भारत देश महान मराठी निबंध | bharat desh mahan marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारत देश महान मराठी निबंध बघणार आहोत. भारत माझा देश आहे. त्यास हिंदूस्थान असेही म्हटले जाते. भारत आशिया खंडात आहे. याच्या उतरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला, हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पाकिस्तान, बांगला देश, चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. येथील ७० % लोक खेड्यांत राहतात.
चीननंतर भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. बहुसंख्य हिंदू असणारे राष्ट्र असून इथे सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच आपापसांत प्रेमाने राहतात. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. इथे अनेक जाती व अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक प्रकारचे रीतिरिवाज, वेशभूषा येथे दिसते.
राजा हरिश्चंद्र, शिबी राजा, रामासारख्या सत्यवचनी राजांनी या धरतीला पवित्र केले. चाणक्यासारखा मुत्सद्दी आणि विदुरासारखे नीतिमान पण या भारतात होऊन गेले. भारतात गंगा, यमुना, सरस्वतीसारख्या नद्या, हिमालय पर्वत, जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताज महाल, लाल किल्ला, अजिंठा वेरुळच्या लेण्या, कुतुबमिनार ही देशातील वास्तकलेची उत्कष्ट उदाहरणे होत.
जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव चेरापुंजी भारतातलेच. निसर्ग सौंदर्याचा अतिसुंदर आविष्कार काश्मीर, सिमला, मसुरी, माऊंट अबू या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. विदेशी पर्यटकांना ही सर्व ठिकाणे आकर्षित करतात. येथे लोखंड, कोळसा, तांबे, नैसर्गिक वायू, युरेनियम इत्यादी खनिजे विपुल प्रमाणावर सापडतात.
आज भारत औद्योगिक क्षेत्रातही प्रगतीच्या मार्गावर आहे. टी.व्ही. रेडिओ, मोटारी, बस, ट्रक, रेल्वे, जहाजे, दारुगोळा, क्षेपणास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे.
भारत हा जगातील सर्वात प्रमुख लोकशाही देश आहे. भारताला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वांगीण प्रगती झाल्यामुळे भारत आज आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश बनला आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद