बर्ड फ्लू मराठी निबंध | bird flu marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बर्ड फ्लू मराठी निबंध मराठी निबंध बघणार आहोत. संपूर्ण जगात १६ आणि आशिया खंडात किमान ११ देशात बर्डफ्लूच्या दहशतीने थैमान घातले आहे.
सन २००६ मध्ये या रोगाने भारतात तेही महाराष्ट्रातल्या नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात डोके वर काढले आहे. आत्तापर्यंत किमान दोनशे दशलक्ष कोंबड्यांचा बळी घेणाऱ्या या रोगाने पोल्ट्री व्यवसायाचा कणाच मोडला आहे
भारताचा ३४-३५ हजार कोटीचा व्यवसाय त्यावर अवलंबून असणारे १० लाख रोजगार या रोगाच्या दहशतीखाली आहेत. इनफ्लुएन्झा 16N प्रकार 9N उपप्रकार या गटातील H5 N1 हे विषाणू या रोगास कारणीभूत असून आतापर्यंत लाखो कोंबड्यांचा बळी घेण्यास कारणीभूत आहे. शास्त्रज्ञांच्या शोधानुसार आजवर हा रोग पक्ष्यांपासून माणसात पसरत आहे.
माणसाकडून माणसाकडे याचा प्रादूर्भाव झालेला नाही; असे घडलेच तर जगातील २५% मानवी जीवन यांच्या संसर्गाने नाश पावेल, सरकार, सामाजिक संस्था, उद्योगसंस्था कितीही जनजागृती, योजना राबवत असले तरी लोकांच्या मनातील भीती घालवू शकलेले नाहीत.
चिकन, अंडी यांचे भाव ८० टक्क्यांनी उतरले आहेत. चिकन प्रेमी लोक चिकनला बघायलासुद्धा तयार नाहीत. मोठ-मोठी राजकीय मंडळी, सिनेस्टार, खेळाडू, चिकन फेस्टीव्हलमधील पोल्ट्री संस्था बर्डफ्लूची दहशत घालविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या विषाणूंचा संसर्ग मुख्यत: स्थलांतरीत पक्ष्यांकडून होतो. पोल्ट्री व्यवसायातील गलथान कारभार अयोग्य साफसफाई यांच्यामुळे याचा प्रादुर्भाव वेगाने झाला आहे. त्यासाठी राज्य शासनाने त्या-त्या प्रभावित क्षेत्राला सील करून त्या क्षेत्रात पोल्ट्री वाहतुकीला प्रतिरोधीत केले आहे.
बाधीत पक्ष्यांना मारून पुरले जात आहे. माणसाला संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता समित्या नेमण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून प्रत्येक महानगरपालिकांनी समन्स जारी केले आहेत. यात रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचवण्याकरिता वेगवेगळे उपाय दिले आहेत.
यामध्ये चिकन, अंडी खाताना ७०° पर्यंत शिजवून खाणे, बाधीत व्यक्तिला स्थलांतरावर बंदी घालणे, कोंबड्या पाळण्याच्या छंदावर आवर घालण्यास सागितल कृषिव्यवसायाला पूरक अशा कुक्कुटपालनाला या रोगामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हा व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांना आपले पक्षी मारावे लागत आहेत. चिकन व अंड्याची मागणीच नसल्यान मोठ-मोठी हॉटेल्स, बेकरी उद्योग, मांसविक्री करणारे दुकाने ओस पडली आहेत.
कोंबड्या पाळण्यासाठी साधारणत: एका कोंबडीला ४० ते ५० रुपये खर्च होतो पण सरकार प्रत्येकी २० रुपयेच भाव देऊन कोंबड्यांची विल्हेवाट लावत आहेत. पोल्ट्री उद्योग करणारे कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे आहे त्या कोंबड्यांना पोसणे त्यांना परवडणारे नाही म्हणून ते स्वत: कोंबड्यांना मारून पुरत आहेत.
वेगवेगळ्या देशात होणारी चिकनची निर्यात थांबली आहे, त्या देशांनी रोगाच्या दहशतीने निर्यातीवर बंदी घातली आहे. केवळ एका महिन्यात यामुळे सहाशे कोटीचे नुकसान झाले. केवळ एक ग्रॅम संसर्गित पक्ष्यांच्या विष्ठमुळे दहा लाख पक्ष्यांना याची लागण होऊ शकते.
भारतातच नव्हे थायलंड, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, जपान आदी देशांत या रोगाने आपली दहशत बसवली आहे. फ्लू सदृश्य या रोगांच्या दहशतीने लाखो लोकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. सुदैवाने भारतात आत्तापर्यंत एकही माणसाला या रोगाची लागण झालेली नाही पण नजिकच्या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
कुक्कुटपालन करणाऱ्यांनी स्वच्छतेची पक्ष्यांना योग्य प्रकारे लसीकरणाची सोय केल्यास या रोगाला प्रतिरोधीत केले जाऊ शकत शकते. कोंबड्यांची योग्य प्रकारे हाताळणी करून त्यांच्या विष्ठेची योग्य सोय लावावी. बाधित कोंबड्यापासून दुसऱ्या कोंबड्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये.
कोंबड्या हाताळताना, हात, तोंड, डोळे, इतर त्वचेच्या उघड्या भागाशी पक्ष्यांचा संपर्क टाळावा. लोकांना बर्ड-फ्लूच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य व त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेऊ शकेल.
उपचारापूर्वीच प्रतिबंधाची काळजी घेतल्यास बर्डफ्लूचे भूत लोकांच्या मनातून उतरून लाखो बेरोजगारांचे रोजगार त्यांच्या हाताशी येतील व सामान्य लोक चिकन अंड्यांचा आस्वाद पूर्वीप्रमाणेच घेऊ शकतील. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद