मूल्यशिक्षण आणि प्रसारमाध्यमे मराठी निबंध | MULAKSHAR AANI PRASAR MADHYAM ESSAY IN MARATHI

  मूल्यशिक्षण आणि प्रसारमाध्यमे मराठी निबंध | MULAKSHIKSHAN  AANI PRASAR MADHYAME ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मूल्यशिक्षण आणि प्रसारमाध्यमे मराठी निबंध बघणार आहोत. 'जिन्दगी एक सफर हे सुहाना  यहाँ कल क्या हो किसने जाना' हा जगाची बेफिकीर वृत्ती वाढत आहे. आज जगात भोगवाद,चंगळवाद यात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.खा, प्या, मजा करा ही लोकांची वृत्ती बनत चालली आहे. 


आज जे लोक केवळ भौतिक सुखाच्या मागे धावत आहेत त्याना सत्य, प्रेम, सहानुभूती, प्रामाणिकपणा यांचा विसर पडत चालला आहे. आज शाळेत, महाविद्यालयात शिकणारी मुले हे सर्व संस्कार विसरली तर भविष्यात त्यांच्या वाट्याला दारुण उदासीनता येईल. यासाठी मूल्यशिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी यंत्रणा आवश्यक आहे आणि ती आजच्या काळाची गरज आहे..


भारतासारख्या खंडप्राय देशाला आदर्श सांस्कृतिक वारसा असतानासुद्धा या वारसाचे विस्मरण आपल्याला झाले, आपणही भौतिक उन्नतीसाठी मृगजळापाठीमागे धावणारे मृग ठरलो. याचा अर्थ असा नव्हे की विज्ञानयुगाला, उद्योगीकरणाला सामोऱ्या जाणाऱ्या भारताचे पाऊल चुकीचे होते, पण हे करत असताना 


भारतियांच्या मनाचे स्वास्थ्य, सद्गुणांचा विकास ज्या प्रमाणात व्हावयास हवा होता, तो होण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन भारतीय शासनव्यवस्थेने, शिक्षणप्रणालीने दाखविले नाही. ही वस्तुस्थिती आहे.आजच्या समाजातील मूल्यशिक्षण काय आहे या संदर्भात जगद्विख्यात तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे विचार अतिशय मोलाचे आहे ते म्हणतात.


आकाशवाणी, साहित्य, वृत्तपत्रे, सिनेमा, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे मूल्यशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतील आज या साधनांचा समाजावर, समाजातील व्यक्तींच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातही ही साधने हातभार लावत आहेत.


मानवी मनावर संस्कार करण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये नक्कीच आहे. मुलांच्या ज्ञानात भर टाकून त्यांना बहुश्रुत करणे,त्यांच्या विचारशक्तीचा व बुद्धीचा विकास करणे हे कार्य साहित्य उत्तमरीतीने करू शकते. उदा. रामायण, महाभारत, भगवद्गीता इ. वर्तमानपत्र ही जनतेची दैनंदिन गरज होऊन बसली आहे आणि त्यांची वाढती आवश्यकता हे सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे. 


पण काही उत्तम, दर्जेदार वर्तमानपत्रे सोडली तर त्यांचा ओढा लोकमत जागृत करण्यापेक्षा ते भडकवण्याकडेच अधिक असतो, त्याच्या अतिरंजितपणावरच अधिक भर दिला जातो, दोन्ही बाजूंचा विचार करून सत्य प्रदर्शित करण्याऐवजी एकांगी स्वरूपात विचार करून एकतर त्याची अतिरिक्त स्तुती किंवा निंदा केली जाते. 


पक्षीय वृत्तपत्रे तर याहून एक पाऊल पुढे. आपापल्या मतांच्या प्रचारापेक्षा विरुद्ध पक्षाच्या पुढाऱ्यांच्या कुरघोडी करण्यातच त्यांना मौज वाटते. अशीही वर्तमानपत्रे मुलेही वाचतात,त्यामुळे त्यांच्या अपरिपक्व मनावर अनिष्ट परिणाम होतो. 


वृत्तपत्रांनी आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीबाबत थोडा संयम आणि विवेक ठेवला तर दुष्परिणाम टाळला जाऊ शकतो.


लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सगळ्यात जास्त आकर्षण असते ते सिनेमाचे. नट-नट्यांच्या स्टाईलचा परिणाम घरोघरी समाजात सर्वत्र पाहायला मिळतो कॉलेजच्या नावावर घरातून निघून कॉलेजात न जाता सिनेमा पाहायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सारखी वाढत आहे. 


अर्थात यात विद्यार्थ्यांचा दोष आहे असे नाही जागोजागी, कानावर पडणारे अखंड सिनेसंगीत, त्याचप्रमाणे बहुसंख्य चित्रपटांमधून खून मारामाऱ्या, बीभत्स प्रसंग, उत्तान नृत्य, शृंगारिक प्रसंग यांचा भरणा दिसतो. अशाप्रकारचे परिणाम टाळता येऊ शकतात. सिनेमांचे सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांचा शिक्षणासाठी वापर करून घेणे फार आवश्यक आहे.


दूरदर्शन हे देखील तितकेच प्रभावीप्रसार माध्यम आहे. आकाशवाणीवर फक्त आवाज ऐकता येतो, तर चित्रवाणीवर आवाजाबरोबर दृश्यही पाहता येते. कोणत्याही प्रसंगाचे प्रत्यक्ष दृश्य पाहिल्याने त्यातून जो अनुभव मिळतो जे ज्ञान मिळते


जो आस्वाद घेता येतो तो अधिक परिणामकारक असतो. त्यामुळे दूरदर्शन हे अनुभवी व ज्ञानसंक्रमणाचे सर्वोत्कृष्ट सा म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक उपयुक्त कार्यक्रम वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात तेसुद्धा विद्याथ्याना पाहणे आवश्यक आहे.


सिनेमा इतके नसले तरी त्यांच्या खालोखाल आकाशवाणी हे देखील एक दैनंदिन करमणुकीचे साधन बनले आहे.त्याच बरोबर त्यामुळे आपल्या ज्ञानातही भर पडत असते. परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे रेडिओ चालू असतो. 


फक्त विविध भारती, आपकी पसंद, फिल्मी गाणी यांसाठीच गाणी ऐकणे, किंवा म्हणणे हे काही अनैतिक कत्य नाही. पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, आकाशवाणीवर अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. बातम्या महिला शेतकरी


कामगार, व्याख्याने, परंतु ते शाळेच्या, कॉलेजच्या वेळातच होतील असे नाही, तरी त्यासंबंधीही सूचना व पूर्वज्ञान देऊन ते कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकण्यास सांगावेत व दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी कार्यक्रमातील मुद्यांवर चर्चा करावी.


मूल्यांचे शिक्षण देण्याचे कार्य प्रसारमाध्यमे अधिक प्रभावीपणे करू शकतील पैशांचा छनछनाट प्रसिदध आणि मला काय त्याचे ? ही बेपर्वाईची वृत्ती सोडल्यास खरोखरच प्रसारमाध्यमातून मूल्यशिक्षण देणे हे अवघड नाही तर सहज शक्य आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद