वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात. याची प्रचीती काल रात्रीच मला आली. कडक उन्हाळ्याचे दिवस.
पूर्ण दिवसभर व पूर्ण रात्रभर वीज गायब होती.या चोवीस तासात अक्षरशः ब्रह्मांड आठवले. वाढलेल्या तापमानात वर्तमानपत्राची घडी हातात घेऊन शरीराला गारवा देण्याच्या प्रयत्नात हात दुखून आले.
नळाला पाणी न आल्याने सौभाग्यवतीची धांदल उडाली.छोटा चिंटू दूरदर्शन , संगणक बंद म्हणून रडवेला झाला अन् मोठा विनोद परीक्षेचा अभ्यास पूर्ण करू शकला नाही म्हणून जाम चिडला.वृध्द वडिलांना कंदिलाच्या प्रकाशात पुरेसं न दिसल्याने ते पडले मला तातडीने काही महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत काढायची होती ते महत्त्वपूर्ण कामही झाल नाही.
एकूण सारच चित्र भयानक वाटत होत.लाईट नाही पंखा, मिक्सर , कुलर , फ्रिज, लिप्ट, छापखाने साऱ्यांनी एकदमच 'बंद' पुकारलेला ! 'अतिदक्षता विभागात शेजारच्या मोऱ्यांच्या मावशी ॲडमिट होत्या. त्यांचे तातडीने ऑपरेशन होणार होते. तेही होऊ शकले नाही.
एकदरित फारच असयता मनाला जाणवली अन् क्षणभर मनाने मला प्रश्न विचारला, ही वीज कायमची बंद पडली तर? अरे बापरे! मग तर आपलं अस्तित्वच संपलं म्हणायचं! कारण आपला दिवस उगवतो मुळी वीजेच्या साक्षीने अन् मावळतो ही तिच्याबरोबरच! मग विजेविना कसले ते जगणे! कल्पनेनेच अंग शहारले.त्यातच भर पडली- काही ओळी आठवल्या कुसुमाग्रज यांच्या
"जो अंधाराला भिऊन पळतो
सूर्य त्यांच्यासाठी नसतो"
या आठवलेल्या ओळींनी धीर घेण्याऐवजी माझ्या बावळट मनाने अजूनच धसकी घेतली की वीज गायब झालीच आहे अन् सूर्यही गायब होईल की काय? विचार करा, काय अवस्था झाली असेल माझी!
आजचे युग विज्ञानयुग आहे. वीज हा विज्ञानाचा आत्मा आहे. मानवाच्या प्रगतीत विजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पैसा वेळ व श्रम यांची अनमोल बचत वीजेमुळे शक्य झालेली आहे. वीजेमुळे पृथ्वी जिवंत आहे. तिच्यावरचे जीवन गतीमान आहे.
ही वीजच बंद पडली तर पृथ्वीच मृतवत् होईल. विजेच्या दिव्यांनी तळपणारी पृथ्वीची सुंदरता काळोखात लुप्त होईल. भयाण काळोखात मानव प्रगतीला हरवून बसेल.तो अस्वस्थ होईल. मानव यंत्राचा दास आहे. सारी यंत्रे वीजेवर चालतात.
यंत्रे फिरली नाही तर मानवाची हालचाल ठप्प होईल पुतळ्याचे जीवन मिळाल्यासारखे! मग मानव विचार करू लागेल की खरंच ज्या वेळी सार मिळते, आपल्याजवळ सारं असतं तेंव्हा त्या गोष्टीची तितकी किंमत आपण करीत नाही, पण जी गोष्ट आपल्याला सोडून गेली मग मात्र तिची पूर्ण किंमत आपल्याला कळते.
शेक्सपिअर यांनी म्हटले आहे "राक्षसासारखी ताकद असणे हे केंव्हाही चांगले पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे हे तितकेच वाईट.'' पाणी, नैसर्गिक साधने, वीज, झाडे यांचा वापर करताना बऱ्याचदा बेफिकीर वृत्ती मानवात आढळते.काटकसरीने त्यांचा वापर होत नाही.
धो धो नळ चालूच असतो विनाकारण! तर कुलूप घातलेल्या खोलीत लाईट, पंखे चालूच असतात.कुणीही बघणारे नसतांना बिचारा टी. व्ही. बडबडत असतो, नाचत असतो.फ्रीजचे दार अर्धवट उघडेच असते.चार चार खोल्यांमध्ये चार पंखे गरगरत असतात फक्त गृहस्वामिनी एकटी घरी असताना ही!
कारण काम करतांना ती चारी खोल्यात फिरते उगाच दर वेळी पंखे बंद चालू करण्याची कटकट कशाला म्हणून ती बटणे चालूच ठेवते.हे सारे आपल्याला नवे नाहीच! कारण आपण ही त्यातलेच आहोत; वीज बंद पडली तर या विचाराने व चोवीस तासाच्या अनुभवाने माझ्यात थोडा शहाणपणा आला.
वीजमंडळाकडून लोडशेडींग म्हणून काही तास वीज बंद असते म्हणून ती वेळ सोडून बाकीच्या वेळात कामे करून 'निभावणे' शक्य पण वीज कायमची बंद पडली तर परत पृथ्वीतलावर 'आदिमानव' अवतरेल असंच वाटत! कारण अन्नधान्य, वस्त्र, घरे या सर्वांची प्रगती विज्ञानाने केली ती विजेमुळे ! तीच नाही तर....
वर्तनाला बंधन असावे.गंगा आपल्या नियत मार्गाने वाहते म्हणून तिचा उपयोग लोकांना जास्तीत जास्त होतो. स्वरूप, सिध्दान्त व मर्यादा यांना न सोडता वाटचाल हेच मानवाचे कर्तव्य आहे. मानव शहाणा झाल्यास निश्चितच ही 'दामिनी' जीवनभर त्याला साथ देईल व सोडून जाणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद