काल करे सो आज करे आज करै सो अब मराठी निबंध | Kal Kare So Aaj Kar Aaj Kare So Ab Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण काल करे सो आज करे आज करै सो अब मराठी निबंध बघणार आहोत. अर्थात - वेळ हा अनमोल आहे. 'धनुष्यापासून सुटलेला बाण अन् तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि व्यर्थ गेलेला क्षण' हा कधीही परत येत नाही.
कालचक्र हे क्षणाक्षणाला पुढे जात असते. कोणीही कोणासाठी थांबत नाही. म्हणूनच मानवाने आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग लगेच केला पाहिजे. 'वेळ' हा अनमोल आहे. Time is Gold असे म्हटले जाते. तिचा जो सदुपयोग करतो तोच चिरंतन सुखी ठरतो..
आलसस्य कुतो विद्या,
अविद्यस्य कुतो धनम्।
अधनस्य कुतो मित्रम्,
अमित्रस्य कुतो सुखम्।।
या संस्कृत श्लोकामध्ये आजच्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठा उपदेशच केला आहे. विद्यार्थी म्हणजे भावी जीवनाची पतपेढी आहे. विद्यार्थिदशा म्हणजेच त्यांचा अध्ययनाचा काळ हा किती मोलाच असतो. बरेचजण तो काळ आळसात घालवतात. आणि मग मिळवायचे जे ज्ञान ते मिळू शकत नाही.
ज्ञानसंपदा प्राप्त होत नाही मग धनसंपदा त्यांना कोठून मिळणार? अर्थातच पैसा नाही की मित्र पण फिरकत नाही आणि ज्याला खरे मित्र नाहीत. नातेवाईक नाहीत तो सुखी कसा बरे होणार ?
अनेक विद्यार्थी गप्पा मारण्यात, निरर्थक चैनी करण्यात आला वेळ घालवतात, खरोखरीच त्यांच्याबद्दल हळहळ वाटते. वेळेचे महत्त्व समजणारा विद्यार्थी आपला वेळ चांगल्या कामातच घालवतात. केवळ विद्याध्यायनासाठीच वेळेचा उपयोग करावा असे नाही तर.
त्या बालवयातच आपल्या प्रकृतीचीही काळजी घेणे आवश्यक असते. भावी जीवनाची तनपुंजी ही लहानवयापासूनच मेहनत-कवायत-व्यायाम करून जोपासली पाहिजे. लोकमान्यांनी राजकारणात पडण्यापूर्वी आपली शरीर प्रकृती उत्तम करून घेतली होती.
सावरकर आणि त्यांच्यासमान अनेक क्रांतिकारकांनी देशभक्तीला सामोरे जाण्यापूर्वी शरीरसंपदेकडे अधिक लक्ष दिले होते. आणि उत्कट देशभक्तीला तयार होण्याचे ज्ञानही अभ्यासाने मिळविलेले होते. म्हणूनच हा विद्यार्थी दशेतील काळ हा सर्व काही
सर्व प्रकारचे ज्ञान-कलाकौशल्य आत्मसात करण्यास एकदम सक्षम असतो, तयार असतो. म्हणूनच 'मी ते उद्या करीन, पुढे पाहीन.' असे म्हणत बसलात की संपलात. आजचे काम आजच करायला हवे. म्हणतात ना - 'वेळेला शिवला टाका हवा पुढील अनेक टाके वाचवतो.'
'कल करे सो आज कर' हाच संत कबिरांचा दोहा हा अत्यंत उपयुक्त ठरतो. त्याचाच मराठीत अर्थ म्हणजे 'वेळेचा सदुपयोग. छोटीशी मुंगीही दर क्षणाला धडपडत असते.. सारखे काही ना काही जमा करते. पण तिकडे कोण लक्ष देणार ?
आपल्या देशाला 'आळस' हा मिळालेला एक शापच आहे. बुद्धिमत्तेत इथे कोणीही - कधीही कमी पडत नाही. परंतु बहुसंख्य जनताही सूर्यवंशीच आढळणार. अगदी साध्यासोप्या कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणार... सुट्टीचा दिवस हा बिछान्यावर लोळण्यात घालवणार.
नको त्या कथा कादंबऱ्या-चित्रपट किंवा नाटके पाहण्यात वेळ घालवणार. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास तो तयार नसतो. परदेशातील लोकांच्या नको त्या गोष्टींचे अनुकरण करणार परंतु ती माणसे सप्ताहातील पाच दिवस अथक मेहनत करतात,
हे विसरतात. कामात बदल हाच त्यांचा आराम असतो. आणि हे जर असेच चालू राहिले तर या स्पर्धा युगात' आपण कसे टिकणार ? 'जपान'सारखा एवढासा देश. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झाले होते. परंतु तिथला प्रत्येक माणूस हा क्षणाक्षणाचा सदुपयोग करून राष्ट्रांच्या प्रगतीसाठी झटला. आणि आज सुधारलेल्या राष्ट्राच्या मालिकेत जाऊन बसला. कारण त्यांची 'उद्योग प्रियता'.
'काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्।
व्यसनेन तु मूर्खाणाम् निव्या कलहेन वा।।'
तेव्हा विद्यार्थ्यांनीच आपला प्रत्येक क्षण कसा घालवायचा हे ठरविले पाहिजे. परंतु वेळेचे महत्त्व हे त्यांच्यापर्यंत त्यांच्या पालकांकडून-समाजाकडून-शिक्षकांकडून पटविले गेले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्यक्षात घडविले गेले पाहिजे. कवी केशवसुत म्हणतात,
प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुंदर लेणी तयात खोदा।
निजनामे त्यावरती गोंदा, बसूनी का वाढविता मेंदा।। जन्या काळातील कवी... संत हे तर आपल्याला 'वेळेचे भान ठेवा' म्हणून उपदेश करतातच, परंतु आपल्या भारतीयांची वेळेबद्दलची अनास्था पाहूनच की काय, आपल्या कर्तव्यदक्ष पंडितजींना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांची राष्ट्राला संदेश दिला होता : 'आराम हराम है। मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद