वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche Mahatva essay in Marathi.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वेळेचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.
इथे वेड असण्याचे,
खूप फायदे असतात।
अन् शहाण्यासारखे जगण्याचे,
काटेकोर फायदे।।
किती गूढार्थ भरला आहे या दोन पंक्तीमध्ये. जरा वेडे व्हा - अगदी नुसतेच आणि साधेपणाने... सरळ मार्गाने शहाण्यासारखे वागण्यात काय स्वारस्य आहे ?
आपल्या या टीचभर देहाला आणि अल्पशा लाभलेल्या आयुष्याला, त्यातील अब्रूला किती सांभाळायचे ? किती जपायचे ? नेहमी मोजके बोलायचे, तोलून मापून हसायचे, नेमके तेवढेच दात दाखवायचे, प्रेमही अगदी सगळ्या मर्यादा सांभाळून अलगदपणे करायचे. जरा सोडा त्या मनाला मुक्तपणे, वेळेची पर्वा न करता हवे तिथे भटकू द्या.
ठेचकाळू द्या, अंगावर पाऊस-पाणी घेऊ द्या. उन्हाचे चटके सोसू द्यात. जंगल, वाळवंट, खडतर रस्ते पायाखालून तुडवू द्यात. त्यात जखमा झाल्या, धक्के बसले, मानसिक धडपड झाली तरी होऊ... स्वतःचे सुख किंवा दुःख त्याला अनुभवू द्या. प्रसंगी ढसाढसा रडू द्या... अथवा मोकाटपणे हसू द्या... याच मुक्तपणाच्या धुंदीतून वेडेपणाचा धडा... शिकवण.
आपोआपच अंगी मुरू द्या.वेडेपणाची व्याख्याच समाजात बदलत चालली आहे. परंतु या वेडेपणापायी जगातील मोठेमोठे इतिहास घडले आहेत... राज्ये जिंकली गेली आहेत... राज्ये धुळीस मिळाली आहेत. वास्तवतः पृथ्वीतलावरील आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी या वेडेपणाचीच साक्ष आहेत.
अगदी अलीकडील ब्रिटिश साम्राज्याच्या काळातील गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष इंग्रजच म्हणत होते, "....'' भारतीयांच्या देशभक्तीच्या वेडेपणाला सीमा नाही. कारण त्यावेळी भारतीयांचा स्वत्वासाठी लढा अन् पारतंत्र्यासाठी लढा अशा एकामागून एक लढ्यांची मालिका सुरू होती.
भारतीयांचा आत्मा खडबडून जागा झाला होता. रोमारोमांतून चीड, संताप, मनस्ताप हा एखाद्या नागिणीप्रमाणे फुत्कारीत होता. १५० वर्षांची गुलामगिरी ? स्वतः मालक असून चाकराप्रमाणे वागायचे ? प्रत्येक भारतीयाच्या मनांत एकच ध्यास, एकच वेड आपला भारत स्वतंत्र करणे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे.या स्वप्नापोटीच हजारो-लाखो भारतीयांनी आपले घरेदारे सोडली, नाती-गोती विसरली, तहानभूक हरपली आणि आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. आणि अशा या 'वेडा'मुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.
चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी काय केले ? माता जिजाऊ आणि त्यांच्या मनातील हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या वेडापायी - हट्टापायीच तर शिवरायांना राज्याभिषेक झाला आणि शिवरायांवरील अतूट प्रेमापोटी हजारो मावळे आपले घरदार सोडून त्यांचे पाईक बनले.
'वेडात मराठे वीर दौडले सात।' ही कविता ऐकताना जिवावर उदार होऊन लढणाऱ्या त्या मावळ्यांना आपण 'वेडे' म्हणू नये तर काय म्हणायचे ? मित्रहो, 'वेडे होणे' म्हणजे आपल्या एखाद्या चांगल्या छंदासाठी, ध्येयासाठी, कार्यासाठी, उद्देशाची पूर्तता करण्यासाठी ध्यास घेणे.
त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे, प्रयत्न करताना कितीही आणि कोणत्याही अडचणी-समस्या आल्या तरी त्यावर मात करणे. ज्याचा परिणाम हा सर्वांच्या हितासाठी होणार आहे, ज्यातून उत्तम तेच घडणार आहे, अशासाठी अहोरात्र झटणाऱ्या त्या महान संशोधक, शास्त्रज्ञ, थोर कलावंत, उत्तम चित्रकार, मेहनती खेळाडू या सर्वांना निश्चितच त्यांच्या कार्याची धुंदी चढलेली असते,
त्यासाठी ते वेडे झालेले असतात. महान साधुसंत, थोर समाजसुधारक, ज्यामध्ये अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही सर्व मान्यवरांची उदाहरणे नावे झळकतात, गौतम बुद्ध, हजरत पैगंबरापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवापर्यंत... संत गाडगेबाबा.
अण्णा हजारे, बाबा आमटे किती नावे घ्यावीत, या सर्व असामान्य व्यक्ती आपल्या ध्येयासाठी जीवनात निश्चित केलेल्या कार्याच्या पूर्ततेसाठी झपाटलेली दिसतात. हे 'झपाटलेपण' म्हणजेच 'वेड'.
पण आता असे वाटू लागले आहे की, गेला तो काळ, गेल्या त्या व्यक्ती-विभूती... ज्यांनी स्वतःच्या वेडापायी प्रत्यक्षात इतिहास घडवला. मानवजातीचे कल्याण साधले, आता आपण मात्र त्या भूतकाळाचा आधार घेत घेतच वर्तमान घडवायचा की ? तो ध्यास, ते झपाटलेपण, तो वेडेपणा, ती माणुसकी, ती कल्याणकारी वृत्ती... ही या कलियुगात लोप पावली आहे का ?
'उषःकाल होता होता...
काळ रात्र झाली आहे का ?'
आजचा तरुण हा भौतिक सुखांच्या. स्वार्थाच्या..ऐदीपणाच्या इतका आहारी चालला आहे की तो स्वतःतच गुरफटला आहे. स्वतःच्या कमकुवत मानसिकतेच्या वेडाने झपाटला जात आहे. त्यामुळे होणार आहे ते त्याचे नुकसान. त्याच्या घरादाराचे साऱ्या समाजाचे,
आपल्या देशाचे आणि अखिल विश्वाचे, वाढता जाहिरातींचा मारा, करोडपती झटकन, विनासायास होण्याची स्वप्ने, सर्व काही श्रमाशिवाय, कष्टाशिवाय, तयार (Instant) घेण्याची मनोवृत्ती, यशासाठी शॉर्टकट, त्यासाठी हवी तेवढी किंमत मोजायला तयार झालेली ही नवीन युवापिढी. त्यामुळेच देशाच्या भवितव्याची चिंता लागून राहिली आहे.
पहा ना... महासत्ताधिकारी अमेरिका त्याला सध्या वेड लागले आहे, ते लादेनचे, पाकिस्तानला काश्मीरच्या हक्काच भारतीय राजकारण्यांना वेड लागले आहे, ते सत्तेचे... पैशांचे, आजच्या तरुणाईला वेड आहे. आधुनिकतेचे, पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे... तेव्हा... प्रत्येकाने लक्षात ठेवायची वेळ आली आहे की,
मर्यादांना मर्यादुनी, ना त्यांना उल्लंघुनी।
पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी।।
भारतीय संस्कृती सांगते आत्मा अमर आहे, पण आमचा आत्माच आता निर्जीव होत चालला आहे. दिशाहीन आदर्शहीन, संस्कृतीहीन, ज्ञानहीन, श्रम-कष्टहीन असा आजचा तरुण होत चालला आहे. 'आत्मा आणि बुद्धी' यांची सांगड घातल्याशिवाय समाजाचे हित..
मानवतेचे कल्याण कसे बरे होणार ? त्यांना कसे वेड लागणार देशभक्तीचे ? कसे ते ध्यास घेणार जनकल्याणाचे ?मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद