वनश्री तेथे धनश्री मराठी निबंध | Vanashree Tethe Dhanashri Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वनश्री तेथे धनश्री निबंध बघणार आहोत. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' झाडे-झुडपे वनांशी नात्यागोत्यांचा संबंध दर्शविणारे व आपणा सर्वांचे जणू काही ते सोयरेच आहेत अशा शब्दांत संत तुकारामांनी वनांचे महत्त्व पटवून दिले.
प्रत्येकाच्या जीवनात धन, संपत्ती यांना प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना तितकेच महत्त्व या वनांना देखील आहे. मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही मूलभूत गरजा वनांद्वारा पूर्ण केल्या जातात.जागतिकीकरणाच्या व आधुनिकीकरणाच्या या जगात गावाला पैशांपेक्षाही वनांचे महत्त्व अधिक आहे. झाडे-झुडपे नसती तर मानवाचे जीवन जणुकाही एक अंधारी रात्रच झाली असती.
जीवनाकडे सकारात्मतेने पाहण्याची एक आशा ही वने निर्माण करतात. तणावमुक्त बनण्यासाठी मानव सतत वनांतील एकटे-पणाच निवडतो. भारताच्या इतिहासात वनांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ज्ञानाचे मनन, पठण हे त्या झाडाझुडुपांच्या सान्निध्यात होत असे.
विविध संतांनी या वनांवर अतिशय कल्पक अशा ओव्या लिहिल्या आहेत. निसर्गातील वने म्हणजे कवींच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा एक अथांग सागरच आहे.आज मानवाला वनांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. 'पृथ्वीमाते मंगल दे, सुंदर कोमल वसुंधरे' अशा आपल्या पृथ्वीला या वनांशी जणू काही हिरवी झालरच मिळाली आहे.
विकसित देशांसमोरील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वनांची वृद्धी जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे वनांचा प्रचंड स्वरूपात -हास झाला आहे. म्हणतात ना 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशा मानवाच्या विकृत स्वभावामुळे त्याने स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे.
पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला वनांचा होणारा हास हे एक महत्त्वाचे कारण आहे आणि म्हणूनच वनांना धन म्हणण्याची वेळ आम्हां सर्वांवर आली आहे.वने हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. ही एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. मानवासाठी लागणारा अपुरवठा हा वनस्पतीच्या माध्यमातूनच पुरविला जातो.
फळ उत्पादन याचप्रमाणे आयुर्वेदातील विविध औषधे ही वनांपासूनच प्राप्त होतात. रक्त चंदन, अडुळसा, निलगिरी, तुळस यांच्यासारख्या औषधी वनस्पती निसर्गात प्राप्त होतात. जे रोग नाहीत ते या वनांपासूनच बरे होतात. यावरून वनांचे वृक्षांचे महत्त्व कदाचित या धनांपेक्षाही जास्त आहे.
पर्यावरणातील हवामान या महत्त्वाच्या घटकावर वनांचा मोठा प्रभाव दिसून येतो. वनांची संख्या ज्या प्रदेशात जास्त आहे तेथे मोठ्या प्रमाणात पाण्याची मुबलकता दिसून येते. वृक्षांचे प्रमाण जास्त असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते.
यामुळे बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. निसर्गावर साधनांचा वापर करून मात करणारा मानव कदाचित वनांसाठी पर्याय शोधू शकणार नाही. या ठिकाणी मानवाला नमावेच लागेल.प्राण्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार म्हणजे वने, वनांची संख्या ज्या प्रदेशात जास्त आहे
त्या ठिकाणी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. आधुनिकीकरणाच्या जगात बराचसा कच्चा माल हा आपणास वनापासूनच प्राप्त होतो.आदिवासींची संस्कृती टिकविण्यात वनांचा मोठा वाटा दिसून येतो. भारताने अदमान-निकोबार बेटसमुहातील काही बेटांवर अजूनही आदिवासी संस्कृती असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
मानवाचे जीवन हे हवेतील ऑक्सिजन वायूवर अवलंबून आहे.वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत आची निर्मिती करत असताना ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करतात. वनांकडे एक साधनसंपत्ती म्हणून पाहणे तितकेच फायदेशीर ठरेल.
वनांपासून जळणासाठी लाकूड इमारतींसाठी लाकूड यांचा पुरवठा होतो. यावरून आम्ही सर्वांना एक महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे. धनाचा लोभ करणाऱ्या मानवाला ही वनेच तारू शकतील.
वनांचा नाश होण्यासाठी मानव स्वत:च कारणीभूत आहे. विषुववृत्तीय प्रदेशात मानवाचे स्थलांतरीत प्रकारच्या शेतीचा शोध लावला यामुळे प्रचंड स्वरूपात वनांचा नाश होत आहे. भारतात वनसंपत्तीची स्थिती गंभीर स्वरूपाची आहे.
वनांच्या संरक्षणासाठी प्राण्यांना पर्यायी चाऱ्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यामुळे वन तोडणे बंद होईल. जनावर इतस्त्र चरायला सोडू नये. विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. लहान मुलांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे
भारतात एकूण जमिनीचे वनक्षेत्र २०.५% एवढे आहे. पर्यावरणे संतुलनासाठी हे ३३.३३% असणे आवश्यक आहे. वनांचा नाश टाळण्यासाठी कृती ही व्यक्ती तसेच समुहाद्वारे होणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येक नागरिकास वनांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.
झाडांची तोड झाली तरी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणे गरजेचे आहे. शहरातील प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्याने व रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड केली पाहिजे.स्पर्धेच्या जगात वावरणाऱ्या मानवाने वर्तमान स्थितीत वावरत असताना भविष्याचा वेध होणे महत्त्वाचे आहे.
परिस्थितीतच मानवाने वनांचे महत्त्व ओळखले पाहिजे. भारतासारख्या खंडप्राय देशाने विकसिततेचा मागोवा घेत असताना वनांचा आपल्या आर्थिक विकासात समावेश करून घ्यायला हवा. वने टिकविण्यासाठी भारत सरकारने एक मोठी मोहीमच हाती घेतली आहे. वनांच्या संदर्भात भारत शासनाने विविध कायदे केले आहेत.
वनांची तोड करणाऱ्या व्यक्तीस दंडात्मक कारवाई केली जाते. वैयक्तिक हव्यासापोटी मानवाने मोठ्या प्रमाणात वनांची तोड केली, परंतु जेव्हा मानवाला वनांचे महत्त्व पटेल तेव्हा सैरावरा धावण्यास त्याला रानही कमी पडेल. म्हणूनच -'झाडे लावा झाडे जगवा आणि देश वाचवा.'मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद