परग्रहावरील माणूस पृथ्वीवर आला तर मराठी निबंध | PAR GRHAVARIL MANUS PRUTHAVIVR AALA TAR ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परग्रहावरील माणूस पृथ्वीवर आला तर मराठी निबंध बघणार आहोत. २१ व्या शतकाचा अंत होऊन आता बाविसाव्या शतकाची सुरुवात होण्याची वेळ आली आहे. पृथ्वीवरील मानवाने खूप प्रगती केली आहे. जगातील लोक भौतिक सुखात रममाण झालेले आहेत.
पृथ्वीवरील लोकांची ही प्रगती पाहून आपल्या ग्रहापासून एक प्रकाशवर्ष दूर राहणारे मानव जर पृथ्वीवर अवतरले तर... अबब! आधीच पृथ्वीवर माणसांची गर्दी, त्यात ही परग्रहावरील माणसे आली तर? जीवसृष्टीसाठी पाणी अत्यावश्यक आहे. पाण्याशिवाय मानवाचे अस्तित्व असंभव आहे. पृथ्वीवरच फक्त जलस्रोत आहे.
हा जलस्रोत जर कमी झाला, तर भयानक स्थिती ओढवेल. एक दिवस भू-वैज्ञानिक निरीक्षण करत असताना त्यांना एक अंतरिक्षयान भूतलावर उतरताना दिसले. त्याचा विश्वासच बसेना. असे कसे यान येईल आणि लगेचच जाईल? त्यांनी पुन्हा लक्ष ठेवण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी आपल्या एका शास्त्रज्ञ मित्राची मदत घ्यायची ठरविले.अनेक प्रकारच्या शंका-कुशंका मनात येत होत्या. जर परग्रहावरील माणसे आपल्या ग्रहावर येत असतील, तर ती कशासाठी? आणि अशी चोरून, लपत-छपत कशासाठी येत असतील?
मुळात पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहांवर मनुष्यवस्ती आहे का? असेल, तर तिथे पाणी नक्कीच असणार. वातावरणदेखील असणार. शास्त्रज्ञांनी अनेक तर्क लढविले; पण कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकत नव्हते. खरंच परग्रहावरील माणूस पृथ्वीवर आला तर? कशासाठी?
दोघे भू-वैज्ञानिक तिथेच दबा धरून बसले. रात्री खरोखरीच तेथे एक यान आले. त्यातून एक माणूस बाहेर आला आणि तो चक्क मनुष्यवाणीत बोलू लागला. “आम्ही
पृथ्वीपासून एक प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या ग्रहावरील माणसे आहोत. आम्ही येथे एका कामासाठी आलो आहोत. आमच्या ग्रहावरील पाण्यात एका प्रकारचे विषाणू मिसळले गेले आहेत. त्यामुळे आमच्या ग्रहावरील पाणी विषारी बनले आहे.
जोपर्यंत आमच्या ग्रहावरील पाणी शुद्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरील पाणी आमच्या ग्रहावर घेऊन जाणार." हे सांगणारा मनुष्य त्या ग्रहावरील राजा होता. त्याने परवानगीशिवाय येथून पाणी नेल्याबद्दल वैज्ञानिकांची माफी मागितली. त्यानंतर ते अंतरिक्षयान वर अंतराळात दिसेनासे झाले.
खरे तर त्यांनी आपल्याला मोलाची सूचनाच केली आहे. जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. अशा परिस्थितीत भविष्यकाळात समस्त मानवजातीपुढे एक संकट उभे ठाकणार आहे.
या भावी संकटापासून वाचण्यासाठी आम्हाला पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. पाण्याचे प्रदूषण रोखले पाहिजे. जलसंपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. ज्याप्रमाणे दुसऱ्या ग्रहांवरील लोक पाण्याची चोरी करण्यासाठी येतात, तशीच चोरी आपल्यालाही करावी लागेल. पण आपली लोकसंख्या बघता हे शक्य नाही.
परग्रहावरील माणूस पृथ्वीवर आला, तर पाण्याच्या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागेल. पृथ्वीचा भार अधिक वाढेल. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद