बालकामगार एक समस्या मराठी निबंध । Balkamgar Ek Samasya In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बालकामगार एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरची गाणी मला सांगा, मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो असे महान कवी शेलेने एका ठिकाणी म्हटले होत. हे वाक्य जगभर खूप गाजले. परंतु ज्या देशाच्या भावी तरुणांच्या ओठावरचे गाणे दारिद्रय आणि मजुरीच्या ओझ्याखाली दबले आहे त्या देशाचे भवितव्य अंधकारमय आहेत.
ज्या कावळ्या संस्कारक्षम वयात सुसंस्काराची बीजे रोवली जातात. त्याच वयात जीवनसंघर्षाला सामोरे जाण्याची वेळ या बालकावर यत. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही व त्याचे रूपांतर बालकामगाराची सख्या वाढण्यात हात.
भारत हा गरिबांची वस्ती असलेला श्रीमंतांचा देश आहे. आज भारतात २५% पेक्षाही जास्त लोक दारिद्रयरषखाला आहेत. दरिद्री कुटुंबात कष्टणारे हात कमी कमी व खाणारी तोंडे जास्त असे व्यस्त प्रमाणात झाल्यामुळे घरातील बालकांना वारेमाप कष्ट उपसावे लागते..
बालकामगाराच्या समस्या जाणून घेण्यापूर्वी आपण बालकामगार म्हणजे काय ते समजून घेऊ या. भारतीय राज्यघटनेत मुलाचा पिळवणूक करणाऱ्या आणि धोकादायक कामापासून संरक्षण देणारे कलम ३२ अस्तित्वात आहे. या कलमानुसार बालकामगाराची व्याख्या अशी केली आहे.
लहान मुलांच्या शिक्षणात व्यत्यय आणणारे काम, मुलांचे आरोग्य, शारीरिक, आध्यात्मिक, नातक आणि सामाजिक विकासाला खीळ घालणारे किंवा धोकादायक ठरणारे काम मुलांना देणे म्हणजे बालमजुरी.बालकामगारांची समस्या ही जागतिक समस्या आहे. आशिया खंडात यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवरील चौदा वर्षांच्या आतील बालकामगारांपैकी १५% बालकामगार भारतात आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात सहा कोटी बालकामगार आहेत. या आकडेवारीवरून आपणास असे लक्षात आले असेल की २०२० साली विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील बालकामगारांच्या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहावे लागेल.
या बालकांना गिरणीत मजूर म्हणून किंवा बांधकामावर गवंडी म्हणून, नाहीतर हॉटेल्स, शेतीकाम इत्यादी ठिकाणी कामाला जुंपले जाते. लहान मोठ्या-उद्योगधंद्यांमध्ये कमी वेतनावर बालकामगारांचा भरपूर उपयोग करून घेतला जातो. पोटाची खळगी भरावी म्हणून ही मुले हा अन्याय निमूटपणे सहन करतात.
समस्या निर्मितीची कारणे : पालकांचे दारिद्र्य : २) शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी ३) परदेशी घुसखोरी. कधी कधी या बालकांमार्फत अमली पदार्थाचा व्यापार केला जातो. आणि यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते.बालकामगारांना गलिच्छ वस्तीत अथवा रस्त्यावर पुलाखाली कोठेतरी राहावे लागते. त्यांच्यापैकी कित्येकांना रस्त्यावरचे शिळेपाके अन्न खाऊन उदरनिर्वाह करवा लागतो.
आजची मुले उद्याचे जबाबदार नागरिक होत. भविष्यातील उज्ज्वल भारताचे भावी आधारस्तंभ होत. ते भुकेकंगाल, निरक्षर, अज्ञानी आणि दु:खी, कष्टी असतील तर त्यांचा आणि देशाचा विकास कसा साधला जाणार? या मुलाच्या व्यक्तिविकासासाठी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाणे अत्यावश्यक आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचायला हवे. पण आजही शाळेपासून दूर राहिलेली काही मुले आहेत. ही शाळेत येण्यायोग्य मुले एस. टी. स्टँड, हॉटेल, भाजी बाजार,
रेल्वे स्टेशन येथे काम करताना दिसतात, फुटपाथवर झोपलेली दिसतात. त्यांच्याकडे पाहिलं की सहृदय कविमनाला प्रश्न पडतो. १३ ऑक्टोबर २००० च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने बालकामगारांसाठी व शाळाबाह्य मुलांसाठी, महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू केली.
भारतीय राज्यघटनेच्या कलम २४ अनुसार बालकामगार पद्धतीवर बंदी घातली असून चौदा वर्षाखालील बालकांस कोणत्याही कारखान्यात अगर खाणीत व धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई आहे. त्र्याण्णवव्या घटनादुरुस्ती अन्वये प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला जाणार आहे.
माझ्या मते मला वैयक्तिक असे वाटते की बालकामगारांवर रामबाण उपाय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे ठरू शकेल.काही दिवसांपूर्वी बालकांचे हक्क विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक २ मे २००५ रोजी करण्यात आले संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यावर ते २० जानेवारी २००६ रोजी राष्ट्रपतींनी त्यास मान्यता दिली.
पोटभर अन्न - अंगभर कपडा - आणि राहायला घर ते तर हवंच हवं शिकण्याचा हक्क - माझी भाषा माझी संस्कृती यानुसार जगण्याच्या हक्क आणि गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून संरक्षणांचा हक्क हवाय मला असे ठामपणाने सांगतील.
समाजाचे भावी आधारस्तंभ सुसंस्कारित झाले तर समाजाच्या उत्कर्षाचे ते खंबीर पाऊल ठरेल. दारिद्रयरेषेखाली जगण्याची संख्या नगण्य राहील. बालकामगारांची संख्या आटोक्यात राहील. प्रगत व विकसित भारताचे स्वप्न त्याशिवाय पुरे होऊ शकणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका