मी अनुभवलेले एक साहित्य संमेलन मराठी निबंध | mi anubhavlele sahitya sammelan marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज मी अनुभवलेले एक साहित्य संमेलन मराठी निबंध बघणार आहोत. वाचाल तर वाचाल', या उक्तीचा पुरेपूर फायदा घेण्याचा ध्यासच मला लागलेला होता. नवीन पुस्तक दिसले की, मी त्यावर झडप घातलीच. हाती घेते की वाचून काढलेच. ही आवड अगदी लहानपणापासून माझ्या आजोबांनी लावली. अगदी छोटी रंगीत-चित्रमय गोष्टीची पुस्तके पाहून मला खूप आनंद व्हायचा. आणि आता तर छान गाजलेली पुस्तके आणि आता तर छान गाजलेली पुस्तके आणि त्यांचे लेखक यांचा परिचय करून घेण्याचा मला छंदच जडला. त्यातून एक नामी संधी चालून आली. यावर्षी आमच्या गावी 'साहित्य संमेलन' भरणार होते.
यंदा साहित्य संमेलन आमच्या गावी म्हटल्याबरोबर एक नवीन चैतन्य निर्माण झाले. गावामधील टाऊन हॉल नजीक प्रशस्त पटांगणावर हे भरणार होते. त्यामुळे सगळा गाव कामाला लागला. गावचे मोठे दुकानदार-व्यावसायिक-आर्थिक व्यवस्थाभोजनाची-निवासाची व्यवस्था करण्यात जुटली. शिक्षणसंस्था आमचे महाविद्यालय, गावातील शाळा-शिक्षक-विद्यार्थी मिळेल त्या कामाची संधी घेण्यास तयार होते. शेकडोंनी 'स्वयंसेवक' तयार झाले होते.
मीही अर्थात उत्स्फूर्तपणे कामाला लागलो होतो, कारण मला तर 'पर्वणी' च चालून आली होती, स्वागत समिती पथक - ग्रंथदिंडी - सभागृह सजावट, व्यासपीठाचे सुशोभीकरण, ग्रंथप्रदर्शन, भोजनव्यवस्था, बालसाहित्य, काव्यवाचन, वादविवाद अशा अनेक उपक्रमांसाठी वेगवेगळी दालने. जागाही निश्चित केल्या गेल्या होत्या.
अखेरीस तो दिवस उजाडला. पाहण्यांचे, मा. अध्यक्षाचे मा. साहित्यिक आणि मान्यवर मंडळींचे आगमन मोठ्या वाद्यवृंदाच्या गजरात झाले. आम्ही विद्यार्थी रस्त्याच्याबाजूला उभारून येणाऱ्या साहित्यिकांकडे मात्र अगदी आतुरतेने बघत होतो. एकमेकांना दाखवीत होतो. सर्व मान्यवर साहित्यिकांची निवास व्यवस्था आमच्याच महाविद्यालयात केली होती. त्यामुळे सगळीकडे कसे चकाचक होते. त्यामुळे मी तर प्रचंड खूश होतो.
संमेलनाचा पहिला दिवस तर श्री सरस्वतीच्या मंगलमय प्रार्थना, ईशस्तवन, प्रास्ताविक आणि उद्घाटन - भाषणे इत्यादींमध्ये गाजला. पाच-सहा तास कसे आनंदाने भरून गेले. सारे कसे शांत वातावरण निर्माण झाले होते. भोजनाची वेळ येईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. जेवणाच्या कार्यक्रमामध्ये हास्याचे कारंजे उडत होते. आम्ही सर्व विद्यार्थी त्यावेळेचा फायदा घेऊन आम्ही स्वाक्षऱ्या घेण्यासाठी धडपडत होतो. शब्दाशब्दांवर कोट्या चालू होत्या. कवितेच्या ओळींच्या लहरी उठत होत्या. मागच्या आठवणी निघत होत्या.
दुपारी पुन्हा ५ पासून कविता गायन, लहान मुलांसाठी कथाकथन, परिसंवाद असे कार्यक्रम सुरू होते. रात्री महाराष्ट्रात गाजलेले 'ती फुलराणी' या पु.लं.च्या नाटकाचा प्रयोग ही रंगाला होता. मी मात्र हे सर्व डोळ्यांनी पाहत होतो, कानांनी अगदी भरभरून मनात साठवीत होती, टिपून घेत होतो.
दुसऱ्या दिवशीच्या साहित्यातील विविध प्रकार आणि त्यांच्यावरील चर्चा, समीक्षा टीका यांना उपस्थित होतो. पण सर्व काही डोक्यावरून जात होते. सर्व साहित्यिक चर्चेच्यावेळी हमरीतुमरीवर आलेले आढळत होते. रात्री विविध करमणुकीचा कार्यक्रम झाला. मला मात्र तिसऱ्या दिवशी सकाळीच हा 'शारदेचा दरबार' संपणार म्हणून हुरहुर लागून राहिली. परंतु तरीसुद्धा या साहित्यसंमेलनातील अनुभव - 'काव्यशास्त्र विनोदा'चा आनंद मात्र कायम लक्षात राहिले हे खरे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद