विश्वनिर्मितीचे काम माझ्याकडे आले तर मराठी निबंध | VISHVA NIRMITICHE KAM MAZYAKADE AALE TAR ESSAY IN MARATHI

विश्वनिर्मितीचे काम माझ्याकडे आले तर मराठी निबंध | VISHVA NIRMITICHE KAM MAZYAKADE AALE TAR ESSAY IN MARATHI


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विश्वनिर्मितीचे काम माझ्याकडे आले तर मराठी निबंध बघणार आहोत. लहानपणी आपण देवादिकांच्या कथा वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत. त्यात ब्रह्मदेवाने म्हणे, विश्वकाकडे विश्वाची निर्मिती करण्याचे काम दिले होते. आणि त्याने हे काम करताना अनेक चुका करून ठेवल्याचे दिसले. 


त्याचे परिणाम आपण या पृथ्वीतलावरील लोक भोगत आहोत, म्हणूनच एकदा असे वाटले की, हे काम आता मला ब्रह्मदेवाने दिले तर निश्चित मी सर्व कमतरता-उणिवा काढून टाकीन. एक नवीन आव्हान स्वीकारीन.


सर्वांत प्रथम मला या मानवपुत्राला जे आज अवास्तव महत्त्व मिळाले आहे ना, ते कमी करायचे आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला मिळालेली बुद्धिमत्ता. आपल्या या मानवाचे त्यांनी खूप लाड केलेत. त्यामुळे विश्वकर्माच आज डोक्याला हात लावून बसलाय. 


मी कायं बनवले आणि आता त्याचे स्वरूप कुठे कुठे बदलत चालले आहे. या मानवपुत्रांनी बुद्धीच्या जोरावर अशा काही लीला दाखवायला सुरुवात केल्या आहेत की, प्रचंड प्रमाणात सर्व क्षेत्रात स्पर्धा-स्पर्धा आणि स्पर्धाच दिसत आहेत. तेच घातक ठरत आहे. 


मानवाशिवाय असणाऱ्या प्राणिमात्रांचा इतरांना काही त्रास होतो का ? पण या बुद्धीचा गर्व असलेला माणूस मात्र आज विश्वाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. म्हणूनच मी पहिले काम करीन तर या 'बुद्धीला' गवसणी कशी घालता येईल ते पाहीन. त्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधन. ज्यामुळे विधायक कार्ये अधिक होतील... सर्वांना सुख-समाधान-स्वास्थ्य-संपन्नता प्राप्त होईल.


त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट मला या विश्वात दिवसानुदिवस खटकत चालली आहे, ती म्हणजे प्रामुख्याने भेदभावविषमता, श्रीमंत-गरीब, उच्चवर्णीय-निम्नवर्णीय असे अनेक प्रकारचे भेदभाव-विषमता-श्रीमंत-गरीब उच्चवर्णीय-निम्नवणीय असे अनेक प्रकारचे भेद दिसतात. 


काळा-गोरा-हुशार-कमी बुद्धिमान-कुरूप-सुस्वरूप, माझा-तुझा-परका-लोकांचा-दुसऱ्याचा अशा अनेक भेदाभेदनिर्मितीमुळे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक हिंसक होच चालले आहे. त्यासाठी प्रथम मी, आपण सर्व एकच आहोत. सारे प्राणिमात्र, मानवजात ही एकच आहे. 


सर्वांमध्ये संवेदना, कल्पना-विचार, चिंतन करण्याची ताकद आहे. प्रथम म्हणजे त्यांचे प्रमाण कमी-जास्त असले तरी ते आपलेच आहेत, ते माझे आहेत. 'हे विश्वचि माझे घर' ही ज्ञानेश्वरांची महान संकल्पना मुळापासून रुजविण्याचा प्रयत्न करीन.


सर्वांना आनंद हवा असतो, सुख, समाधान, निश्चित जीवनप्रणाली हवी असते. तेव्हा त्यासाठी सहारासारखी त्रासदायक वाळवंटे, आफ्रिकेसारखी घनदाट जंगले, फुजियामासारखी ज्वालाग्राही भूमी, पर्वत, डोंगर किंवा कर्क एड्स, मधुमेह, हृदयरोगासारखे असाध्य आजारांची उत्पत्तीच मी होऊ देणार नाही. जेणेकरून लोक म्हणून लागतील.


सुख पाहता पर्वताएवढे।'

 'आनंदी आनंद गडे, 

जिकडे तिकडे चोहीकंडे।।

' अशी अवस्था निर्माण होईल.


'अवनी गमते अद्भुत अभिनव जिथे सुखावीण दुजा न संभवा ।। असे असले तरी माझे 'नियोजन आणि नियंत्रण' उत्तम आणि कडक ठेवणार. मानवाच्या विकासातील अडचणी समस्या दूर करण्यासाठी दारिद्रय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब नियोजन, पाणीपुरवठा आणि 'अन्न, वस्त्र, निवारा' सारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत...


परंतु मित्रांनो अति सुखही बरे नव्हे बरं का ? कारण त्यांनीही मानव प्राणी सुस्तावेल-बेफिकीर बनेल. तेव्हा त्याचाही विचार मी करणारच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद