आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने मराठी निबंध | AAJCHA TRUNAPUDHIL ADARSH ANI AVHANE ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने मराठी निबंध बघणार आहोत. एका मित्राने दुसऱ्याला विचारले, काय रे तुझा जीवनात कोण आदर्श आहे किंवा कोणत्या व्यक्तीला तू तुझा आदर्श मानून चालतोस ? अशी कोणती आदर्श व्यक्ती आहे जी तुला नेहमी तुझ्या मार्गात तुला प्रोत्साहन देते ?
यावर दुसरा मित्र विचारात पडला त्याला काहीच सुचले नाही पण लगेच तो म्हणाला आदर्श वगैरे आपल्याला माहीत नाही पण आपल्याला चिक्कार पैसा कमवायचा आहे. मग तो कसाही मिळविला तरी चालेल आपल्याला अमिताभ सारखी प्रसिद्धी पाहिजे आणि भरपूर गाड्या आणि बंगले पाहिजेत.
आज भारतातल्या बहुतांश तरुण मुलांचे विचार असेच असलेले आपल्याला आढळेल. आज बहुतांशी युवक आपल्याला आई-वडील, सरकार आणि इतर प्रत्येक गोष्टीला शिव्या देत असलेले आपण पाहतो. आज सर्वांना सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अंबानी यांच्या सारखे श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचे आहे..
खरं पाहिलं तर आजच्या तरुण पिढीला कोणीच आदर्श नाही. अशी एकही व्यक्ती नाही की जिच्याकडे पाहून तरुणांना वाटेल की हो, मला या व्यक्ती सारखे बनायचे आहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्या व्यक्ती नक्कीच आदर्श घेण्यासारख्या व्यक्ती आहेत
पण आज यांच्या पैकी कोणीही जिवंत नाही. आज जिवंत आहेत लालूप्रसाद यादव, दाऊद इब्राहिम, वीरप्पन आणि अनेक भ्रष्टाचार आणि गुंडगिरी करणारे नेते, गुंड व्यावसायिक आज विद्यार्थ्यांना ऐकवले जाते की कशी आजची पिढी फुकट गेलेली आहे; वाया गेलेली आहे.
परंतु गेल्या ४० वर्षात अशी एखादी व्यक्ती आहे का / की जी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, म. फुले, टिळक, सुभाषचंद्र बोस, आंबेडकर यांच्या बरोबरीची आहे. आज जे शिक्षण आणि पालक जे विद्यार्थ्यांना त्यांची पिढी वाया गेली व आदर्शहीन असे म्हणतात.
त्याला जबाबदार त्या शिक्षकांची आणि त्या पालकांची समकालीन पिढीच आहे वरील एवढी पर्वताएवढी महान आदर्श व्यक्ती असताना या शिक्षकांच्या आणि पालकांच्या पिढीतून एकही आदर्श व्यक्ती आज उभी नाही हा दोष कुणाचा ?
तरी कल्पना चावला, सचिन तेंडुलकर व इतर काही मोजके तरुण व्यक्ती सोडले तर सध्या आदर्श कोणी नाही आणि आजच्या पिढीला हे स्वत:च करावे लागेल त्यांना कोणी आदर्श नाही म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही त्यांना स्वत:चा आणि पुढच्या पिढीसाठी लागणारा आदर्श स्वत:लाच बनावें लागेल.
तरुणांना आज झटपट श्रीमंत व्हायचे आहे सर्वांना तेंडुलकर, कल्पना चावला, बच्चन बनायचे आहे परंतु ते बनण्यामागील अफाट मेहनत आणि प्रचंड जिद्द ह्या गोष्टी तरुणांनी नीट समजावून घेतली पाहिजे आणि पालकांनी शिक्षकांनी ते त्यांना शिकवले पाहिजे. त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
तेंडुलकर एका महिन्यात किंवा एका वर्षात तेंडुलकर झाला नाही की कल्पना एका रात्रीत स्पेस शीपमध्ये गेली नाही. तर दिवसातून १० तास सतत बॅटींगची पॅक्टिस ती सुद्धा अविरत एकही दिवस न थांबता किती तरी वर्ष केल्यावर आजचा तेंडुलकर जन्माला आला आहे जो आपण आज पाहतो. कित्येक रात्री जागून,
सर्व गोष्टीचे भान विसरून योग्य अभ्यास केल्यावर आणि सर्व परीक्षा पास झाल्यावर सर्व ट्रेनिंगमध्ये यशस्वी झाल्यावर कल्पना चावलाला अंतराळात जाण्यास संधी मिळाली. या गोष्टी मिळविण्यासाठी किती अडचणी दु:ख मानसिक त्रास इतरांचे दडपण हे त्यांनी सहन केले हे तरुणांनी समजून घेतल्याशिवाय त्यांची योग्यता किंवा महानता कळणार नाही.
ही गोष्ट खरी आहे की आदर्श मानाव्यात अशा व्यक्ती आज बोटावर मोजण्या इतक्या आहेत परंतु जर उद्याच्या पिढीला जर आदर्श द्यायचा असेल तर तो आदर्श हा आजच्या तरुणांमधून आजच्या पिढीतूनच निर्माण झाला पाहिजे जर आजची तरुण पिढी आम्हांला कोणीच आदर्श नाही म्हणून रडत बसली तर त्यांच्या पुढे येणाऱ्या पिढीला बिघडवण्याचे किंवा आदर्श विहीन बनवण्याचे पाप हे आजच्या पिढीवर बसेल.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, म. फुले, आंबेडकर, भगतसिंग ह्या व्यक्ती जरी आज शरीराने नसल्या तरी त्यांच्याबद्दलचे ग्रंथ पुस्तके हे तरुणांना मार्गदर्शन जरूर करतील एवढी महान परंपरा लाभलेला आपला भारत देश आजपर्यंत किती तरी उच्च महान आदर्श व्यक्ती या देशाने जगाला दिले आहेत.
त्या महान देशाची उच्च संस्कृतीची ही महान परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी ही आजच्या युवा तरुण पिढीवर आहे आणि आजसुद्धा ती जबाबदारी सशक्तपणे पेलण्याची ताकद आपल्यात आहे आणि आजचे तरुण ते करून दाखवतील.
आज ग्रंथ पुस्तके आणि केवळ ग्रंथ पुस्तके हेच आजच्या तरुण पिढीचे आदर्श बनू शकतात. फक्त गरज आहेती फक्त त्यांना उघडून वाचण्याची समजण्याची आणि ते कृतीत आणण्याची हे संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. पं. रविशकर हे सतार वादनात जगद्विख्यात आहेत.
राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे थोर मिसाईल तज्ज्ञ आहेत. समाज सुधारक बाबा आमटे यांच्यासारखा वटवृक्ष आहे. पु. ल. देशपांडे साहित्यात एक आदर्श व्यक्तिमत्त्व, भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे अण्णा हजारे, खेळात आपल्या देशाचे नाव उंचावणारी अंजू जॉर्ज, अंजली भागवत या महिला खेळाडू या वरील सर्व दिग्गज व्यक्ती आपापल्या क्षेत्रात महत्तम कामगिरी केलेले आहे.
यांच्याकडे पाहिले तर वाटते की अजून परिस्थिती एवढी खराब नाही जेवढी आपल्याला दिसते किंवा वाटते. वरील व्यक्तींनी सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीतून अडचणींना सामोरी जात त्यांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांनी वंदनीय असे स्थान प्राप्त केले आहे. म्हणून आज गरज आहे ती आपला आदर्श शोधण्याची.
त्यामुळे जरी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वा.वीर सावरकर यांसारखी अष्टपैलू व्यक्ती जरी आज हयात नसल्या तरी त्यांनी केलेली उत्तुंग कामे ही सदैव पुढे येणाऱ्या पिढ्यांना एक आदर्शच आहेच
या महान व्यक्तींनी त्यांच्या काळात प्रचंड विरोधात जिवावर उदार होऊन त्यांनी आपल्या ध्येयासाठी आपल्या लोकांसाठी या देशासाठी कार्य केले. जरी परिस्थिती निराशाजनक असली तरी वरील व्यक्तींकडे पाहिले तर खरोखरच जाणवते की
आजची परिस्थिती त्या महान व्यक्तींच्या काळातल्या परिस्थिती एवढीसुद्धा वाईट नाही. त्यामुळे आदर्श हे आजच्या पिढीला नाहीत किंवा आजची तरुण पिढी आदर्शविहीन आहे असे मुळीच नाही. गरज आहे ते थोडासा शोध घेण्याचा आणि 'स्व'चा आविष्कार करण्याचा.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद