विज्ञान तंत्रज्ञान आणि भारताची प्रगती मराठी निबंध | Vidnyan Tantradnyan Ani Bhartachi Pragati In Marathi Essay


विज्ञान तंत्रज्ञान आणि भारताची प्रगती मराठी निबंध | VidnyanTantradnyan Ani Bhartachi Pragati In Marathi Essay

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि भारताची प्रगती मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज जर कोणी विचारले की, ही पृथ्वी कशावर उभी आहे ? तर मी म्हणेन विज्ञानावर ! पूर्वी समज होता की ही पृथ्वी शेषनागावर उभी आहे, तर ते एकदम साफ चुकीचे आहे.


काही दिवसापूर्वी माझ्या गावाकडे गेलो होतो तेव्हा मला विज्ञानाविषयी जागृती करणारी एक घटना माझ्या जीवनात घडली. तेथे एक व्यक्ती अक्षरश: दु:खाने त्रस्त होती. त्या व्यक्तीला त्याच्या शेतात गवताची पेंडी काढताना त्याच्या हातास एक विषारी किड्यांनी चावा घेतला. 


त्याचा उतारा म्हणून गावातील काही अतिशहाण्या व्यक्ती त्यास मारुतीच्या पारावर बसवून त्याच्यावर उपचार केला पण म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी' त्याच वेळी तेथे आमच्या येथील एक डॉक्टर व्यक्तीने त्यास इंजेक्शन देऊन त्याचा तो होणारा त्रास कमी केला.


वास्तविक ही घटना आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत असे म्हणण्यास व्यक्तीस लज्जास्पद वाटते. ही डॉक्टरची किंवा इंजेक्शन घटना जरी वैदकशास्त्रातील असली तरी तिचे जन्मस्थान किंवा उगम हा विज्ञान आहे. भारताने जी काही प्रगती केली ती फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर विज्ञान हे भारतास लाभलेले एक वरदानच होय आणि हे वरदान 


आपल्यास आपल्या भारताचे माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी यांच्या स्वरूपात. यांनीच भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान पाया घातला पण त्यास परिपूर्ण बांधण्याचे काम आपले भारतीय शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यात डॉ. विजय भाटकर, ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा समावेश होतो. 


त्यांनी आत्तापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारताला .२०२० पर्यंत जागतिक सत्ता बनवण्याचे पाऊल टाकले. याचा फायदा संपूर्ण भारतवासींना होणारच, हे वाक्य आता भविष्यकाळात सत्य होणारच. पूर्वी आपणास टेलिव्हिजन माहीत नव्हता 


तो पण आता सामान्य माणसाच्या घरात दिमाखाने बसून आहे १९८३ मध्ये भारताने दहा हजार कलर टी.व्ही. आयात केले. आता तोच भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर अशा लाखो कलर टेलिव्हीजन हे परदेशात निर्यात करत आहे. भारतीय व्यक्ती २००८ मध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहे. 


ते कशाच्या बळावर? भारताने माहिती आणि तंत्रज्ञान विषयात एक क्रांती घडवून प्रथम क्रमांकांच्या वाटचालीवर किंवा प्रगतिपथावर आहे ते कशाच्या बळावर? हा प्रश्न मी तुम्हांस विचारत आहे. आज आपण जे एका क्षणात सातासमुद्रापलीकडच्या केवळ व्यक्तीशी बोलूच नव्हे 


तर तो आपल्यासमोर एका यंत्रामध्ये त्याची प्रतिकृतीचे आपणास दर्शन ही होते ते कशाच्या बळावर? अशा आणि अशा खूप न उलगडणारे प्रश्न आपणास पडले त्याचे उत्तर फक्त एक आणि एकच असणार आणि ते म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान या पलीकडे कोणतीही दैवी शक्ती इथे कामी येणार नाही.


सर्वमान्य असलेली परिस्थिती म्हणजे की एका नाण्यास दोन बाजू असतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे कारण ज्या नाण्याला दोन बाजू नसल्या तर त्याला कोणी नाणेच म्हणणार नाही. याचप्रमाणे विज्ञानाचे पण असे दोन प्रकार किंवा उपयोग होतात. 


त्यांपैकी प्रथम आपण फायदे पाहिले आणि आता आपणास त्याचे तोटे किंवा मानवास होणारे धोके पाहवायचे आहेत. मी मागच्या आठ दिवसांपूर्वी वर्तमान पत्र वाचले त्यात एक बातमी होती की जम्मू आणि काश्मीरमध्ये आता मोबाईल फोनची व्यवस्था किंवा तंत्रज्ञान यंत्रणा सुरुवात झाली 


ही बाब जरी फायदेशीर असली तरी त्यापासून दहशतवाद्यास किंवा त्यांच्या कार्यात गती येईल, कारण आता तो सहजपणे काश्मीर मध्ये कोठेही त्या मोबाईल यंत्रणेद्वारे त्याचे विचार किंवा कृत्य पसरवेल. तसेच वेगवेगळे सायबर कॅफे यात पण भारताच्या विकासाचे उद्याचे असणारे आधारस्तंभ म्हणजे तरुण मंडळी नको तितका वेळ त्या COMPUTER समोर बसलेली असतात. 


त्यामुळे त्यांच्या शारीरिक यातना पण त्या सारख्या बसल्याने निर्माण होऊ शकतात. COMPUTER चा नको त्या गोष्टीसाठी उपयोग करतात. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवीवृत्ती एकदम आळशी स्वरूपाची होत चालली. यामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा समावेश आहे. 


विज्ञानामुळे व्यक्तीच्या मनावर पण आमूलाग्र असा बदल होत आहे तसेच समाजात दहशत जे निर्माण करतात अशा समुदायाला पण या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फायदा होतो. निरनिराळे हायड्रोजन, आर.डी.एक्स अशा स्वरूपाचे बॉम्ब याचा वापर करून मुंबईसारख्या भारताची आर्थिक राजधानी समजली जाणाऱ्या महानगरात हजारो निरपराध व्यक्तीचे प्राण घेऊन


चाताराबारा या ठिकाणी लपते हे कशाच्या जोरावर ते फक्त विज्ञानाच्या थोडक्यात विज्ञान जेवढे मानवास पोषक आहे तेवढेच विघातक पण आहे. पारचा किवा सवसामान्य व्यक्तीच्या मतानसार विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एक मानवाच्या हातात आलेले इद्राच अस्त्र


हाय याच वज्राच्या साह्याने आपण आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीयत्त्व राष्टीयच नव्हे तर आतरराष्ट्राय स्तरावर आमूलाग्र बदल घडवून आणत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता साखर कारखाने हे त्या कारखान्यात बसून COMPUTER च्या साहाय्याने त्याच्या साखरेची प्रत तिची गुणवत्ता इतस्त्र पसरवीत आहोत आणि यात काट्यवधी रुपयांचा फायदा पण होत आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर आपणास आता भारतीय बनावटीच्या उपग्रहातून प्रक्षपण करता येत आहे. त्यामुळे आपणास परदेशी उपग्रहास देणारी परदेशी चलन मिळत आहे. हे फायदे आपणास फक्त दत आहे ते म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान होय. विज्ञानामुळे भारताच्या आर्थिक विकासात पण वाढ होत आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 


 निबंध  2 

विज्ञान तंत्रज्ञान आणि भारताची प्रगती मराठी निबंध | VidnyanTantradnyan Ani Bhartachi Pragati In Marathi Essay


ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. त्याची शक्ती अमर्याद आहे. सृष्टीच्या निर्मितीबरोबरच तिचे पालन पोषण आणि संहारही तोच करतो. आज विज्ञान ब्रह्मा, विष्णू, महेशालाच आव्हान देत आहे. कृत्रिम गर्भधारणेतून टेस्ट ट्यूब बेबी' उत्पन्न करून त्याने ब्रह्माला ललकारले आहे. 


मोठमोठे उद्योगधंदे उघडून लाखो लोकांना रोजगार पुरवून विष्णूला त्याने आव्हान दिले तर सर्व नाशासाठी अणुबाँबची निर्मिती करून त्याने शिवालाही चकित करून टाकले. विज्ञानाच्या क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करीत आहे. विज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचे विशेष ज्ञान, विज्ञान एक वरदान असून मानवासाठी कामधेनूप्रमाणे आहे.


विज्ञान मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. मानवाच्या कल्पनेला साकार करते. आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने प्रवेश केला आहे उदा. कला, संगीत, राजकारण इत्यादी मानवाने संपूर्ण पृथ्वी आणि अंतरिक्षाला वामनाप्रमाणे तीन पावलांत काबीज केले.


विज्ञानाने मानवाचे राहणीमान, खाणे-पिणे, आचारविचार, ज्ञान इत्यादी विषयांची चिंतन पद्धतीच बदलून टाकली. विज्ञानाच्या शक्तीमुळे तो भूगर्भातून पाणी खेचू शकतो, समुद्रातून तेल काढू शकतो. बाँबे हायवेतून निघणारे तेल हा भारतीय वैज्ञानिक प्रगतीचा जिवंत नमुना आहे. याशिवाय आसाम आणि इतर राज्यांत पेट्रोलियमच्या विहिरी शोधण्यात आल्या आहेत. 


रासायनिक खतांच्या साह्याने शेतजमिनीच्या उत्पादनशक्तीला वाढविले व अनधान्याची टंचाई दूर केली. कापडाच्या कारखान्यात इतके कापड उत्पादन होते की आपली गरज पूर्ण होऊन आपण कापडाची निर्यात करतो. औषध न मिळाल्यामुळे कुणी मरू नये म्हणून औषधाचे कारखाने काढले. 



चिकित्साशास्त्राच्या विज्ञानात इतकी प्रगती झाली आहे की मलेरिया, कॉलरा, प्लेगसारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवता येते. शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात अवयवांचे प्रत्यारोपण करून यश प्राप्त केले आहे. इतर असाध्य रोगांच्या इलाजावर संशोधन चालू आहे.


विज्ञानाने मानवाचा वेळ आणि शक्ती वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. भारतात आता काही अपवाद सोडल्यास सर्व कामे यंत्राच्या साह्याने करता येतात. माणसाला फक्त यंत्रावर नियंत्रण ठेवावे लागते. धान्य दळणे, पीठ तिंबण्यापर्यंत, धान्याची पेरणी करण्यापासून धान्याची पोती भरण्यापर्यंत. वृक्ष तोडण्यापासून फर्निचर तयार करण्यापर्यंत सर्व कामे यंत्रांद्वारे होतात. 


विज्ञानाने मानवाच्या दैनंदिन जीवनातही अनेक क्रांतिकारक सोयी केल्या आहेत. रेडियो, फॅक्स, रंगीत टी. व्ही. टेपरेकॉर्डर, व्ही. सी. आर, टेलिफोन, वॉशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लीनर, कुलर, पंखा, फ्रीज, हिटर, मिक्सर इत्यादी आरामदायक यंत्रांची निर्मिती केली. 


त्याची इतकी सवय माणसाला झाली की ती नसतील तर जीवन नीरस वाटते. भारताने दूरदर्शनमध्ये पण खूप प्रगती केली आहे. घरातील चुलीची जागा आता शहरात गॅसने तर खेड्यांत गोबरगॅसच्या शेगडीने घेतली आहे. वेगाने चालणारी विमाने, बस, ट्रक, कार, स्कूटर, रेल्वे इत्यादी वाहतुकीची साधने विज्ञानाने वाहतुकीच्या क्षेत्रात केलेली प्रगती दर्शवितात.

भारतात संगणकाचा प्रवेश आणि त्याचा प्रसार आपल्या यांत्रिक प्रगतीकडे निर्देश करतो. छापलेल्या पुस्तकांच्या प्रकाशाने ज्ञानाचे दीप घरोघर पेटविले. अशिक्षितांना शिक्षण देण्याची आणि विचार करण्याची शक्ती दिली. वृत्तपत्रांनी भारताला जगाच्या जवळ नेले. सिनेमाच्या क्षेत्रातील आपली प्रगती कौतुकास्पद आहे. 



विज्ञानाने भारतीयांचे राहणीमान आणि चिंतनशक्ती पूर्णपणे बदलून टाकली. विमाने, जहाजे, रॉकेटस, उपग्रह इत्यादी च्या निर्मितीत भारत अग्रस्थानी आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात आपली प्रगती कौतुकास्पद आहे. नद्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी केला गेला. 


सौर ऊर्जा, पवनचक्की, औष्णिक विद्युत, अणुविद्युत इत्यादी बाबी ऊर्जेच्या क्षेत्रांतील आपली प्रगती दाखवितात. अणुविद्युतचा उपयोग भारताने फक्त विधायक कार्यासाठीच केला आहे.



विज्ञानाने अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक चमत्कार केले आहेत. महानगरांत गगनचुंबी इमारती, रस्ते, उड्डाणपूल, भूमिगत मार्ग इत्यादी. आपल्या प्रगतीचे निदर्शक आहेत. खेळांच्या प्रसारासाठी अनेक स्टेडियम, तरण तलाव बनविण्यात आले आहेत. 


भारतीय सेनेला अत्याधुनिक पद्धतीने सुसज्जित करण्यात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. नव्या प्रकारच्या तोफा, बंदुका, मशिनगन, रणगाडे, रॉकेट, बाँब, रडारयंत्रे, विमाने, जहाजे यांची निर्मिती आता भारतातच होते. क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञानही भारताजवळ आहे.


१९ एप्रिल १९७५ ला सोव्हियट अवकाश केंद्रातून "आर्यभट" नामक उपग्रहाचे सफल प्रक्षेपण करून भारताने अंतराळ युगात प्रवेश केला आहे. कृत्रिम उपग्रहांच्या निर्मितीमध्ये आपण विकसित देशांशी टक्कर घेत आहोत. भास्कर, अॅपल, इन्सॅट, रोहिणी सारखे अनेक उपग्रह अंतराळात पाठवून जगातील महाशक्तीसमोर भारत उभा राहिला आहे. 


१९८५ मध्ये "अनुराधा"नामक प्रयोगशाळा अंतराळात पाठवून सूर्य आणि ब्रह्मांडातील अन्य स्त्रोतापासून निघून पृथ्वीच्या वायुमंडळात येणाऱ्या ऊर्जा किरणांचे संघटन व तीव्रतेचे संशोधन केले. कृत्रिम उपग्रहांद्वारे आपली संचार व्यवस्था सुदृढ़ झाली. हा उपग्रह अंतराळातून इतर ग्रहांची माहिती व छायाचित्रे आपणास पाठवितो. 


ती पाहून आपण रोमांचित होतो. ऋतुसंबंधीची माहिती पण आपणास या उपग्रहांद्वारे मिळते. एप्रिल १९८४ मध्ये स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा रशियन अंतराळवीर मेलिशेव ओ गेन्नाडी स्वेकालेन यांच्याबरोबर अंतराळयात्रा करून आला.


मानव पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. ज्याने आपल्या बुद्धीचे नित्य नवे चमत्कार करून आपले जीवन सुखमय बनविले. पृथ्वीवर विजय पताका फडकविल्यानंतर आता तो अंतराळात घर बांधू इच्छितो. यात भारत कुठे असेल ते काळच सांगेल. परंतु हे खरे की विज्ञानाने मानवाला आपले गुलाम केले आहे. 


अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे सर्व वैभव, ऐश्वर्य मनुष्याला देण्यासाठी विज्ञान उभे आहे. म्हणून विज्ञानाचा सदुपयोगच झाला पाहिजे. दुरुपयोग नव्हे. विज्ञान अशी शक्ती आहे की जिचा प्रयोग विचारपूर्वकच केला पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद