माझं प्रेरणास्थान मराठी निबंध | My Sorce Of Inspiration Essay In Marathi

 माझं प्रेरणास्थान मराठी निबंध | My Sorce Of Inspiration Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझं प्रेरणास्थान  मराठी निबंध बघणार आहोत. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत ऐकत असलो की मुलाखतकाराचा पहिला प्रश्न ऐकू येतो. 'तुम्ही कोणापासून स्फूर्ती घेतलीत ? तुमची प्रेरणास्थानं कोणती ?' अभ्यासात माझी प्रगती चांगली असल्यामुळे मलाही केव्हा केव्हा प्रश्न विचारला जातो. 


तू कोणापासून स्फूर्ती घेतलीस ? तुझी प्रेरणास्थानं कोणती ? आणि क्षणाचाही विलंब न लावता, मी चटकन उत्तर देतो, त्याच्या स्वतःच्या वेळेवर उगवणारा आणि वेळेवर मावळणारा सूर्य, हे माझं पहिलं प्रेरणास्थान. सूर्य सारं विश्व स्वच्छशा प्रकाशाने उजळून टाकतो. चराचर सृष्टीला जीवदान करतो. 


अंधाराची नामोनिशाणी ठेवीत नाही. सूर्याएवढा प्रकाशमान नसला तरी समुद्राला ओहोटी - भरती देणारा चंद्रही मला तितकाच प्रेरक वाटतो. सूर्य मावळल्याकारणाने भयाण अंधकारात बुडून गेलेल्या जगाला जणू तो आश्वासन देत असतो, 'घाबरू नकोस. 


सूर्य मावळला, पण मी आहे ना ?' आणि हा चंद्र आपल्या शांत, स्निग्ध चांदणी (चांदण्याच्या) प्रकाशाने साऱ्या जगाला न्हाऊ माखू घालतो. सारांश काय, अखिल जगताला प्राणदान करणारा प्रकाश, हेच माझं प्रेरणास्थान. कोठल्याशा गोष्टीत नाही का एका पणतीची गोष्ट सांगतात. 


'सूर्य मावळल्यावर सारं जग अंधारात बुडून गेल्यावर कुणा चिंतातूर जंतूने केविलवाणा प्रश्न विचारला, 'सूर्य मावळला आता आपल्याला प्रकाश कोण देणार ?' कुठूनतरी चिणलेला स्वर आला, 'मी आहे ना' 'माझ्या कुवतीप्रमाणे मी देईन तुला प्रकाश.' मी पाहिलं तर तो स्वर होता एका छोट्याशा पणतीचा. शांत प्रकाशाने तेवत रहाणारी ती पणती माझे प्रेरणास्थान.


आणि चंद्राच्या संकेतावर भरतीने गरजणारा सागर - ? त्याच्यापासून का नाही घ्यायची आपण प्रेरणा ? साऱ्या जलचरांप्रमाणे दावाग्रीलाही आपल्या पोटात मायेने सांभाळणारा सागर. विंदांनी म्हटलंय ना, 'फेसाळणाऱ्या सागरापासून पिंजारलेली आयाळ घ्यावी.'


एकूण काय मित्रहो, आपल्या अवती भोवती साऱ्या आसमंतात भरून राहिलेला निसर्ग हे माझं स्फूर्तिस्थान आहे. त्यातली यच्चयावत वस्तू, मला प्रेरणा देणारी आहे. नद्या - नाले, झाडं - वेली, डोंगर - दया, पाने - फुलं, धरती - आकाश सारं सारं प्रेरणा देणारं वाटतं. 


नदीसारखं वाहत रहावं, नाल्यासारखं खळखळत रहावं, झाड होऊन सावली आणि आधार द्यावा. झाडाला लपेटून राहिलेली इटुकली वेल पाहिली ना की त्याच्या वात्सल्याचं, सहजीवनाचं कौतुक वाटतं. वाटतं माड होऊन आकाशाला कवटाळावं, आकाश होऊन विस्तारावं, धरणीसारखं क्षमाशीलंच्या बळा


मोठ्या लोकांची चरित्रं वाचली की आपल्याला कळून चुकतं की, माणसं कुणा ना कुणाकडून तरी प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि आपलं जीवन त्यांनी सार्थकी लावलं. आपल्यासारखी छोटी माणसं कुणाला प्रेरणा देऊ शकू की नाही सांगता येत नाही. पण आपण प्रेरणा मात्र अवश्यमेय घेऊ शकतो. 


तेव्हा प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जीवनाचं सोनं करावं.अभ्यास : - शब्दांच्या तीन शक्ती आहेत. १) अभिधा २) लक्षणा ३) व्यंजना. शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला बोध होतो. ती गोष्ट आपल्या डोळ्यांपुढे उभी रहाते. उदा. आंबा म्हटलं की विशिष्ट फळ, गाय म्हटलं की विशिष्ट प्राणी. ही झाली अभिधा. लक्षणा म्हणजे एखादा शब्द त्याच्या विशिष्ट अर्थापेक्षा (अभिधेपेक्षा) निराळ्याच अर्थाने वापरलेला असतो. उदा. अंगावर काटा उभा राहिला.


या वाक्यप्रचारात काटा याचा अर्थ काटेरी झाडाचा काटा नाही. गळ्यातला ताईत असणे' - या ठिकाणी ताईत म्हणजे गळ्यात वापरण्यात येणारी विशिष्ट वस्तू नव्हे. व्यंजना - एखादा शब्द त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा दुसराच अर्थ सूचित करतो. अर्थ ध्वनित केलेला असतो. उदा. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत ! 


हात म्हणजे आपल्या शरीराचा अवयव नव्हे. हात याचा सूचितार्थ - ध्वन्यार्थ - उदार माणसाचं औदार्य - त्याची दानत ही त्याची वृत्ती - तेव्हा देणाऱ्याची वृत्ती घ्यावी.'माझी प्रेरणास्थाने' या निबंधातला प्रत्येक शब्द लक्षणेने घ्यावा. लक्षणा - (नाम) लाक्षणिक (विशेषण.) पाथेयातले पौष्टिक :कोणत्याही मोठ्या माणसाचं चरित्र वाचलंत, तर तुम्हाला कळेल की त्या मोठ्या माणसाने कोणा ना कोणाकडून तरी प्रेरणा घेतलेली असते. 


वीर सावरकरांनी इटलीचा क्रांतिवीर जोसेफ मॅझिनी याच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांनी लिहिलंय, केसरीपेक्षाही मला जास्त प्रेरणा कुणी दिली असेल, तर ती शि. म. परांजप्यांच्या 'काळ' या वृत्तपत्राने. मग मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, राजगुरू वगैरे क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा घेतली. 


अशा तहेने दुसऱ्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींना कुणी कधी विसरत नाही. पण अत्यंत लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधल्या क्रिकेटपटूंकडे पहा.थोर क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना विचारा ते सांगतील, की ज्यांच्या रेकॉर्डची बरोबरी सेहवाग-द्रविड या जोडीने केली त्या विनू मंकड आणि पंकज रॉय यांची नावेही सेहवाग  द्रविडला माहीत नाहीत. आहे ना कमाल ? 


जे थोर खेळाडू प्रेरणास्थानं व्हायला पात्र आहेत, त्या खेळाडूची माहिती नको का मिळवायला ? या अनास्थेला काय म्हणायचं? पूर्वसूरीबद्दलची अनुदारता की पूर्वेतिहासाबद्दलची बेफिकीरी? हे खेदजनक आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद