पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवतालची परिस्थिती किंवा सजीवांच्या वसतिस्थानाभोवती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम करणाऱ्या घटकांचे भूजैविक दृश्य. पर्यावरण, वने, पर्वत, सरोवर, झाडे, जल यांचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होत असतो.
पृथ्वी हा ग्रहच फक्त पर्यावरण आढळणारा आहे. त्यामुळे मनुष्य, प्राणिसृष्टी, यांच्या जीवनाचे संरक्षण होते, जीवन व्यतीत करणाऱ्या ऋषिमुनींनी आपल्या वंशजांसाठी अगोदरच वराहपुराणात लिहून ठेवले आहे की,
"यावत् भूमंडलात धते, ससैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां, संततिः पुत्रपौतृकी ।।"
जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील.परतु या कृतघ्न माणसाने पर्यावरणाचा, परिणामी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय, हे स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. लोकसंख्येचा विस्फोट होत आहे.
उद्योगीकरण, शहरीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सर्वांमुळे विनाश ओढवला आहे. मनुष्याच्या हव्यासापोटी हे सर्व घडतेय. गांधीजींनी म्हटलं होत की, "There is sufficiency in the world for man's need but not for man's greed."
सरपण, वनौषधी, कागदासाठी लागणारा बांबू, इमारत लाकूड, उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन गेल्यामुळे, मातीची धूप होते आहे. वृक्षसंपत्ती कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होत आहे.
परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढतो आहे.महाराष्ट्रात जुलै २००५ मध्ये अनेक भागांत अतिवृष्टी झाली. नदी पर्यावरणात होणारा अनिबंध मानवी हस्तक्षेप हा या संकटामागचा मुख्य घटक आहे. मुंबईसारख्या महानगरात विक्रमी पर्जन्यानंतर, पावसाच्या पाण्याला साचून राहण्याशिवाय गत्यंतरच नाही अशी परिस्थिती होती.
मानव या २१ व्या शतकात यशस्वी वाटचाल करीत असताना ही सृष्टी अडकली आहे. प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात. जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ग्रहण लावतात त्यालाच प्रदूषण म्हणतात
हवेचे, पाण्याचे, आवाजाचे प्रदूषण औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे वायू, वाहनांतून बाहेर पडणारे कार्बनडॉयऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यामुळे प्रदूषण वाढले आहे.१९८४ ची भोपाळ वायू दुर्घटना तसेच चेर्नोबिलच्या अणुभट्टीतील स्फोट लक्षात घेतल्यास वायू प्रदूषण किती गंभीर समस्या आहे
हे वेगळे सांगण्याची गरज नाही पाण्यास आपण जीवन म्हणतो आणि तेच पाणी कारखान्यांतील टाकाऊ घटक, शहरी वस्त्यांतील सांडपाणी याद्वारे प्रदूषण करतो. परंतु
"पिबन्ति नद्यःस्वयमेव नाम्भः ।
स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा ।।'
म्हणजे नद्या स्वतःचे पाणी पीत नाहीत, झाडे स्वतःची फळे खात नाहीत, त्यांचे जीवन परोपकार करण्यासाठीच असते. मग किती कृतघ्न आहे हा मनुष्य ! असेच मनात येते.'ओझोन' म्हणजे जणू पृथ्वीचा आत्माच ! त्याच्यामुळे पृथ्वीचे आयुष्यमान व तापमान स्थिर राहण्यास मदत होते.
परंतु गेल्या काही वर्षात ओझोनच्या थरास छिद्र पडल्याचे दिसून येऊ लागले आहे. मानवनिर्मिती काही वायूंमुळे 'ओझोन' वायू नाश होऊ लागला आहे. क्लोरो कार्बन, फ्रियॉन गॅस, कार्बन टेट्रा क्लोराईड, हॅलोजन गॅस हे ओझोनचे शत्रू आहेत.
तसेच हरितगृह परिणाम याचाही प्रामुख्याने विचार करावा लागेल. पृथ्वीचे तापमान वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात."In nature there are no rewards or punishments. There are only onsequences."त्यामुळे पर्यावरण संरक्षण आपल्या श्वासाइतके महत्त्वाचे आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्याचा पहिला उपाय म्हणजे जंगलतोड थांबविणे. आणि वनीकरण करणे म्हणजे सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलन पासून प्रेरणा घेऊन त्यादृष्टीने लोकांमध्ये जागृती करणे. तसेच शेतजमिनीवर वृक्षांची व पिकांची एकत्रित लागवड म्हणजेच वनशेती केल्यास पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होईल.
तसेच वातावरणात जास्त झालेल्या कार्बनडायऑक्साइडचे वृक्षांमार्फत शोषण होते, त्याला 'कार्बन सिक्वेट्रेशन' म्हणतात. म्हणून झाडे लावणे आणि वनस्पती निर्माण करणे ही मूलभूत बाब बनली आहे.
१६ फेब्रुवारी २००५ रोजी अस्तित्वात आलेल्या 'क्योटो करारा'ने प्रगती तसेच विकसनशील देशांना वायूंच्या उत्सर्जनाच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. भारतासारख्या देशात निलगिरी सुबाभूळ या पटकन वाढणाऱ्या वृक्षांपेक्षा उंबर, जांभूळ, वड ही झाडे 'कार्बन सिक्वेट्रेशन' अधिक उपयुक्त आहेत.
तसेच प्रदूषणाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात यावेत. अलीकडेच ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत काही कायदे संमत झाले आहेत. त्याची कठोरपणे अंमलबजावणी गरजेची आहे. वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर्स, वॉटर कलर्स ही उपकरणे वापरताना त्यामधून कोणत्याही वायूची गळती होता कामा नये हे महत्त्वाचे आहे.
अन्यथा छोटीशी गळतीदेखील कालांतराने 'ओझोन'च्या सर्वनाशास जबाबदार ठरू शकते. 'सुनिता नारायण' या दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हॉयरॉनमेन्ट (सीएसई) च्या संचालिका आहेत. सीएसईच्या प्रयत्नामुळे दिल्लीबरोबर मुंबई आणि अन्य काही शहरांमध्ये नैसर्गिक आणि द्रवरूप वायूचा पर्यायी इंधन म्हणून वापर स्थिरावतो आहे.
वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे हे मनुष्य व प्राणिसृष्टीसाठी हितकारक आहे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi
भरपूर पीक येऊ दे. परंतु आत्ता मात्र वेळेवर, पुरेसा पाऊस पडेलच अशी खात्री देता येत नाही. एवढेच नाही तर कोणती नैसर्गिक आपत्ती केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. पावसाचे प्रमाणही फार कमी झाले आहे. याचे कारण काय तर म्हणे'पर्यावरणाचा समतोल ढासळला' असं सर्वजण सांगतात.
आज़ मानव आपल्या सोयीसाठी सर्व वने नष्ट करत चालला आहे. त्यामुळे प्रसिद्ध संशोधक प्रफुल्ल बिडवाई यांच्या मते भारतातील सर्व जमिनी जैविकदृष्टया मृत झाल्या आहेत, त्यामुळेच जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट झाली आहे.' तसेच ओझोनच्या वाढत्या छिद्रामुळे माणसांना अनेक शारीरिक विकारांना तोंड द्यावे लागणार आहे.
आज वाढलेल्या लोकसंख्येमुळे, वाहतुकीच्या साधनांमुळे, विविध कारखान्यांमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. पर्यावरणाच्या या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य खालावणार आहे. स्वच्छ व उत्साहवर्धक पर्यावरणामुळे मिळणारे समाधान, आनंद कायमचे नष्ट होणार आहे. पर्यायाने मानवाला खऱ्या अर्थाने जगण्यासारखे असे हे विश्वच उरणार नाही.
याउला झाडे लावा, झाडे जगवा' असा आदेश शासनाने दिला आहे. कारण झाडे हे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतात. वृक्ष हवेतील विषारी कण पकडून ठेवतात. दूषित हवेत जादा प्राणवायू सोडून झाडे हवा शुद्ध करतात. झाडे आपल्या आजूबाजूला हवेत तात्पुरती स्तब्धता निर्माण करतात, त्यामुळे दूषित कण जमिनीवर उतरतात.
दुर्गंधीयुक्त हवा शुद्ध करण्याचे कार्य वृक्ष करतात. प्रदूषित हवेत शुद्ध हवा मिसळून झाडे हवेचा दूषितपणा कमी करण्यास मदत करतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याचा किंवा पर्यावरण संरक्षणाचा सोपा उपाय म्हणजे जंगलतोड थांबवणं व वनीकरण करणं.
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्या मते भारतात ५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत फक्त अर्धेच वनक्षेत्र उरले आहे.' वृक्षसंपत्तीच्या वाढीकरिता वनशेतीचा विचार करणे आवश्यक आहे. वनशेतीत मोठी झाडे लावली जातात, कारण मोठ्या झाडाखाली झुडुपे वाढतात.
सर्वांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. पण अलीकडे वनशेती म्हणजे निव्वळ निलगिरी, साग, सुबाभुळ लावायची पद्धत रुढ झाली आहे. ही नैसर्गिक वनशेती नव्हे. वनशेतीमध्ये पिके व मोठी झाडे यांचे सहजीवन असते. वनशेतीची कल्पना प्राचीन कृषिशास्त्रामध्ये आढळून आली आहे.
शेतात पिकाबरोबर किमान शेताच्या बांधावर तरी झाडे वाढविण्यास सांगितले आहे. कारण झाडांपासून फायदे मिळतातच, पण पिकांचे किडींपासून संरक्षण होते. जमिनीची होणारी धूप, शेतीचे होणारे नुकसान व जमिनीच्या कसावर होणारा परिणाम वनीकरणाने आपण टाळू शकतो.
शेतातून वाहणाऱ्या नद्या, ओढे, नाले यांच्या दुतर्फा झाडे लावली पाहिजेत. कारण मोठा पाऊस पडल्यावर शेतातली चांगली मातीही वाहून नेली जाते. ही ओढ्याकाठची झाडे आपल्या मुळांनी माती पकडून ठेवतील. जमिनीची धूप कमी होईल,
तुकारामांचे वचन'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। शास्त्रीय दृष्टिकोनातूनही किती सार्थ आहे नाही? पर्यावरण संरक्षण आपल्या श्वासाइतकं महत्त्वाचं आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवाचे जीवित आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका
निबंध 3
पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi
आजकाल पर्यावरण हा शब्द बराच प्रचलित झाला आहे.नद्या या साऱ्यांचे अस्तित्व. पृथ्वीचे पर्यावरण सजीवांना रहाण्यास उपयक्त आहे. केवळ पृथ्वीचेच पर्यावरण, वातावरण सजीवांना मानवते. त्यामळे इतर ग्रहांवर प्राणिमात्र नाहीत अन् पृथ्वीवर आहेत. परंतु गेल्या काही दशकांत या पर्यावरणाची उपेक्षा झाली, त्याचा तोल ढळू लागला.