ज्ञानेश्वरीची थोरवी मराठी निबंध | dnyaneshawrichi thorvi marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ज्ञानेश्वरीची थोरवी मराठी निबंध बघणार आहोत.
भाव धरूनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रभु अर्जुनेसी।। तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता सांचे, भय कळिकाळाचे नाही तया। एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी।। संत ज्ञानेश्वर हे संतांचे मुकुटमणी. त्यांचे कार्य, त्यांची थोरवी अमर्याद संन्याशाची मुले म्हणून अवहेलना होत
असतानाही आपल्या भावंडांसमवेत ज्ञानेश्वर शुद्ध ज्ञान व धर्मतत्त्वाच्या पालनासाठी झगडत राहिले. त्यांच्या दिव्य प्रतिभेचा चिविलास म्हणजे ज्ञानेश्वरी, आशय आणि आविष्कार यांचा सुरेख संगम म्हणजे ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीच्या काव्यसृष्टीची ओळख करून देण्यासाठी हे ज्ञानेश्वरीचे "सप्तशताब्दी वर्ष" अतिशय सुयोग्य ठरत आहे. (इ. सन १९९१)
महाभारत (श्रीमद् भगवद्गीता) हा ग्रंथ निर्माण होऊन साडेपाच हजारांपेक्षा जास्त संवत्सरे होऊन गेली. त्यावर ताजेपणाने प्रत्येक महापुरुषाने अनेक भाष्ये रचली. ज्ञानेश्वरीची सातशेवी जन्मशताब्दी साजरी करीत असताना मळातच गीता हे जीवन जगण्याला शिकविणारे शास्त्र असल्यामुळे प्रत्येक वेळी देशकाळ परिस्थितीनुसार त्यांचा अभ्यास होत आला आहे. ज्ञानेश्वरीचे प्रयोजन काय ? याविषयी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी सांगतात.......
"आता भारत कमळ दळ परागु। गीतारण्यु प्रसंगु जो संवादिला श्रीरंगु अर्जुनेसी ।।" __ योगेश्वर भगवान श्रीकृष्णानी अधिकारी व पात्रता असलेल्या अर्जुनास जे तत्त्वज्ञान सांगितले, जो उपदेश केला तोच महाराष्ट्रातील जनतेपर्यंत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेच्या निमित्ताने पोहोचवला.
श्रीकृष्ण गुरू अन् अर्जुन शिष्य हा गुरू शिष्यांचा संवाद, पोहोचवला. श्रीकृष्ण गुरू अन् अर्जुन शिष्य हा गुरू शिष्यांचा संवाद, मोठ्या जिद्दीने सांगन अर्जनाला प्रेरणा देऊन कर्तव्यतत्पर केले आहे. अर्जुनातील हे परिवर्तन श्रीकृष्णाच्या संवादातून झाले.
तसेच महान कार्य ज्ञानेश्वरीतूनही घडले. श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यातील जवळीक प्रमाणेच ज्ञानेश्वर अन् वाचक यांच्यात सलगी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मानवी जीवनातील विचार भावना... कृषी यांचा संगम कसा घडवून व तसेच जीवन सफल कसे करावे हेच ज्ञानेश्वरीचे सत्य प्रयोजन होते. ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्ञानेश्वरानी केलेला आहे.
ज्ञानेश्वरीच्या काव्यातील पंचप्राण म्हणजे एक ज्ञानेश्वरांची गुरुभक्ती दोन श्रोतृप्रेमातील वक्तृत्व, तीन मराठी भाषेविषयी अभिमान, चार त्यांचे गीता प्रेम आणि पाच म्हणजे कृष्णार्जुन प्रेम हे होत. ज्ञानेश्वरी ही साक्षात वागीश्वरी आहे. त्यातील काव्य सृष्टीने श्रोते वाचक मोहून जातात. यात केवळ अलंकार योजनाच नाहीतर रसाविष्कार ही आहे.
वाचे बरवे कवित्व, कवित्वीं बरवे, रसिकत्व।
उदैलेया भावा रूप, करिता लागे रसवृत्तीचे।।
परि तो रसति शयो मुकुटी। भग ग्रंथार्यदीपु उजळी।। ज्ञानदेवांची गुरुभक्ती श्रीनिवृत्तीनाथ यांच्याशी निगडित आहे. ओवी ओवीतून त्यांनी गुरू गौरव केला आहे. मी माझ्या गुरूचे एकुलते एक तान्हे आहे. म्हणून सर्वकृपा माझ्या ठायी आली आहे.
ज्ञानेश्वर गुरूबद्दल 'सर्वोपकारी समर्थ सद्गुरू' श्रीनिवृत्तीनाथ माझ्या अंतरी आहेत असे म्हणतात...
'श्रोतृ प्रेम' ज्ञानेश्वर आत्मविश्वासाने-विनयाने-लडिवाळपणे परंतु धिटाई व्यक्त करतात. श्रोत्यांनी आपल्या व्याख्यानाकडे अवधान देण्यावर भर देत संत हो एक अवधान आपण द्याल तर सर्व सुखास पात्र व्हाल असे ते म्हणतात. श्रोत्यांवाचून वक्ता कसला?
अहो, चंद्रकान्तु, द्रवता कीर होये।
परि ते हातवटी चंद्री की आहे ।।
म्हणवुनी वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण।।
ज्ञानदेवांचा मराठी विषयीचा अभिमान - माझ्या मन्हाटाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसे अक्षरे रसिके मेळवीन।। ज्ञानदेवांपूर्वी १०० वर्षे मुकुंदराजांनी मराठी भाषेचा कैवार घेतलाच होता आणि आता ज्ञानदेवांनी पदोपदी जे या भाषेबद्दल गौरवोद्गार काढले आहेत त्याला तोड नाही. या भाषेच्या क्षेत्रात त्यांनी सोनियाच्या खाणी उघडलेल्या आहेत.
संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषा पाहता असे वाटते की "येथे अलंकारिले कवण कवणे।" असे आहे. मराठी ओव्या साहित्यातील लेणी होऊन बसल्या आहेत. ज्ञानदेवांचे गीता प्रेम - भगवद्गीतेविषयी ज्ञानदेवांच्या मनात गाढ प्रेमादर आहे. तो त्यांनी समारोपात पुष्पांजलीद्वारे अर्पण केला आहे. पार्थ हा वासरू आणि श्रीकृष्ण हा गाय. साऱ्या जगास पुरेल एवढे दूध गीतेद्वारा दुभिले गेले आहे.
गीतेतील वाक्चातुर्य - माधुर्य - शृंगार यांची तुलना होत नाही. गीता म्हणजे काव्यराज्य आहे. रसाळपणा त्यात आहे. ज्याप्रमाणे कमळदलांना कळू न देता त्यातील पराग नेतात शरद ऋतूतील चंद्रिकेचे कोवळे अमृतकण चकोराची पिले जशी मवाळ मनाने घेतात.
तशीच ही गीता अतिशय हळुवारपणे स्वीकारावी. गीता ही मनाच्या कानांनी, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावा, चिताच्या मोलाने घ्यावी हे खरे. अखेरीस तर गीता रत्नेश्वराची भक्तालयात स्थापना ज्ञानदेवांनी केली आहे.
ज्ञानेश्वरातील पंचमप्राण म्हणजे कृष्णार्जुन प्रेम तो सर्वांत अधिक स्पष्ट होतो तो प्रत्यक्ष कृष्णार्जुन संवादात ती दोघे तर गुरुशिष्य रुपातच आहेत. त्यांच्यातील सख्यत्व अनोन्य प्रेम, अर्जुनाचे प्रश्न करणे आणि ते आधीच जाणून त्यावर श्रीहरीचे बोलणे हा विषय तर प्रेमरसाचा उत्तम नमुना आहे.
अहो श्रीगुरूचे जै पुसावे।
ते येणे माने सावध हो आवे।।
हे एकचि जाण आघवे।
सव्यसाची।।
श्रीकृष्णाला स्वत:चा बोध, अर्जुनाच्या हृदयी कधी उमटतो त्याचे त्यांना पिसे लागले आहे. दोन्ही तोंडी एक बोलणे किंवा दोन्ही चरण एक चालणे त्याच प्रमाणे कृष्णार्जुनांचे पुसणे सांगणे एक होते -
अखेरीस हृदया हृदय एक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जना।।
याप्रमाणे ज्ञानेश्वरीतील या पंचप्राणातील श्रेष्ठ प्राण म्हटले तर ती गुरुभक्तीच आहे. 'गुरु हा प्राणविसावा माझा।।' असे ते भाव-भक्ती पूर्णरीत्या म्हणतात.. अशा प्रकारे... या महान ग्रंथांची थोरवी एकनाथ महाराजांनी ही पुढीलप्रमाणे गायली आहे.
श्रीशके पंधराशे साहोत्तरी तारणनाम संवत्सरी। येका जनार्दन अत्यादरी, गीता-ज्ञानेश्वरी-प्रती शुद्ध केली।।
ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अनद्ध।
तो शोधुनिया एवंविध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी।। ज्ञानेश्वरी पाठी। जो वोवी करील म-हाटी, तेणे अमृताचे ताटी। जाण नरोटी ठेविली।।
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद