए. होऊन चार वर्षे झाली. परंतु अजूनही काही कामधंदा मिळत नाही. किती ठिकाणी अर्ज केले, मुलाखतीला गेलो. पण कोठून बोलावणेच आले नाही. टायपिंगच्या परीक्षा दिल्या. तरीही नाहीच. मुंबईत नशीब आजमावायला जावं म्हटलं तर राहायचं कुठे हा प्रश्न व म्हाताऱ्या आई-वडिलांजवळ इथं कोण? हे दुसरं प्रश्नचिन्ह !
“उत्तम शेती व मध्यम नोकरी असं म्हणतात नं? म्हणून आमच्या तुटपुंज्या जमिनीत शेती करून पाहिली. तर उत्पादनापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त. जेमतेम चार महिने पुरतील एवढे तांदूळ मिळाले. या वाढत्या महागाईत फक्त वडिलांच्या पेन्शनीच्या पैशावर कसं भागवणार? आई तर नेहमी आजारी असते. तिच्या औषधपाण्यात बरेच पैसे खर्च होतात.
“तुमच्या दोन महिन्यांच्या पगाराइतके पैसे फक्त मुलाखतीला जाण्यायेण्यात खर्च झाले आहेत. मजुरी करायलाही माझी तयारी आहे. पण मला कोणी मजूर समजतच नाही व मजुरीही मिळत नाही. विना अनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळेत दोन महिने नोकरी केली. तर दरमहा पगार फक्त ४०० रुपये दिला.