पर्यावरण प्रदूषण मराठी निबंध | essay on environmental pollution in marathi

 पर्यावरण प्रदूषण मराठी निबंध | essay on environmental pollution in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  पर्यावरण प्रदूषण मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या पतीचे काही परदेशी मित्र आमच्याकडे आले होते. तेव्हा आम्ही त्यांना पुणे शहर व शहरातील इतिहास प्रसिद्ध स्थळे, धार्मिक स्थळे अशी विविध ठिकाणे दाखवण्यासाठी जात होतो. काही विशिष्ट रस्त्याने गाडी आल्यावर एक विलक्षण दुर्गंधी आली आणि आपोआपच सर्वांचे रुमाल नाकाजवळ गेले. परदेशी पाहुण्यांच्या चेहऱ्यावर मात्र वेगळ्याच भावाच्या आठ्या पसरून गेल्या. मला त्यावेळी अपमानास्पद, लज्जास्पद वाटले. मनोमनच मी अमेरिका, युरोप देशातील स्वच्छ सुंदर रमणीय वातावरण आणि आपल्या देशातील रस्त्यावरचे कचऱ्यांचे ढीग इतर घाण, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे जंजाळ यांची तुलना करू लागले.


आज बघावे तिकडे प्रदूषणाचे साम्राज्य पसरलेले दिसते. हे प्रदूषण ही काही एका घटकापुरते मोजकेच नाही तर त्याने जमिनी, हवा, पाणी, ध्वनी या साऱ्यांचाच मक्ता केव्हाच घेऊन टाकला आहे. जमिनीवरच्या प्रदूषणामध्ये तर उल्लेख करावा तेवढा कमी पडेल. घरातील केर-कचरा तेवढा कमी पडेल, घरातील केर-कचरा रस्त्यावर, अगणात टाकणे, वाटेल तेथे कुठेही पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे, निरुपयोगी कागद, पिशव्या, कापडाच गाळ कुठही फकणे. याशिवाय रस्त्या-रस्त्यावर ज्या कचरा कुंड्या असतात त्यातून ओसंडून कचरा पुन्हा रस्त्यावर येतो.


 कचऱ्यातून कागद, प्लॅस्टिक, भंगार गोळा करणारे या कचरा कुंड्यातील कचरा विखुरून टाकतात. शिवाय भाजीविक्रीच्या मंड्या तर कचऱ्याने खच्चून भरलेल्या दिसतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जागा अपुरी पडत आहे. मूलभूत गरजांपैकी निवाऱ्याची सोय व्यवस्थित नसल्यामुळे उघड्यावर मलमूत्र विसर्जन यामुळे तर वाढत्या प्रदूषणाबरोबर रोगराई पसरण्यासही मदत होते. 


हवा प्रदूषणात उद्योगधंदे कारखान्यांच्या धुराड्यांमधून विविध प्रकारचे विघातक वायू हवेत सोडले जातात. तसेच वीटभट्ट्या, बेकऱ्या यामधून सोडल्या जाणाऱ्या धुरात कार्बन मोनॉक्साईडसारख्या विषारी वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. किंवा वातावरणातील वायूचक्रातील सर्व वायूंचे समतोलपणा ढासळतो. परिणामी आम्लपर्जन्य किंवा फुप्फुसांचे विकार, क्षय, दमा यासारख्या रोगांना बळी पडावे लागते.


'पाणी हे जीवन आहे' असे आपण म्हणतो वातावरणातील थोडक्यात पृथ्वीवर २/३ भाग पाणी आहे. पण त्यांपैकी ९७% पाणी खारट आहे तर उर्वरित ३% पाण्यापैकी २% पाणी उत्तर व दक्षिण गोलार्धात बर्फावस्थेत आहे. बाकी १% पाण्यापैकी ०.६०% पाणी जमिनीत ३०० फूट खोलीवर भूगर्भात आहे. त्यामुळे केवळ पृथ्वीवर भूगर्भात आहे. त्यामुळे केवळ पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या गोड्या पाण्यापैकी फक्त ०.४% पाणी शेती व मानवासाठी उपयुक्त आहे. _ भारतात आढळणारे २/३ आजार हे (कावीळ, कॉलरा, विषमज्वर, अतिसार, आमांश वगैरे) दूषित पाण्यामुळे होतात, कारखान्यातून उत्सर्जित होणारे द्रव्य, मळी, साफसफाई, शीतकरण, रसायनांचे विलीनीकरण या साऱ्याचे सांडपाणी शेवटी नदी, नाले किंवा समुद्रात सोडले जाते.


शहरी व ग्रामीण भागात सांडपाणी (मैला-पाणी, केर-कचरा) हे तर औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यापेक्षा चारपटीने जास्त असते. भारतातील ३११९ महानगरे व शहरे यांपैकी फक्त २१७ शहरात अंशत: सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.


याचबरोबर शेतात पिकावर फवारले जाणारे कीटकनाशके, खते, जंतुनाशके जमिनीवरून पावसाच्या पाण्याबरोबर नद्या, नाले विहिरीत वाहत जाते. हेच दूषित पाणी भूगर्भातील पाण्याचे साठे प्रदूषित करतात. याचबरोबर समुद्रात सोडले जाणारे 'बॅरल वॉटर' ही सागरी जीवसृष्टीसाठी समस्या बनत आहे.


आवाजाची तीव्रता ठरावीक मर्यादेपलीकडे गेल्यास तो आवाज आपल्याला नकोसा होतो. त्यास आपण गोंगाट म्हणतो. असा हा कर्णकर्कश गोंगाट रस्त्यावरील चालणाऱ्या व दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांचे हॉर्न, लोह, पोलाद निर्मितीचे कारखाने, छापखान्याचा आवाज, लाकडाचे कारखाने, कापडगिरण्या, मिक्सर, विविध समारंभात लावले जाणारे आवाजवर्धक लाऊड स्पीकर्स, विमानांचा आवाज या साऱ्यांमुळे निर्माण होतो. याचा दुष्परिणाम म्हणजे बहिरेपणा येणे, मानसिक शांती नष्ट होणे, त्यातून डोकेदुखी, चिडचिडेपणा या व्याधी जडतात. सातत्याने मोबाईलचा ध्वनी ऐकत राहिले किंवा मोबाईलवर बोलत राहिले तर त्यातील किरणे प्रारणे यामुळे कर्करोगाची शक्यता नुकतीच शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.



या विज्ञानाच्या आधुनिक प्रगत जगातील एक महत्त्वाचे प्रदूषण म्हणजे आण्विक कचरा व दुसरे जुने कॉम्पुटर फ्लॉपी डिस्क आधी कचऱ्यात गेलेल्या वस्तू होय. याही विघटन होत नाहीत. हवा, पाणी, जमीन या पर्यावरणाच्या प्रमुख घटकांचे प्रदूषण पर्यावरणातील जैविक संतुलन बिघडवण्यास कारणीभूत आहे.


वृक्षतोडीपासून पर्यावरणाचा विनाश सुरू होतो. राहण्यासाठी, रस्ते रुंद करण्यासाठी, कारखाने बांधण्यासाठी, वर्षानुवर्षे अनेक जीवांचे, पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेले, कधीतरी दमलेल्या पांथस्थास सावलीची, विश्रांतीची हक्काची जागा आता नष्ट होत आहे.


कधी कधी पेपरला एखाद्या दुर्मिळ पक्षाचा फोटो येतो कुठेतरी जंगलात जाऊन घेतलेला. कारण आता शहरात दुर्मिळ पक्षीच काय पण कावळे चिमण्या या लहान बाळाच्या गोष्टीतील मित्र वास्तवात अदृश्य होत आहेत. वृक्षतोडीमुळे दुष्काळ, दुष्काळामुळे कर्जबाजारीपणा, पाण्यासाठी वणवण, कधीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक बातम्या प्रसिद्ध होतात.


या सगळ्यांस कारण म्हणजे पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आहे. बोरीवलीच्या राष्ट्रीय उद्यानातही मानवाने राहण्यासाठी जागा वापरली. 'राखीव' शब्दाची मर्यादाही ओलांडली त्याचे परिणाम मग 'मानवी वस्त्यांवर बिबट्यांचे हल्ले' या मथळ्यात प्रसिद्ध होऊ लागले. - हे सारे दुष्टचक्र थांबवण्यासाठी सरकार १९५२ पासून वनमहोत्सव, देवराई, वनराई अशा विविध चळवळी राबवत आहे.



 सामाजिक वनीकरण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन केले जात आहे. हवा, पाणी, जमीन प्रदूषण प्रतिबंधक कायदेही तयार झालेले आहेत. मग प्रश्न पडतो तरीही असे का ? कधी-कधी वाटते सरकारी दिरंगाई, चालढकलपणा, कामचुकारपणा किंवा अंमलबजावणीत दोष हे ही उत्तर असू शकेल.


खरे तर या कायद्यांपेक्षा प्रत्येकानेच कायदे, नियम बनवले पाहिजेत. जसे एक दाणा पृथ्वीवर रुजत घातल्यावर पृथ्वी आपल्याला भरभरून दान देते तसेच या पर्यावरणासाठी स्वच्छ सुंदर, निसर्गाच्या बचावासाठी सगळ्यांनी ठरवले पाहिजे. निसर्ग हा दारातच, घराच्या अंगणापासून सगळीकडे असावा. स्वच्छ सुंदर अशी झाडे, हिरवाई, स्वच्छ खळबळत्या नद्या, ओढे, शांत प्रसन्न वातावरण असे जर असले तर मानसिक ताणातून मुक्त होण्यासाठी महाबळेश्वर, माथेरानला जावे लागणार नाही. कारण खुद्द निसर्गराजाच आपल्या दारी अवतरलेला असणार त्याच्या स्वागतासाठी पक्ष्यांची कुंजन तर यासाठी झाडे लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. कारण

'छायामन्यस्य कुर्वान्ति तिष्ठान्ति स्वयमातपे !

फुलान्यारि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव !' 

त्याग भावनेने उभे राहणारे, दुसऱ्यांना फळे, फुले देणारे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष सत्पुरुषच असतात ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद