दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दहशतवाद मराठी निबंध बघणार आहोत . दिवस होता ११ सप्टेंबर २००१ आणि मी जे पाहतो आहे ते खरेच आहे की, मला भास होतो आहे, असे क्षणभर वाटले. स्वतःलाच चिमटा काढून पाहिला, नाही मी ठिकाणावर होतो.
पण अमेरिकेची व जगाची झोप उडाली होती. कारण घटनाच तेवढी भयानक होती. अमेरिकेच्या Twin Towers वर ओसामा बिन लादेनच्या दोन अतिरेक्यांनी विमानाने हल्ला करून जमीनदोस्त केले होते. कित्येक लोक ठार झाले.
ज्यांचा काही दोष नव्हता त्यांचे प्राण गेले आणि 'ट्रिन टॉवर्स' जेवढे हादरलेत त्यापेक्षा कैकपटीने सारे जग हादरले. ताबडतोब बुश साहेबांनी जगाला फर्मान सोडले "जर तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आमच्याविरुद्ध आहात असे आम्ही समजू."
आज अमेरिकाच नव्हे तर सारे जग दहशतवादाच्या सावटाखाली आहे. भारतासारख्या देशाला गेल्या ५० वर्षांपासून दहशतवादाचे या ना त्या प्रकारे हादरे बसत आहेत. 'पाकिस्तान स्पॉन्सर्ड' दहशतवादाची भयंकर डोकेदुखी निर्माण झाली आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये तर सकाळी ऑफिसला जाणारा माणूस रात्री सुस्वरूप घरी परतेल याची शाश्वती राहिली नाही.
९/११ च्या हल्ल्याने फक्त अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाला दहशतवादाविषयी नव्याने विचार करून रणनीती आखायला प्रवृत्त केले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर एका पीडिताची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. तो म्हणतो, "हम रोज थोडे थोडे मरकर जिते है." नंतर २००२ साली गोध्रा हत्याकांड झाले. सारा देश हादरला.
हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या. फाळणीसारखी स्थिती निर्माण झाली. अल्पसंख्याक घरात जीव लपवून बसले. खरोखर दहशतवादाचे सावट आज प्रत्येकाच्या मानगुटीवर बसले आहे, ते केव्हा उतरेल याची कुणालाही कल्पना नाही. गोध्रा हत्याकांडात सुखरूप बचावलेल्या व्यक्तीबाबतची बोलकी प्रतिक्रिया होती -
जीवन जगायलाच जर माणूस घाबरत असेल, तर तो खरोखर सुरक्षित आहे का याचा विचार झाला पाहिजे. यानंतर ११ जुलैचे बॉम्बस्फोट झाले, मालेगाव शहरात बॉम्बस्फोट होऊन शेकडो मृत्युमुखी पडले ही मालिका नंतर चालूच आहे. आज दहशतवादापासून कोणाचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही.
दहशतवादी सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला धजावले याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण सगळ्या राष्ट्राच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. हा फक्त राजकारण्यांचाच प्रश्न नसून संपूर्ण जनतेने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे.
दहशतवादाच्या भीतीच्या सावटाखालीच जणू काही महानगरातील मनुष्य आज जगतो आहे. सैनिकांना तर 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशीच पाळी आली आहे. अतिरेक्यांकडे 'Suicide Bombs' असल्यामुळे होणारी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात असते.
मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर वृत्तपत्रात बातम्या आल्या की 'दुसऱ्या दिवशी मुंबईकर पुन्हा कामाला जायला लागला, मुंबईकरांचे आशावादी जीवन पुन्हा सुरू' वगैरे, परंतु खरोखर तो जीवन जगण्याचा आशावाद होता की, जीवन जगण्याची अपरिहार्यता होती ?
आपण दहशतवादापायी दोन पंतप्रधान गमावले. कित्येक जीव आत्तापर्यंत गेले. याची सांख्यिकी नाही. सरकारने, राजकारण्यांनी, धोरण बनविण्याऱ्यांनी दहशतवादाचा सर्वसमावेशक विचार करायला हरा. उदा. अमेरिकेनेच लादेनला पोसले त्याला मोठे केले व एकदिवस हाच लादेन अमेरिकेवर उलटला. म्हणून बड्या राष्ट्रांनी आपले धोरण स्वार्थापायी ठरविताना
याचा विचार करायला हवा, तसेच 'पाकपुरस्कृत दहशतवाद संपविण्यासाठी युद्धाची गरज आहे' असा एक वर्ग म्हणता पण युद्ध कुणाला परवडेल ? १९६५, १९७१ च्या युद्धांनी काय साधले ? शेवटी मनामनांतील दरी रुंदावली. चर्चेनेच प्रश्न सुटतात, चर्चा घडून यायलाच पाहिजे पण गरज पडली तर सौम्य बळाचा वापरदेखील ताकद दाखवायला केला पाहिजे. पण युद्ध करून 'पाक पुरस्कृत दहशतवाद' मोडून निघेल हा भोळा आशावाद ठरेल. साहिर लुधियानवी म्हणतात -
'टॅक आगे बढे या पिछे हटे
कोख धरती की तो बांझ ही होती है.' इस्राईल-पॅलेस्टिनी प्रश्नाबाबत आपण काय पाहत आहोत? शेवटी भारत काय, अमेरिका काय या पुरताच दहशतवाद मर्यादित राहिला नसून मालेगाव, मनमाडसारख्या ग्रामीण भागातही पाळेमुळे पसरली आहेत. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi
"बॉम्बस्फोट धमक्या निरपराध नागरिकांची अमानवी हत्याकशाचे कुणाला भय राहिले नाही.