माझा वाढदिवस मराठी निबंध | my birthday essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा वाढदिवस मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या भारत देशात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. आता तर हा एक रिवाजच बनला आहे. नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर आणि सामान्य व्यक्तींचे वाढदिवस कौटुंबिक स्तरावर साजरे केले जातात.
आज २६ जानेवारी, माझा वाढदिवस आहे. मी १० वर्षांची आहे. वाढदिवसाचा दिवस माझा सर्वात आनंदाचा दिवस असतो. माझ्या कुटुंबातील सर्वांनी सकाळीच मला शुभेच्छा दिल्या. यावर्षी मी माझ्या मैत्रिणींना, जवळच्या काही नातेवाईकांना वाढदिवसाला बोलावले आहे.
सकाळीच शाळेत गेल्यावर. माझ्या वर्ग शिक्षिका आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना मिठाई वाटली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले व मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
संध्याकाळी माझ्या मित्र-मैत्रीणी व काका-काकू मावशी, माझ्या बहिणी असे बरेच लोक जमले. आईने सगळे घर फुगे व रंगीत माळांनी सजवले होते. वाढदिवसानिमित्त माझ्या मित्र मैत्रिणींनी सुंदर-सुंदर भेटी दिल्या, काका-काकूनी माझ्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना केली. जे स्नेही येऊ शकले नाहीत त्यांनी शुभेच्छा पत्रे पाठविली.
त्यानंतर मी केक कापला. माझी मैत्रीण गीताने गाणे म्हटले. सर्वांनी टाळ्या वाजवून तिच्या गाण्याला दाद दिली व गाण्याचा आनंद लुटला. रोहित आणि अरविंदने मिळून एक विनोदी नाटिका सादर केली. ती सर्वांना आवडली. कार्यक्रमात मधून-मधून खाणे चालूच होते. रात्री नऊ वाजता सगळे आपाल्या घरी परत गेले. नंतर मी मिळालेल्या सर्व भेटी उघडून पाहिल्या. त्यात काही पुस्तके, एक घड्याल व बरेचसे खेळ होते. मी ईश्वराजवळ वाढदिवस पुन्हा लवकर यावा अशी प्रार्थना केली.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद