पर्यावरण संतुलन निबंध मराठी | environment balance essay marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण संतुलन मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.या अमर्याद विश्वात सजीव सृष्टी असणारा असा पृथ्वी हा एकच ग्रह आहे. हवा, पाणी यांच्या उपलब्धतेमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी विकसित होत गेली.
पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत हवामानाच्या दृष्टिकोनातून अनेक उलथापालथ झाली, स्थित्यंतरे झाली, हिमयुग, आत्यंतिक उष्णता या प्रकारचे बदल पृथ्वीने अनुभवले आहेत. हजारो वर्षे झाली तरी पृथ्वीतलावरील हवामान हे बदलते आहेच.
विशेषतः पृथ्वीवरील तापमान वाढत आहे, यासाठी केवळ नैसर्गिक घटकच कारणीभूत नसून मानव प्राणी ही त्याला . जबाबदार आहे. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते. मिळालेल्या उष्णतेपैकी थोडी उष्णता धारण करून बाकीची अवकाशात परावर्तित केली जाते. आज मात्र मानवाच्या हव्यासापोटी, औद्योगिक आर्थिक लालसेपोटी इंधनाच्या बेसुमार वापराने,
कारखान्यातील घातक वायूमुळे वातावरणातील कार्बनडायऑक्साईड, सल्फरडायऑक्साईड, क्ल्युरोफ्युरो कार्बनमुळे वातावरणात उष्णता जास्त प्रमाणात शोधून घेतली जाते. त्यामुळे तापमान वाढते, त्यालाच 'हरितगृह परिणाम' असेही म्हणतात. ही तापमानाची वाढ दशकात ०.५° एवढ्या वेगाने होत आहे. २० व्या शतकात शेवटच्या तीन-चार दशकात तापमानाच्या वाढीचे प्रमाण वेगात होते, असे स्पष्ट झाले आहे.
माणूस हा आपल्या नित्यनैमित्तिक व्यवहारासाठी घरे, शेती, कारखाने आणि प्रत्यक्ष इंधन म्हणून ही जंगलतोड बेसुमार प्रमाणात करीत आहे. त्यामुळे जमिनीची तर धूप वाढतेच. शिवाय हवेतील रखरखीतपणाही मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. ३३% ऐवजी २०% जंगले मानवाच्या तावडीतून एवढेच जंगलक्षेत्र आज उपलब्ध आहे. या वृक्षतोडीमुळेही तापमानात वाढ होते.
जगातील सर्वात मोठे जंगल अॅमेझॉन खोऱ्यातील विषुववृत्तीय जंगलालाही धनदांडग्यांचा ठेकेदारांचा विळखा पडला आहे. जंगलतोडीमुळे पृथ्वीची फुप्फुसेच कमजोर केली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.
तापमान वाढीचे दुष्परिणाम आजच आपल्याला दिसू लागले आहेत. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहेत. हा बर्फाळ प्रदेश अक्रसला जात आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. याच वेगाने बर्फाचे वितळणे सुरू राहिले, तर समुद्राकाठची सिंगापूर, हाँगकाँग, मुंबई, कोलकाता, मॉरिशस, लक्षद्वीप, मिनीकॉय ही बेटे, बंदरे, शहरे पाण्याखाली जातील व कोट्यवधी लोकसंख्येस विस्थापित करावे लागेल.
हिमालयासारख्या पर्वताची हिमरेषा वरवर सरकत आहेत. बर्फाच्या टोप्या वितळून गंगा, सिंधू नद्यांना आता पूर येतील. भविष्यात मात्र तेथे बर्फ शिल्लक न राहिल्याने या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतील. कारण वितळणारा बर्फ हाच या हिमालयीन नद्यांना उन्हाळ्यातील प्रमुख जलस्रोत असतो. या नद्यांची पात्रे अरुंद होत आहेत. आजच या खोयात पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पाण्याच्या वाटपावरून भविष्यात शेजारील राष्ट्रामध्ये संघर्ष उद्भवू शकतो.
पाण्याचा स्रोत बंद झाल्याने कृषी, जलविद्युत कारखानदारीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. योग्य उपाय योजना न केल्यास राजस्थानमध्ये एकेकाळी सरस्वती नदी होती. तिचा उपग्रहामार्फत शोध घेणे चालू आहे. त्याचप्रमाणे गंगा नदीमुळे भारत सुजलाम् सुफलाम् होता. हे इतिहासाच्या पानातील हे एक वाक्य असेल.
आज वाढत्या तापमानामुळे पावसाचे वितरण बदलले आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात पाऊस कमी पडतो, तर कमी पावसाच्या प्रदेशात पाऊस जास्त पडतो आहे. राजस्थानच्या वाळवंटात जसा या वर्षी पाऊस पडला. तसा पडत राहिला तर वेदकालीन सरस्वतीचे पुनरुज्जीवनही होईल.
वाढत्या तापमानामुळे समशीतोष्ण युरोपात उष्माघात वाढत आहेत. चक्रीवादळे विध्वंस घडवून आणत आहेत. वाढत्या तापमानामुळे व प्रदूषणामुळे ओझोनच्या थराला हानी पोहोचू शकते. त्यानंतर होणारी मनुष्य व निसर्गाची हानी अपरिमित असेल. आज वाढत्या तापमानाचा मानवाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
वाढत्या तापमानामुळे होणारे धोके लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाय होणे गरजेचे आहे. विकसित विकसन सर्वच राष्ट्रांनी औद्योगिक, आर्थिक याबाबतीत कडक कायदे बजावून त्यांची अंमलबजावणी कसोशीने करायला हवी. कारण वातावरण हे वैश्विक आहे व वाढत्या तापमानाचे परिणाम अविकसित तसेच विकसित राष्ट्रांनाही मोजायला लागणार आहेत.
तापमानात वाढ करणाऱ्या प्रदूषित वायूवर नियंत्रणे लादली पाहिजेत. वृक्षांचे आच्छादन वाढविले पाहिजे. तर पृथ्वीचे वाढणार तापमान नियंत्रणात ठेवून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे व पर्यावरणाचे रक्षण होईल !मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद