बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi

 बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  बालमजुरी मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. जगातील सर्वाधिक बालकामगार आज भारतात आहेत. बालमजुरीचे धागे कुटुंबाचा शैक्षणिक दर्जा, आर्थिक परिस्थिती, प्राथमिक शिक्षणाची उपलब्धता, इतर मूलभूत सुविधांची उपलब्धता, कुटुंबातील चालीरीती, रूढी यांसारख्या अनेक गोष्टींशी जोडलेले आहेत.


त्यामुळे बालकामगारांना कामापासून मुक्त करणे, कामापासून दूर ठेवणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे सोपे नाही.बालमजुरांना कामावरून काढून लगेच शाळेत घातले, तरी ते शाळेत टिकत नाहीत. हे ओळखूनच 'रूचिका स्कूल सोशल सव्हिंस स्कूल सोशल सर्व्हिस सोसायटी' या संस्थेने भुवनेश्वर रेल्वे स्थानकावरील मुलांसाठी रेल्वे स्थानकावरच औपचारिक वर्ग सुरू केले. 


सुरुवातीला मुले नियमितपणे वर्गावर येत नव्हती. पालकांना मुलांनी काम करणे अधिक फायदेशीर वाटायचे. रूचिका सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी पालकांना वारंवार भेटून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. 


अनौपचारिक वर्गावर लेखन-वाचन शिकविण्याव्यतिरिक्त वैद्यकीय तपासणी, सहली, पोषक आहार, घर नसलेल्या मुलांसाठी निवाऱ्याची सोय अशा पूरक सुविधा पुरविल्या त्यामुळे वर्गावर नियमित येऊ लागली. हळूहळू ३०० मुलांना स्थानकापासून दूर अशा 'डे केअर सेंटर'मध्ये हालविण्यात आले. या केंद्राचे स्वरूपही अनौपचारिक वर्गासारखे होते. 


या वर्गामधून केवळ लेखन, वाचन याव्यतिरिक्त इतर विषयांचे शिक्षणही दिले जात होते. डे केअर केंद्रावरील शिक्षकांना नियमित शालेय. शिक्षकांप्रमाणेच पगार होता. हळूहळू केंद्रावरील मुलांना शाळांमध्ये नियमित दाखल करण्यात आले. त्या मुलांना आर्थिक व शैक्षणिक मदतही सुरू ठेवली गेली.


प. बंगालचा अनुभव 'सिनी आशा' ही पश्चिम बंगालमधील स्वयंसेवी संस्था स्थलांतरित कुटुंबांवर संस्थेने लक्ष केंद्रित केले. या कुटुंबांमधील मुले बॅटरी उत्पादन, कचरा गोळा करणे, चामड्याचे कारखाने, प्लॅस्टिक उद्योग यांसारख्या धोकादायक उद्योगांमध्ये गुंतविले. 


त्याचबरोबर मुलांसाठी दिवसातले ठरावीक तासच काम आणि इतर वेळी अनौपचारिक वर्गावर शिक्षण अशी योजना आखली. हळूहळू अनौपचारिक वर्गांमधून मुलांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आणले. या सर्व कार्यासाठी मदत घेतली, ती समुदायातील मंडळींची व कार्यकर्त्यांची ८० टक्के मुलांच्या कामाचे तास कमी झाले, २५० मुले नियमित शाळेत दाखल झाली. 


'सिनी आशा' संस्था तेथून बाहेर पडली तरी बालमजुरी निर्मूलनाचा कार्यक्रम तेथे सुरूच राहिला. वस्तीतील बालमजुरांचे पालक, मालक, ट्रेड युनियनचे सभासद, शिक्षक व समवयस्क मुले या सारख्यांच्या सहकार्यामुळेच हे घडू शकले...


'आंध्र प्रदेश स्टेट बेस प्रोजेक्ट'च्या (एपीएसबीपी) अंतर्गत आंध्र प्रदेशात १४-१५ वर्षांच्या शाळाबाह्य बालमजुरांसाठी व्यावसायिक शिक्षणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला गेला. व्यवसाय शिक्षणासाठी नवीन मशिनरी कार्यशाळा निर्माण करण्यापेक्षा गावातील व्यावसायिकांचीच मदत घेण्यात आली. 


मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना गावात अस्तित्वात असलेले कारखाने, दुकाने, कार्यशाळा, उद्योगशाळा, गॅरेज इत्यादी ठिकाणी पाठविण्यात आले. मुलांनी तिथे राहूनच त्या त्या व्यवसायाचे शिक्षण घेतले. अर्थात, यासाठी व्यावसायिकांबरोबर संवाद साधण्याचे, 


व्यावसायिक व मुले यांच्या सुसंवाद राखण्याचे व सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून नियंत्रणाचे काम करावे लागले. समाजातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर केल्यामुळे मार्ग स्वस्त तर ठरलाच, पण अनेक मुलांना कामही मिळाले.


आंध्र प्रदेशात एम. व्ही. फाउंडेशन या संस्थेने तर संपूर्ण भारतासाठी बालमजुरी निर्मूलनाचा आदर्शच घालून दिला आहे. प्रत्येक घरात कार्यकर्त्यांच्या भेटी, न थकता, न दमता त्यांनी पालकांना समजावणे, प्रसंगी त्यांचा शिव्या-शाप सोसणे यातून गावातील प्रत्येक मुलाला त्यांनी शाळेत आणले. 


वेठबिगारी (बॉन्डेड) बालकामगारांच्या मालकांवर कधी ग्रामपंचायतीद्वारे दबाव आणून तर कधी ज्या मालकांनी मुलांची मुक्तता केली, त्यांचा सत्कार करून गावामध्ये जागृती निर्माण केली. मुलांनी शाळेत यावे, म्हणून प्रभात फेऱ्या काढल्या, शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून मुलांसाठी अंशकाळाची शिबिरे घेतली. शाळांमध्ये मुलांची संख्या वाढू लागली.


वर्ग अपुरे पडू लागले. मग झाडाखाली वर्ग घेतले. गावातल्या लोकांनी पैसा उभारून शाळेसाठी इमारत बांधली. शिक्षकांच्या मदतीसाठी कार्यकर्ते नेमले. त्यांचा पगार गावातल्या लोकांनीच वर्गणी काढून दिला. जवळ जवळ ८० गावे त्यांनी बालमजुरीपासून मुक्त केली. यातून ८०,००० बालमजुरांची मुक्तता झाली.


विदेशातील प्रयोग भारताबाहेरही असे अभिनव प्रयोग झालेले दिसतात. थायलंडमध्ये १९९३-१९९४ मध्ये बालमजूर निर्माण होऊच नयेत, यासाठी काळजी घेतलेली दिसते. बालमजुरीचे प्रमाण अधिक असलेल्या भागातील एकूण २२ शाळा


चात आल्या. पहिल्या टप्प्यात या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. मुलांसाठी व शिक्षकांमधील साहित्य तयार कल. दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षित शिक्षकांनी मासिके, वर्तमानपत्रे, पत्रके फिल्मचा कल्पकतेने वापरून प्राथमिक शाळेतील मुलाना बालमजुरीचे दुष्परिणाम, बालहक्क व बालमजुरी संबंधित कायदे याबाबत माहिती दिली.


शाळमध्ये बालकामगार कोपरे निर्माण केले गेले. तिथे बालमजुरीसंबंधी सर्व वाचन साहित्य, पोस्टर्स, घोषणा लावल्या भल्या मुलासाठी बालमजुरीसंबंधी गटचर्चा, परिसंवाद, प्रश्नमंजूषा, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.


मुलांच्या पालकांचे 70 आयाजित करून माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व व बालमजुरीचे दुष्परिणाम यांबद्दल उद्बोधन करण्यात आले. या सर्व कामामध्ये शिक्षकांनी अविश्रांत काम केले. परिणामत: २२ शाळांमधील सर्वच्या सर्व मुलांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एकही मुलगा अथवा मुलगी शाळा सोडून गेली नाही.


बालमजुरीचे एक कारण म्हणजे पालकांमध्ये शिक्षणाच्या फायद्याबद्दल जाणीव नसणे, हे लक्षात घेऊन टांझानियामध्ये गरीब पालकांच्या मुलांसाठी खास पूर्वप्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला गेला. शाळांमधून मुले गळतीचे प्रमाण जिथे अधिक होते, असे पाच प्रदेश यासाठी निवडले गेले. 


शिक्षणाधिकारी व शिक्षक यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाबद्दल प्रशिक्षण दिले गेले. पालकांनी जाणीव जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले. मुले पूर्वप्राथमिक शाळांमध्ये शिकू लागली. या सर्व उदाहरणांवरून काय दिसते ? बालमजुरी निर्मूलनासाठी पैशापेक्षा आवश्यकता आहे, 


ती अथक प्रयत्नांची! समस्येचे कारण समजून घेऊन धोरणे ठरविणाऱ्या मर्मदृष्टीची, परस्पर सामंजस्याची ! धीर ठेवून काम करण्याची आणि बालमजुरी दूर होऊ शकते या विश्वासाची. असे झाले तर 'बालकामगार मुक्त भारत' हे स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 


निबंध 2 


 बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi


बालमजुरी हा आपल्या समाजाला मिळालेला एक शाप आहे. आपल्या भारतात त्याचे भयावह रूप पाहावयास मिळते. गरीब मागासलेल्या आणि शोषित वर्गातील मुलांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता नसते. निरनिराळ्या प्रकारांनी त्यांचे शोषण उघडपणे आज होत आहे. 


त्यांचे आईवडील, नातेवाईक त्यांना शिक्षण देण्यास समर्थ आहेत ना मोकळेपणाने खेळू देण्यास! नाइलाजाने त्यांना मिलमध्ये, कारखान्यात, घरी, शेतमळ्यात, दुकानात काम करावे लागते. काम करण्याची ठिकाणे तर वाईट स्थितीत असतातच शिवाय धोकादायकही असतात. 



विडी, आगपेट्या, फटाके, गालिचे, कापूस, लोखंड इत्यादी च्या कारखान्यांत हे बालमजूर काम करताना दिसतात. बांधकामावर गवंड्याच्या हाताखाली काम करणे त्यांच्या नशिबातच लिहिलेले असते. घरगडी म्हणूनही ते काम करतात. या बालकामगार असणाऱ्या मुलामुलींची संख्या अंदाजे ७.१८ कोटी असेल. 



एका अनुमानानुसार केवळ १५% बालकामगार कायद्यांतर्गत येतात आणि उरलेले ८५% इकडे तिकडे मजुरी करीत फिरतात. कायदा असून बालकामगार असणाऱ्या कारखानादाराविरुद्ध जे त्यांचे शोषण करतात काहीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. भारतात आतापर्यंत असा कोणताही कायदा-नियम नाही जो मुलांचे शोषण थांबवून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करेल.


भारतासह विविध अविकसित आणि विकासशील देशांमध्ये श्रमासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे बेधडक उल्लंघन करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पाकिस्तानात इकबाल मसीहनामक युवकाला सगळ्यांसमोर यासाठी गोळी मारली की त्याने बालमजुरीविरुद्ध आवाज उठविला होता. 



१८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले 'बाल' समजली जातात. आणि त्यांना 'राइटस ऑफ द चाईल्ड' १९९० अंतर्गत योग्य पालनपोषण व सामाजिक सुरक्षिततेचा व जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मोफत प्राथमिक शिक्षण घेण्याचाही अधिकार आहे. 



आर्थिक शोषणाविरुद्ध दाद मागण्याचाही त्यांना अधिकार आहे. याखेरीज किती तरी अधिकार त्यांना आहेत पण ते सर्व कागदावरच प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होतच नाही. वास्तव स्थिती फार भयानक आहे. त्यांचे लैंगिक शोषण होत आहे. मुलींना वेश्यावृत्ती स्वीकारण्यास जबरदस्तीने तयार केले जाते. 



अंमली पदार्थांची तस्करी त्यांच्याकडून करवून घेतली जात आहे. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. आहे की सरकार, पुढारी, नेते, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, शिक्षक इत्यादी सर्वांनी एकत्र येऊन बालमजुरीविरुद्ध एक शक्तिशाली चळवळ उभी केली पाहिजे. 


जनजागरण करून त्यात जनतेचेही सहकार्य घेतले पाहिजे. गरिबी, अशिक्षितपणा, मागासलेपणा ही या समस्येची मूळ कारणे आहेत. जोपर्यंत ती नष्ट होणार नाहीत तोपर्यंत बालश्रमाची समाप्ती हे केवळ स्वप्नच राहील. गरीब लोक आपल्या मुलांच्या मजुरीच्या पैशांशिवाय उदरनिर्वाह करू शकत नाहीत. 



आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही. त्यांना खेळण्याची संधीही ते देऊ शकत नाहीत. परिणामी या मुलांचे आरोग्य चांगले राहत नाही. ते रोगग्रस्त होतात. त्यातील काही रोग तर जीवघेणे असतात.



बालमजुरांकडून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणे हा एक उपाय होऊ शकतो. परंतु या मुलांना श्रम करू न देणे किंवा त्यांना कामावरून काढून टाकणे यामुळे स्थिती आणखी गंभीर बनू शकते. अशा स्थितीत ते पोट कसे भरतील? म्हणून प्रथम गरिबीच नष्ट केली पाहिजे. 


राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीचे योग्य वितरण व्हावे आणि कनिष्ठ दुर्बल वर्गाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जावा. मुलांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता जपली पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या अधिकारांना व्यावहारिक रूप दिले गेले पाहिजे. परंतु या सर्व गोष्टी आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक समानता आणि औद्योगिक विकासाखेरीज शक्य नाहीत.



मुलांच्या शोषणाचे अनेक प्रकार आहेत. त्यांची चोरी करणे, पळवून नेणे, त्यांना अपंग बनवून भीक मागावयास लावणे, धोकादायक कारखान्यांत काम करावयास लावणे अशा कारखान्यांत ती जखमी होऊ शकतात, डोळे जातात. बालपण एकदाच मिळते त्याचे असे शोषण पाहिले की मनाचा थरकाप उडतो. परंतु सगळीकडे असहायताच दृष्टीस पडते. 



येथील खेड्यांमध्ये गरिबी वाढतच आहे. १९९०-९१ मध्ये ३६% लोक दारियरेषेखाली होते ते आता वाढून ४३-४४% झाले आहे. गरिबीचे उन्मूलन आणि बालमजुरीचे निवारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. गरिबी दूर करण्यासाठी सर्व प्रथम प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले जावे. 


रोजगाराच्या संधी वाढविणे, वेगाने देशाचे औद्योगिकीकरण, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन या गोष्टी लगेच अमलात आणल्याखेरीज बालमजुरी संपविणे शक्य नाही. जोपर्यंत सामान्य जनतेचे राहणीमान उंचावत नाही. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या समस्येवर उपाय सापडणार नाही. 



खेळणे, शिकणे, निरोगी राहणे हा मुलांचा मौलिक अधिकार आहे. भारतासारख्या लोककल्याणकारी राज्यात मुलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्याची चेष्टा करणे आहे.


बालमजुरीचे उन्मूलन ही एक गंभीर समस्या आहे. त्यासाठी गंभीर उपायांची आवश्यकता आहे. त्याच्या आर्थिक, सामाजिक, नैतिक इत्यादी सर्व बाजूंवर गंभीरपणे विचार करण्यात आला पाहिजे. त्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. मुलांना श्रम आणि वेठबिगारीतून मुक्त करून शाळेत पाठविले पाहिजे. 


काही वर्षांपूर्वी विकसित देशांतही ही समस्या सामान्य होती. पण त्यांनी आपल्या औद्योगिक विकास आणि आर्थिक प्रगतीला प्राधान्य दिले आणि विकसित झाले व मुळापासूनच बालमजुरी नष्ट केली. मानव विकासाच्या दृष्टीने भारत फार मागासलेला आहे. 


जोपर्यंत रोगराई, गरिबी, कुपोषण, उपासमार, अशिक्षितपणा असेल तोपर्यंत बालमजुरी समाप्त होऊ शकत नाही. ६ ते १४ वर्षांच्या मुलांना त्वरित मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही आपली पहिली गरज आहे. आपली उदारीकरणाची नीती पण बालमजुरी नष्ट करण्यात साहाय्यक होऊ शकते. कारण


यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि देशाचा विकास होतो. आर्थिक व औद्योगिक सुधारणा, उदारीकरण, जागतिकीकरण ही आणखी काही योग्य पावले आहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद