शिक्षण घेणे महाग होत चालले आहे काय मराठी निबंध | SHIKSHAN GHENE MAHAG HOT CHALALE AAHE KA ESSAY IN MARATHI

 शिक्षण घेणे महाग होत चालले आहे काय मराठी निबंध | SHIKSHAN GHENE MAHAG HOT CHALALE AAHE KA ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शिक्षण घेणे महाग होत चालले आहे मराठी निबंध बघणार आहोत. शिक्षण म्हणजे बौद्धिक भूक व सुसंस्कृतपणाची गरज. उत्तम शिक्षण घेऊन घर, समाज व राष्ट्र यांचा विकास साधला जावा व आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य-देखील सुखी व्हावे, यासाठी आज शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे.


शिक्षणासाठी अनेक शाखा आहेत. पण आपल्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी मुख्य अडचण प्रवेशाची येते. आज आरक्षणामुळे उरलेल्या जागांसाठी खूप हशार विद्याथा प्रयत्नशील असतात. स्पर्धा वाढल्यामुळे जागा कमी. 


ती मिळावी यासाठी लिलावअसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. जो अधिक पैसे देईल, त्याला ती जागा मिळते. त्यामुळे बऱ्याच वेळा गुणवत्ता असूनही पैसे देण्याची ऐपत नाही, या कारणास्तव आवडीचे शिक्षण घेता येत नाही.


मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली अनेक हुशार मुले शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून उच्चशिक्षण घेऊ शकत नाहीत. वैद्यकीय शाखा किंवा अभियांत्रिकी शाखा यांचा वर्षाचा खर्च खूप असतो. तो सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. आजकाल शिक्षण खरेच खूप महाग होत चालले आहे. 


पुस्तकांचा खर्च, प्रकल्प करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. मुलांना शिक्षणासाठी जी शिक्षणसंस्था, जे महविद्यालय मिळालेले असते, ते घरापासून खूप लांब असेल, तर रोजचा वाहतूक खर्च. वेळ आणि श्रम वेगळेच. बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये शिकूनही त्या विषयाचे आकलन होत नाही, तेव्हा अशा वेळी जादा शिकवणी वर्ग लावावे लागतात. 


त्याची भरमसाठ फी. ह्या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली, तर असे वाटते की, एवढे पैसे मुदतीने ठेवून येणाऱ्या व्याजाच्या पैशावर जगावे आणि सामान्य शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी धरावी; नाहीतर शिक्षणासाठी कर्ज घेऊन कर्जबाजारी व्हावे.


आता प्रश्न असा पडतो की, आज शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला आहे, ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, तरीही शिक्षण घेण्यासाठी अडचणी का? अडचण एकच; आणि तो म्हणजे महागडे शिक्षण. खाजगी शिक्षणसंस्था निर्माण झाल्या. त्यातून उत्पन्न मिळावे, हाच हेतू होता. 


हे उत्पन्न मिळण्यासाठी फी, यांचे आकडे फुगले. ज्या शाखेला जास्त मागणी आहे, त्या शाखेचे शिक्षणाचे दर खूपच असतात. वैद्यकीय पदवी घेतल्यावर सर्वांनाच स्वत:चे चिकित्सालय, हॉस्पिटल काढणे शक्य नसते. मग कुठेतरी नोकरी करून कमी पगारात चरितार्थ करावा लागतो. 


मग अशा सामान्य कुटुंबातील मुले लायकी असूनही या शिक्षणाकडे वळत नाहीत. आजकाल मुलाच्या शिक्षणासाठी पालकांना खूप बचत करून, शिवाय कर्ज काढावे लागते. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, शिक्षण घेणे महाग होत चालले आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद