सुजलाम सुफलाम मराठी निबंध | Sujalam Sufalam Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुजलाम सुफलाम मराठी निबंध बघणार आहोत. “राकट, देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा।" ही गोविंदाग्रजांची कविता 'महाराष्ट्र गीत' म्हणून प्रसिद्ध आहे. या कवितेमध्ये महाराष्ट्राच्या विविधतेविषयी काव्यमय वर्णन कवीने केल्याचे आपणास दिसून येते.
ज्याप्रमाणे आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे, त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्रही वैविध्यपूर्ण आहे. भौगोलिकदृष्ट्या वर्णन करायचे झाल्यास महाराष्ट्राचे एकूण पाच भाग पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ हे भाग पाडण्यात आले आहेत.
यावरून आपल्याला जलव्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रांतासाठी एकच योजना राबवणे शक्य होणार नाही. कारण वेगवेगळ्या प्राताना विशिष्ट प्रमाणात भौगोलिक परिस्थितीनुसार गरज आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करताना ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण जाते आणि पाणीव्यवस्थापन ही अत्यंत गरजेची बाब आहे.
राकट, कणखर, दगडांच्या देशाला नाजूक, कामल, देश अर्थात राज्य बनवायचे असेल तर, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन दिवसानुदिवस काळाचा बनत चालल्याचे आपणास आढळते.जलव्यवस्थापनामध्ये आपणास केवळ सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचे जाणवले किंबहुना अनेकांची गफलतहा होते. परंतु पाणी व्यवस्थापन हा केवळ सरकार पुरता मर्यादित प्रश्न नसून
त्यामध्ये समस्त नागरिकांचे जलसंवर्धन करण हे कर्तव्य आहे. कित्येकदा आपणास पाठ्यपुस्तकातून 'पाणी हेच जीवन' असेही शिकवले जाते पण प्रत्येक वर्गात मात्र या विधानाची पूर्तता होत नाही. हे खेदाने नमूद करावे ते वाटते.
जर महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् खऱ्या अथनि बनवायचे असेल तर नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे 'लोकजागृती' जोपर्यंत पाणीव्यवस्थापन योग्य प्रमाणात होणार नाही. त्यासाठी राबणारे अभियान गेल्या दोन-चार वर्षांमध्ये राबताना आपणास आढळते.
त्याला 'संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान' असे नाव देण्यात आले आहे. २००३ मध्ये या अभियानाची सुरुवात होऊन सर्वप्रथम ३ जिल्हे आणि काही तालुक्यामध्ये यांची सुरुवात झाली. सध्या २००४ नुसार हा कार्यक्रम २६ जिल्ह्याअंतर्गत चालवला जात असल्याचे आपणास मागोव्यानुसार स्पष्ट करता येईल.
यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जागृती होत असल्याची आपणास नमूद करता येईल. परतु दुसऱ्या बाजून विचार केला असता राज्यकर्ते मागे पडत असल्याचे दिसते. किंबहुना या कार्याला राजकीय मुद्दा बनवून त्याकड वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
मागील काही एक-दोन वर्षात मागोवा घ्यावयाचा झाल्यास पाणीव्यवस्थापनासाठी 'जलसिंचन आयोग' हा त्याची पूर्ती करण्यासाठी प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता.
परंतु हवे त्या प्रमाणात या योजनेचा फायदा समाजाच्या अंतिम स्तर प्रमाणात या योजनेचा फायदा समाजाच्या अंतिम स्तरापर्यंत पोहोचू शकला नाही. याचा प्रयोग अकोला जिल्ह्यात झाला होता काही प्रमाणात सांगता येईल मात्र पक्षीय राजकारणामुळे हा आयोग रंगाळला गेला. बाकी ठिकाणी याचे प्रयोग झालेच नाहीत,
महाराष्ट्राच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर आपणास लिहावयाचे झाल्यास खोरेनुरूप प्रकल्प हा पाणी व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा गाभा मानला जातो. महाराष्ट्र एकूण सात नद्या ज्यांना की, आपण प्रमुख नद्या म्हणतो अशा आहेत. त्यामध्ये, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा, कोयना इ. आहेत.
त्यांपैकी कृष्णा नदी ही प्रकल्पाच्या ओघात गाजलेली नदी प्रकल्प आहे. याला मोठ्या प्रमाणात आजपर्यंत चर्चा झाली. मागील वर्षी कृष्णा नदीचे पाणी आडवण्याची मोठी नामी संधी महाराष्ट्राकडे होती. परंतु राजकीय मुद्दा बनवून आश्वासनांशिवाय राजकीय पुढारी काहीही देऊ शकले नाहीत. यावरून राजकीय दुर्बलता आपल्या लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये कृष्णेचे ७७९ सहस्त्र दशलक्ष घनफूट पाणी तर वैनगंगा ७१९ स. द. घ. पाणी बाह्य राज्यांकडे जात असल्याचे आपणास सांगता येईल. यावरून महाराष्ट्रात पाणी व्यवस्थापनाबाबतची लाचारी असल्याचे स्पष्ट करता येईल.
पाटबंधारे प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असल्याचे आपणास सांगता येईल. महाराष्ट्रात ६, ६६९ पाटबंधारे आहेत त्यांपैकी ५२ मोठे, २०६ मध्यम २४०२ लघु पाटबंधारे आहेत. परंतु यांपैकी किमान पाटबंधारे बंद असल्याचे समजते. पाणीव्यवस्थापन हे योग्य प्रमाणात होत नसल्याचे हे मोठे उदाहरण आपल्या पुढे दिसते.
मागील ४४ वर्षांचा मागोवा घ्यावयाचा ठरवल्यास महाराष्ट्राचा पाणीव्यवस्थापनावर ६६६९ कोटी रुपये खर्च झालेला आढळतो. परंतु तरीही पाणी प्रश्न सुटल्याचे कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रातील एकूण पाण्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात ४१०० स. द. घ. पाणी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपासून व्यवस्थापनाने मिळू शकते.
महाराष्ट्राचा पावसाच्या पाण्यानुरुप विचार केल्यास ११,३०० स. द. घ. पाणी मिळू शकते. परंतु आमच्याकडे ही साठवण्याची यंत्रणा नाही. जर हे सर्व पाणी आपल्याकडे जमा केले गेले तर महाराष्ट्र तीन फूट पाण्यात उभा राहील.
सद्यपरिस्थितीचा विचार केल्यास यंदाचा पाऊस हात देणारा ठरला. परंतु ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच ९ हजार गावात पाणीटंचाई असल्याचे सरकारला घोषित करावे लागले. हा पाणी प्रश्न केव्हा सुटेल ? केव्हा या राज्यातील जनता सुखी होईल ? हे सांगणे कठीण आहे. आपण केवळ सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवून त्यांच्या सफलतेसाठी आपले प्रयत्न करूया.
या देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये. यासाठी प्रार्थना करूया आणि हा देश, हे राज्य बहारदार, नाजूक, कोमल, फुलांचे होवो यासाठी प्रयत्न करूया. प्रमुख नद्यांपासून व्यवस्थापनाने मिळू शकते.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद