काटकसर करूया, देशहित साधूया मराठी निबंध | KATKSAR KARUYA ,DESHAHIT SADHUYA MARATHI NIBANDH

 काटकसर करूया, देशहित साधूया मराठी निबंध | KATKSAR KARUYA ,DESHAHIT SADHUYA MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण काटकसर करूया, देशहित साधूया मराठी निबंध बघणार आहोत. काटकसर याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा जपून, आवश्यक तेवढाच वापर करणे आणि उधळ-माधळ टाळणे. काटकसर ही वैयक्तिक जीवनातही फायद्याची ठरते. तसेच, ती देशहिताच्या दृष्टीनेही फायद्याची ठरते. 


काटकसर केल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा लाभ अधिकाधिक व्यक्तींना अधिक काळ होईल. प्रथम विचार करूया इंधनाच्या काटकसरीचा. इंधन ही जगाला भेडसावणारी समस्या आहे. निसर्गदत्त असलेली ही संपत्ती जर जपून नाही वापरली, तर संपुष्टात येईल. विज्ञानाने पूरक इंधनव्यवस्था निर्माण केल्या आहेत. 


सौरऊर्जा हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सूर्य म्हणजे एक इधनभट्टी आहे. तेथे हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होऊन ऊर्जानिर्मिती सूर्यऊर्जा फुकट व प्रदूषणविरहित आहे. सौरघट अवकाशातील उपग्रहांना ऊर्जा पुरवतात. तसेच, मानवनिर्मित चंद्र आणि मंगळावरच्या उपकरणांनाही ऊर्जा पुरविली जाते. 


सौरऊर्जा वापरल्याने इंधनबचत होऊन वाया जाणाऱ्या सौरऊर्जेकडे लक्ष देऊन इंधनाची काटकसर होईल.खेड्या-पाड्यांत अजूनही इंधनासाठी जंगलतोड केली जात आहे. आज गोबरगॅस, नैसर्गिक वायू व सौरशक्ती उपकरणे वापरली तर, इंधनसमस्या आटोक्यात येईल. 


वाढत्या औद्योगिकीकरणामुळे खनिजांची वाढती गरज भागविण्यासाठी नवीन खाणी शोधाव्या लागत आहेत. कालांतराने पृथ्वीच्या पोटातील खनिजे संपुष्टात आली, तर एवढा औद्योगीकरणाचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. 


आत्तापासून काटकसर केली, तरच भविष्यकाळातील अनर्थ टळू शकेल. पाणी ही माणसाची मूलभूत गरज. पिण्याच्या पाण्याबरोबर औद्योगिक वापर, वनविकास, शेती, बाष्पनिर्मिती, वाहतूक अशा अनेक मार्गांनी पाण्याचा वापर होतो. पाऊस, नद्या-तळी व भूजल या मार्गांनी पाण्याच्या क्षमतेच्या काही टक्केच पाण्याचा वापर होतो. 


बरेच पाणी वाया जातो. नळ गळत असतात; पण वेळेवर दुरुस्त केले जात नाहीत. नळ सुरूच ठेवले जातात आणि पाणी वाया जातच असते. कधी-कधी जलवाहिन्या फुटून कितीतरी पाणी वाया जाते. पावसाचे पाणी साठवून ठेवले, तर काही महिने त्याचा वापर होऊ शकेल. 


म. गांधीजी तर पाणी पिऊन जर पाणी उरले, तर ते झाडांना घालत असत. हीदेखील काटकसरच आहे ना नित्याच्या व्यवहारातदेखील काटकसरीची आवश्यकता आहे. लग्नसमारंभात आग्रह केल्यामुळे अन्न वाया जाते. हॉटेलमध्येसुद्धा लोक अन्न टाकून अपव्यय करतात. 


अन्नाची काटकसर केल्यास काही गरीब लोकांची पोटे भरतील. विजेच्या बाबतीतही हीच गोष्ट. घरातही पंखे, दिवे आवश्यकता नसेल, तरी चालूच असतात. उत्सवात विद्युत-रोषणाई करून विजेचा अपव्ययच होतो. बऱ्याच वेळा पूर्वनियोजन न करता वाटेल तसा पैसा खर्च केला जातो, आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. 


कधी-कधी दुसऱ्याशी बरोबरी करून वस्तू खरेदी केल्या जातात. कपड्यांच्या बाबतीतही असाच अनावश्यक खर्च होत असतो. असे काटकसरीने खर्च न केल्यामुळे शिल्लक रहात नाही. भविष्यकाळात कोणता खर्च निघेल, हे सांगता येत नाही. मग अशा अडचणीच्या वेळी पैसे राहत नाहीत. त्याने कर्जबाजारीपणा येऊ शकतो.


बसस्थानकावर बसेच चालू स्थितीत कितीतरी वेळ उभ्या असतात. कितीतरी डिझेल वाया जाते. वेळेच्या बाबतीतही असेच घडते. आपण वेळेचा अपव्यय करतो. गप्पाटप्पा,निरर्थक भटकणे यातून वेळ वाया घालवतो. वेळेची काटकसर खूप महत्त्वाची असते. कोणताही कण, क्षण, थेंब क्षुद्र नाही. 


क्षण क्षण काल इकठ्ठा होकर लंबा युग बन जाता है। 

छोटी छोटी जल की बूंदें सागर को भर देती है। 

क्षण को शूद्र न समझो भाई, यह तो जग का निर्माता है।


प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्या; पण जपून. काटकसर करा. त्यामुळे घर, समाज व राष्ट्र यांचे हित साधेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद