सुनीता विल्यम मराठी निबंध | Sunita Williams Essay in Marathi

सुनीता विल्यम मराठी निबंध | Sunita Williams Essay in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुनीता विल्यम मराठी निबंध बघणार आहोत. अवकाशयात्री सुनीता विल्यम यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ साली अमेरिकेत झाला. ही मूळची भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरातील. त्यांचे वडील दीपक पण्ड्या अमेरिकेत डॉक्टर होते. लहानपणापासूनच सुनीताला अंतरीक्षाची ओढ होती. 


वृत्तीने साहसी असलेल्या सुनीताने १९५ दिवसांपर्यंत अंतरीक्षात राहण्याचा विक्रम केला. साहसिक अभियानात रस दाखवून तिने हे सिद्ध केले की, महिला पुरुषांच्यापेक्षा कमी नाहीत आणि त्याही मोठी-मोठी ध्येये साध्य करू शकतात – पृथ्वीपासून ते अंतरिक्षापर्यंत!


कल्पना चावला प्रथम महिला अंतरिक्ष यात्री. कोलंबिया अंतरिक्षयान दुर्घटनेत तिचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे सुनीताने ठरविले. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रामध्ये (international space station )पाऊल ठेवणारी सुनीता पहिली भारतीय महिला. अंतरिक्षात सर्वात जास्त वेळ घालविणारी आणि अंतरिक्ष वॉक'चे रेकॉर्ड करणारी हि सुनीताच होती . सुनीताने स्पेस मॅरेथॉनचे रेकॉर्ड बनविले. एवढेच नाही; तर अंतरिक्ष प्रयोगशाळेत परीक्षण केले. तिने केलेल्या ह्या गोष्टींचा अंतरिक्ष-यात्रींना नक्कीच फायदा होईल.


२२ जून २००७ शुक्रवारचा दिवस. सारा देश दूरदर्शनवर नजर ठेवून होता. भारतपुत्री सुनीता आज अंतरिक्षातून परतत होती. सुनीता आज कल्पना चावलाचे अर्धवट राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी गेली होती, ते अटलांटिस यान पृथ्वीवर उतरणार होते. सुनीता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ आतंरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात होती. सर्वात जास्त अंतरिक्षात राहण्याचा विक्रम तिने स्थापित केला होता. शैनौन ल्युसिडने केलेला १८६ दिवस आणि ४ तासांचा विक्रम सुनीताने मोडला. यापूर्वी अंतरिक्षयात्री कैथरिन थार्नटनने केलेले. २१ तासांपेक्षा अधिक काळ अंतरिक्षयानात स्पेस वॉकचे रेकॉर्डही मोडले.



विशेष म्हणजे, गेल्या वर्षी १० डिसेंबरला अंतरिक्ष यान 'डिस्कवरी'तून सुनीताने सहा अन्य यात्रींबरोबर आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनसाठी उड्डाण केले. २ जून २०१२ मध्ये ती अवकाशयात्रेसाठी जाणार आहे. अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या सोयुझ ३१' उड्डाणात रशियन अवकाशवीर युरी मालेनचँको व जपानी अवकाशवीर अकिदितो होशिदे यांचेसोबत सुनीता जाणार आहे. ती ऑक्टोबर २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राची फ्लाइट कमांडर बनेल. 


यापूर्वी जून १९८८ मध्ये सुनीताने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात फ्लाइट इंजिनियर म्हणून काम केलेले आहे. ९ डिसेंबर २००६ मध्ये एस्. टी. एस्. ११६ पथकातील सदस्य म्हणून ती अवकाशात गेली होती.

२००८ मध्ये भारत सरकारने विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रात पद्मभूषण' या उपाधीने तिला सन्मानित केले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद